Thursday, 14 August 2025

कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

 कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

• कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.

• कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या 340 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रुंदीच्या पुलासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.

• उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरातही केवळ काही मिनिटांची नव्हेतर दररोज हजारो तासांची बचत होईल.

०००००

मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

 मालवणीमालाड (प)मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.

• त्याप्रमाणेमेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोपमालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असूनइमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.

देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

 देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई

मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊनमुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.

• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटरसैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकामसिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.

• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेलखर्चाची बचत होईलतसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.

• निवासी सुविधाडिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.

• प्रकल्प खर्च७० कोटी रुपये.

केबल स्टेड ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅन, आहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला

 केबल स्टेड ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅनआहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टीलडेकचा समावेश आहे. ब्रीजमधील केबल स्टेड ब्रीजच्या सुपरस्ट्रक्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्यामुळे ब्रीजच्या-पिअर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टेड ब्रीजची रुदी 10.50 मी. ते 17.20 मी. पर्यंत असून हा दोन मार्गिकेचा ब्रीज आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो. पुढे हि मार्गिका सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील

 सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.

• पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.

सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी

 सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबईपुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आलीप्रकल्पाची एकूण लांबी 5.50 किमी असून यापैकी 3.85 कि.मी. लांबी 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. होती.

मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत

 मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे..

Featured post

Lakshvedhi