Friday, 15 August 2025

 टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग

महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

मुंबईदि. १४ :  वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत प्रदर्शनाचे  मे. फेअरफेस्ट मीडिया यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन ११  ते १३ ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले.

महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील टीटीएफच्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होणार आहेया प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने १०० चौरस फूट दालन उभारुन सहभागी होऊन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत ३५ हून अधिक भागधारकांना महाराष्ट्र दालनात सामावून घेऊन पर्यटन सेवांविषयी माहिती पर्यटक / व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. यात टूर ऑपरेटररिसोर्टकृषी पर्यटन केंद्रवन्यजीव पर्यटन ऑपरेटरकॅराव्हॅन पर्यटन ऑपरेटरसहल मार्गदर्शक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र दालनाला पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांतील घटकांनी भेट दिलीतसेच महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक जाणून घेण्याची रुचीही दाखविली.

या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रत्या ठिकाणी जाण्याची सोयउपलब्ध सेवा सुविधा इत्यादी माहिती पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने भागधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. 

टीटीएफ प्रदर्शनात दरवर्षी ५०० प्रदर्शक आणि १० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात.  या ट्रॅव्हल ट्रेड फेअरमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने असतात. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

 राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

 

मुंबईदि. १४ : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेला ध्यास धरावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातनाविस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ पासून हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन रोजगार आणि उद्योगास आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आयटीआयमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानसोबतच सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान असणे आवश्यक असल्याने मंत्री श्री. लोढा यांनी आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वृद्धिगत करणारा कार्यक्रम आयोजित करावा असे निदेश दिले होते. याच श्रुंखलेतील एक भाग म्हणून ऑगस्ट महिन्यात विभाजन विभीषिका स्मरण दिवस पाळण्यात आला. त्यानुसार राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयच्या सुमारे एक हजार संस्थांमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. विविध संस्थांमध्ये फाळणी संदर्भात चित्र प्रदर्शनव्याख्याने आणि नाटक सादर करून विद्यार्थ्यांना भारताच्या त्या काळ्या अध्यायाशी परिचित करण्यात आले. तसेच भावी पिढीत सामाजिक समरसता अबाधित राहून विघटनाच्या विचारापासून दूर राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

**

डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल

 डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल मंत्री ॲड.आशिष शेलार

डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विठ्ठलाचे नाव घेत लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरुन मुंबईची ओळख द्विगुणित करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री ॲड. शेलार यांनीगिरणी कामगारबीडीडी चाळधारावीकामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधवपदपथावरील विक्रेते यांसारख्या विविध घटकांसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गृहनिर्माण व पुनर्विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी जगातले 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून त्यांची पुढची पिढीच या केंद्राचे संचालन करणार असल्याची माहिती दिली.

प्रारंभी डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गवांदे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या 135 वर्षांच्या परंपरेची माहिती देऊन कोविड काळात काम ठप्प असताना नागरिकांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

दहिहंडी उत्सव



 अलिबाग मधील पीएनपी होली चाईल्ड शाळेत आज दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी थरावर थर रचून द

हीहंडी फोडली.

जरा नेट खट हैं ये कृष्ण क्नहनैया


 MES वाघीरे स्कूल सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे 🙏🏻🇮🇳

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 

मुंबईदि .१४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआमदार श्रीकांत भारतीययोगेश सागरतमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेसचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले१३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करताएकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवासडबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनीवारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे श्री.त्रिपाठी यांचेतसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये 16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये

16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 

नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला यावर्षी  16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन व विक्री 27  ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देणेत्यांच्या मूर्तींना दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच दिल्लीतील मराठी आणि अमराठी गणेशभक्तांना दर्जेदार गणेशमूर्ती सहज उपलब्ध करून देण्यासाठी मागील 30 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवले जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील  30 पेक्षा अधिक गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह मराठी तसेच मराठी कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो.

यावर्षी एम्पोरियमच्या दालनात सहा इंच ते तीन फूट उंचीच्या एकूण 1,000 शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध असतील. या मूर्तींची किंमत 600 रुपये ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतचगणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे विविध साहित्यही येथे उपलब्ध आहे. नंदा एस्कोर्टसत्रिभोवनदास झवेरीविविध उद्योजक व मान्यवर दरवर्षी येथून गणेशमूर्ती खरेदी करतात. ठाणे येथील मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे हे अनेक वर्षांपासून येथे गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात.

बाबा खडकसिंह मार्गवरील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन व विक्री गणेशचतुर्थी 27 ऑगस्ट   2025  पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 

Featured post

Lakshvedhi