Friday, 15 August 2025

जरा नेट खट हैं ये कृष्ण क्नहनैया


 MES वाघीरे स्कूल सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे 🙏🏻🇮🇳

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 

मुंबईदि .१४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआमदार श्रीकांत भारतीययोगेश सागरतमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेसचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले१३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करताएकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवासडबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनीवारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे श्री.त्रिपाठी यांचेतसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये 16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये

16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 

नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला यावर्षी  16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन व विक्री 27  ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देणेत्यांच्या मूर्तींना दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच दिल्लीतील मराठी आणि अमराठी गणेशभक्तांना दर्जेदार गणेशमूर्ती सहज उपलब्ध करून देण्यासाठी मागील 30 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवले जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील  30 पेक्षा अधिक गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह मराठी तसेच मराठी कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो.

यावर्षी एम्पोरियमच्या दालनात सहा इंच ते तीन फूट उंचीच्या एकूण 1,000 शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध असतील. या मूर्तींची किंमत 600 रुपये ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतचगणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे विविध साहित्यही येथे उपलब्ध आहे. नंदा एस्कोर्टसत्रिभोवनदास झवेरीविविध उद्योजक व मान्यवर दरवर्षी येथून गणेशमूर्ती खरेदी करतात. ठाणे येथील मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे हे अनेक वर्षांपासून येथे गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात.

बाबा खडकसिंह मार्गवरील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन व विक्री गणेशचतुर्थी 27 ऑगस्ट   2025  पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 

प्रेरणादायी यशोगाथाराष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रणअंजना शंकर कुंभार

 प्रेरणादायी यशोगाथा

सातारा जिल्ह्यातील परळी गावातील अंजना शंकर कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या सुबक वस्तूगणेश मूर्तीटेराकोटा शिल्पकलामातीची भांडी आणि खेळणी तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उमेद’ अभियानांतर्गत त्यांनी जय सदगुरू कृपा’ नावाचा स्वयंसहाय्य गट स्थापन केलाज्यामध्ये 12 महिला कार्यरत आहेत. या गटाने दीड वर्षांपूर्वी उमेद’ योजनेंतर्गत सहा लाख रुपयांचे कर्ज घेतलेज्याच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि पुणेमुंबईपाटण आणि सातारा येथील बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशाची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. श्रीमती कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले असूनत्या आपल्या पतीसह या समारंभात सहभागी होणार आहेत

आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचतगट सदस्यांना सत्कार

 यंदाच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी सातारा जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचतगट सदस्यांना आणि भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील श्रीमती रूपाली सत्यवान जाधव (कारंवडी), श्रीमती जयश्री शिवाजी जांभोडे (नायगांव), श्रीमती शैला शरद पवार (धोंडेवाडी), श्रीमती वैशाली राजेश धर्मे (रेठरे बुद्रुक), श्रीमती स्वप्नाली जितेंद्र जाधव (जांब खुर्द), श्रीमती सुवर्णा पांडुरंग देशमुख (कापील), श्रीमती मंगल सुरेश मारढेकर (कुदळ), श्रीमती रुबिना नसरुद्दीन मुलाणी (कुलालजाई), कुमारी मंगल दादासो हजारे (कोपर्डे हवेली), कुमारी शोभा विजय रांजणे (डापवाडी), श्रीमती छाया अजित कदम (अरळे), श्रीमती अश्विनी संदीप कदम (अरळे), श्रीमती भाग्यश्री मंदार जाधव (ओझर्डे), श्रीमती सरस्वती सुरेश निकम (मुमगासेवाडी) श्रीमती सुजाता चंद्रकांत महांगडे (पारखंडी), भंडारा जिल्ह्यातील श्रीमती उषा राजू कावळे, श्रीमती रेखा सुधीर चाचणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीमती आशा संभाजी जाधव , श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुर्वे यांचा समावेश आहे

लखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान

 निवासी आयुक्त आर. विमला यांनी या दीदींच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांना या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्या म्हणाल्यालखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. साताऱ्याच्या अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात आणि इतर दीदींना लाल किल्ल्यावर निमंत्रित केले जाणे हे त्यांच्या यशाचा आणि देशाच्या सक्षमीकरण मोहिमेचा गौरव आहे. महाराष्ट्र सदन त्यांच्या या प्रवासात पूर्ण सहकार्य करेल.

उमेद’ अभियानामध्ये चार वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून महिलांसोबत काम

 आयुक्त आर. विमला यांनी सांगितले कीत्यांनी उमेद’ अभियानामध्ये चार वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून महिलांसोबत काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गटांच्या आत्मनिर्भरतेसाठी काम करण्यात आलेज्यामुळे सुमारे 5 लाख बचतगट (Self-Help Groups) तयार झाले आणि 50 लाख महिलांना जोडले गेले. या प्रयत्नांमुळे 18 लाख महिला शेतकरी आणि उद्योजक म्हणून उदयास आल्या. आज हे यश पाहून त्यांना खूप आनंद झालाअशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

Featured post

Lakshvedhi