Thursday, 14 August 2025

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्याकर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या pl share

 महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीयनिमशासकीयशासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावाअशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजनाबीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजनातसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटीसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटीआणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.  यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिलशासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणारप्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजनाऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

 महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती

लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

 

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊनही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी,  पोलीस शिपाई – १० हजार ९०८पोलीस शिपाई चालक – २३४बॅण्डस् मॅन – २५सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

भरतीसाठी अर्ज मागवणेअर्जाची छाननीत्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षात्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यासपोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधीतसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

-०-

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

 ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. १३ :-  ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ मधील अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर करून प्रस्तावित १३ गावांच्या योजनेचे संकल्पन तातडीने पूर्ण करावे. तदनंतर या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी दिली जाईल असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर)  या बंद असलेल्या योजनेच्या शिल्लक असलेल्या पाण्यातून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावांचा समावेश करून योजना पुनश्च सुरू करणे संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार श्रीमती मोनिका राजळेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.

ताजनापूर टप्पा-१ चालू करुन त्यामध्ये अतिरिक्त १३ गावांचा समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास शासनाची तत्वतः मान्यता प्राप्त  आहे. या योजनेद्वारे शेवगाव तालुक्यातील १३ गावातील  साठवण तलाव व बंधारे गुरूत्वीय पाईप वितरण प्रणालीव्दारे भरून देणे नियोजित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधील कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.

क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

 क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

तत्पूर्वी पलूस (जि. सांगली) तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी उपाय योजनांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली  या बैठकीस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते.

क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सुधारित मापदंड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी पाटबंधारे महामंडळांनी क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावाअशा सूचना या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पाण्याचा निचरा न झाल्याने जमिनी क्षारपड प्रमाण वाढते ही चिंतेची बाब आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी निचरा कॅनॉल स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळस्तरावर सर्वसमावेशक योजना राबवावीअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. या बैठकीत  कडेगांव (जि. सांगली) तालुक्यातील ढाणेवाडी गावास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

००००

नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा; कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

 नीरा देवधर प्रकल्पगुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा;

कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

 

मुंबईदि. 13 :- नीरा देवधर प्रकल्पगुंजवणी-चापेट प्रकल्पवरसगावपानशेत व मुळशी धरण प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेमाजी आमदार संग्राम थोपटेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकार्यकारी संचालक  श्री. गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळमुख्य अभियंता श्री. मिसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेवाजेघरवांगणीशिवगंगा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू केली जातील. नीरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्यात असून तेही लवकरच पूर्ण होईलअसेही त्यांनी सांगितले.

वरसगावपानशेत व मुळशी धरण प्रकल्प बाधितांच्या समस्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभागाने या ठिकाणच्या गावठाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा

 कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 13 :- कोकण व गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  आढावा घेऊन या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकोकण पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेजलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या  सर्वेक्षणाची प्रगती व तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले,

या प्रकल्पाद्वारे कोकणातील जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करून गोदावरी खोऱ्यातील पाणी टंचाई भागांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण काम गतीने करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितलेमराठवाड्याच्या दुष्काळी भागाच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी हा  प्रकल्प महत्त्वाचा असल्याने दिलेल्या वेळेतच या प्रकल्पाच्या सर्वेक्षण काम व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी याचा नियमित आढावा घ्यावा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi