Thursday, 14 August 2025

लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती.

 लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती.

दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज विस्तारित सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1

• मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे.

• सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबईपुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आली होती.

• प्रकल्पाची एकूण लांबी 5.50 किमी असून यापैकी 3.85 कि.मी. लांबी 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

मुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी

 उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामे केली जात आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध आहे.

  यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मंडळे येथे उभारलेल्या ७० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेमुळे मेट्रो साठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून प्रशिक्षणासाठीचा खर्च वाचणार आहे. तर इतर राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठीचे मनुष्यबळ प्रशिक्षित करून महसूल मिळणार आहे. तसेच चेंबूर - सांताक्रुझ लिंक केबल स्टेड पूलरोड भाग 1 हा अशिया खंडातील 100 मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल आहे. तसेच 90 कोटी रुपयांच्या मालवणी येथील कर्मचारी निवासस्थान इमारत ज्यामध्ये एकूण 156 सदनिका असणाऱ्या दोन इमारती आहेत. कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल तसेच धर्मवीरस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील 5.25 कि.मी लांबीच्या विहार क्षेत्रपादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल

 उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीशहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असूनत्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी होईलइंधनाची बचत होईल आणि वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेट्रो आणि इतर प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. काही प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीपश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्सलिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलितस्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसूनरोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करतामुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवूअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

 मुंबईच्या विकासाला नवे पंख:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

लवकरच मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १४ : काही वर्षांपूर्वी आपण मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन

 मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. पावसाळा आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पार्श्वभूमीवर जलप्रलय किंवा इतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइनचा वापर करावाअसेही त्यांनी आवाहन केले.

गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क

 बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावेअसे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद वस्तूपिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा, असे त्यांनी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi