Thursday, 14 August 2025

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

 मुंबईच्या विकासाला नवे पंख:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

लवकरच मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १४ : काही वर्षांपूर्वी आपण मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन

 मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. पावसाळा आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पार्श्वभूमीवर जलप्रलय किंवा इतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइनचा वापर करावाअसेही त्यांनी आवाहन केले.

गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क

 बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावेअसे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद वस्तूपिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी

 विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. ही निरीक्षणक्षमता केवळ घरापुरती मर्यादित नसूनसार्वजनिक ठिकाणीविशेषतः उत्सव आणि गर्दीच्या काळातअत्यंत प्रभावी ठरते. महिलांचा सहभाग प्रशासनपोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात वाढल्यास गुन्हे रोखणे आणि आपत्ती टाळणे अधिक सोपे होईलअसे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महिला दक्षता समित्यांनी विशेष प्रयत्न करावेतअसे आवाहन त्यांनी केले.

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची

 महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची

— विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे

— विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षिततासणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई पोलीसमुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यशाळेत सांगितले कीसणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणेनैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. महिला दक्षता समित्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनबीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधून सक्रियपणे कार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले. महिलांवरील अत्याचार प्रतिबंधस्त्री-पुरुष समानतास्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधकौटुंबिक हिंसाचार याबाबत जनजागृती करताना कायदेशीर तरतुदींची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत १८ ऑगस्ट रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ पीडित महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम

 मुंबईत १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

पीडित महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम

 

मुंबईदि. १४ : महिलांना आपले प्रश्न व तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावेतसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिला लोकशाही दिन’ जिल्हास्तरावर साजरा केला जातो. यंदा हा उपक्रम १८ ऑगस्ट २०२५ रोजीसकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेतजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

या दिवशी समस्याग्रस्त व पीडित महिलांना शासकीय यंत्रणेकडून तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुलभ मार्गदर्शन व साहाय्य मिळणार आहे. इच्छुकांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यात भरूनआवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय११७ बी.बी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई ४०००१८ येथे सादर करावेत.

न्यायप्रविष्ट प्रकरणेसेवा व आस्थापना विषयक बाबीविहित नमुन्याबाहेरील किंवा अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभागाने सर्व महिलांना लोकशाही दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 

वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली. 

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरामंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड.आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरगृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताम्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते. भर पावसात बीडीडी वासियांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह सर्व मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकेची पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्याधिकारी श्री. बोरीकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi