धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीत पाच वर्षांपर्यंत तेथील व्यवसायांवर कर सवलती देण्यात येतील. धारावी ही औद्योगिक वसाहत होऊन तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 August 2025
पोलिसांना घराचा दर ५० लाखांवरून केवळ १५ लाख रुपये
पोलिसांना घराचा दर ५० लाखांवरून केवळ १५ लाख रुपये ठरवला आहे. त्यामुळे पोलिसांनाही हक्काचे घर मिळणार आहे. अभ्युदयनगर, जीटीबी नगर यांच्यासह इतर जुन्या वसाहतींचाही पुनर्विकास सुरू आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा दीर्घकाळाचा अडथळा शासनाने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आजवर २० ते २५ वर्षांपासून विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. शासनाने या प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडा मार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. आता पहिल्या टप्प्यात सुमारे ५५६ कुटुंबांना चाव्या देण्यात येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत.
बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात
बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे;
मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ
मुंबई, दि. १४ : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन सदनिका वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस संबोधित करताना बोलत होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, आमदार सर्वश्री सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, सचिन अहिर, महेश सावंत, माजी आमदार सदा सरवणकर, किरण पावसकर आदी उपस्थित होते.
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. १३ :- ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ मधील अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर करून प्रस्तावित १३ गावांच्या योजनेचे संकल्पन तातडीने पूर्ण करावे. तदनंतर या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी दिली जाईल असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) या बंद असलेल्या योजनेच्या शिल्लक असलेल्या पाण्यातून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावांचा समावेश करून योजना पुनश्च सुरू करणे संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार श्रीमती मोनिका राजळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.
ताजनापूर टप्पा-१ चालू करुन त्यामध्ये अतिरिक्त १३ गावांचा समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास शासनाची तत्वतः मान्यता प्राप्त आहे. या योजनेद्वारे शेवगाव तालुक्यातील १३ गावातील साठवण तलाव व बंधारे गुरूत्वीय पाईप वितरण प्रणालीव्दारे भरून देणे नियोजित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधील कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा
क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा
तत्पूर्वी पलूस (जि. सांगली) तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी उपाय योजनांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली या बैठकीस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते.
क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सुधारित मापदंड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी पाटबंधारे महामंडळांनी क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा, अशा सूचना या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
पाण्याचा निचरा न झाल्याने जमिनी क्षारपड प्रमाण वाढते ही चिंतेची बाब आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी निचरा कॅनॉल स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळस्तरावर सर्वसमावेशक योजना राबवावी, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. या बैठकीत कडेगांव (जि. सांगली) तालुक्यातील ढाणेवाडी गावास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
००००
नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा; कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना
नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा;
कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना
मुंबई, दि. 13 :- नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्प, वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक श्री. गुणाले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ, मुख्य अभियंता श्री. मिसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, वाजेघर, वांगणी, शिवगंगा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू केली जातील. नीरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्यात असून तेही लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्प बाधितांच्या समस्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभागाने या ठिकाणच्या गावठाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...