डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
१) श्री. धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
१) श्री. धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग :
● सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे
● सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक
● ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ
● मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक
ग्रामीण विभाग
१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव
२)बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम
३) प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे
- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी तसेच ग्रंथालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा. आणि पालकमंत्र्यांच्या निधीतील एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावा, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी
शासन सकारात्मक
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 12 : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावं, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
एसएनडीटी महिला विद्यापीठ, पाटकर सभागृह येथे सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, यंदा ग्रंथ प्रदर्शन माध्यमातून जवळपास ४० कोटी पुस्तकांची विक्री झाली. १० लाख वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. यामध्ये ४ लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथालय चळवळ टिकावी आणि पुढे वाढत जावी यासाठी ' एक तास शांतता... पुणे वाचत आहे, १५ दिवसात पुस्तक वाचून परीक्षण लिहिणे यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ३ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिले.
वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रदर्शने, पुस्तक परीक्षण, कविता वाचन यासारखे कार्यक्रम राबविण्यात यावीत. ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी मान्यता रद्द झालेल्या २ हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ज्या सार्वजनिक वाचनालयाला 50, 75 व 100 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी
जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्
राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरु
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग आणि सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मेपलट्री इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि., सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर औद्योगिक परिसरात रोजगाराच्या थेट 5,000 संधी उपलब्ध होणार आहेत. या कराराअंतर्गत लॉजिस्टिक्स व वेअरहाऊसिंग पार्क, औद्योगिक पार्क आणि डाटा सेंटर्सची निर्मिती करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग आणि सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ यांच्यासमवेत जेएनपीए, उरण येथे लवकरच उद्घाटन होणाऱ्या पीएसए कंपनीद्वारे नवनिर्मित भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 ची पाहणी करत माहिती घेतली.
सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग म्हणाले की, हवामान बदल ही जागतिक स्तरावरील एक गंभीर समस्या आहे त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सिंगापूर आणि भारत एकत्रितपणे ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MOU) तयार करत आहेत. हा करार मजबूत आणि प्रभावी मेरिटाइम क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.
पी एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी केली असून भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ, चिरस्थायी भागीदारीचे हे प्रतीक आहे. जवळपास तीन दशकांमध्ये,पी एसने भारतात एकूण 2.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. फेज 1 मुळे कार्यक्षमता वाढली असून, जहाजांचा परतण्याचा वेळ कमी झाला आहे. याचा भारताच्या निर्यात-आयातदारांना फायदा झाला आहे फेज 2 मुळे टर्मिनलची क्षमता 2.4 दशलक्ष TEUs वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष TEUs झाली आहे, ज्यामुळे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. यामुळे आर्थिक विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बंदर व्यवस्थापनापलीकडे, सिंगापूरच्या कंपन्या भारतातील मेरिटाइम क्षेत्रात जहाजबांधणी आणि हिरव्या शिपिंग उपायांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सिंगापूर हा भारतातील सर्वात मोठ्या परदेशी थेट गुंतवणुकीच्या स्रोतांपैकी एक आहे, आणि अनेक सिंगापूरच्या कंपन्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मॅपल ट्री इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासासाठीचा नवीन सामंजस्य करार या भागीदारीला आणखी मजबूत करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.