Wednesday, 13 August 2025

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

 महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती

लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

 

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊनही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी,  पोलीस शिपाई – १० हजार ९०८पोलीस शिपाई चालक – २३४बॅण्डस् मॅन – २५सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

भरतीसाठी अर्ज मागवणेअर्जाची छाननीत्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षात्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यासपोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधीतसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.


जागतिक अवयवदान दिनानिमित्त’ ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. आकाश शुक्ला यांची विशेष मुलाखत

 जागतिक अवयवदान दिनानिमित्त

दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. आकाश शुक्ला यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 12 : ‘जागतिक अवयवदान दिनानिमित्तानेशासन स्तरावर अंगदान जीवनदान संजीवनी अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी याविषयावर राज्य अवयवदान समन्वय समितीचे संचालकयकृततज्ज्ञ आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत बुधवार दि. 13, गुरुवार दि. 14 आणि शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. ही मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली आहे.

दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी 'जागतिक अवयवदान दिनसाजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवूनत्याविषयी असलेले गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानाबाबत समाजात अद्यापही भीती आणि चुकीच्या समजुती असल्याने अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 3 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान अंगदान जीवनदान संजीवनी अभियान’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अवयवदानाची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवूनमृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी प्रेरित करणे हे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. शुक्ला यांनी या मोहिमेची अंमलबजावणी आणि अवयवदानाचे महत्त्व याविषयी माहिती दिली आहे.

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो रो सेवा मार्च पर्यंत कार्यान्वित करावी

 मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो रो सेवा 

मार्च पर्यंत कार्यान्वित करावी

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

·         डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही

मुंबईदि. १२ : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही रो रो सेवा मार्च अखेर पर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या.

   बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

   दिघी आणि काशीद या दोन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीमुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो सेवा हा एक उत्तम पर्याय असणार आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असतानाच इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. मार्च अखेर पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करावीत.

  दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थिती मच्छीमार नौकाना द्यावयाच्या डिझेल परतावा या विषयी बैठक झाली. यावेळी एकही पात्र मच्छीमार नौका डिझेल परतावा पासून वंचित राहणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मच्छीमार संस्थानी त्यांच्या बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या विषयी मच्छीमारांना समाधानकारक निर्णय घ्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.


दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

 सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे

विशेष तपासणी अभियान

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व्यवसायिकांसाठी 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत  अंमलबजावणीजनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गणपतीईदनवरात्रदसरादिवाळी या सणांच्या काळात मिठाईमोदकफराळप्रसाद या सारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळेमिठाई उत्पादकमोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गट यांच्यासाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यातअसे आवाहनही सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

 सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे

विशेष तपासणी अभियान

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व्यवसायिकांसाठी 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. १२ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियानराबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उद्या, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरनरीमन पॉईंटमुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरयेथे होणाऱ्या  कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदमसचिव  धीरज कुमार आणि  अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर

विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

 मुंबई, दि. 12 : रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व  आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे आयुक्त दीपा मुधोळकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह उपस्थित होते.

                मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. स्मारक तसेच परिसर विकासासाठी बार्टीच्या सहाय्याने  शैक्षणिक उपक्रम देखील या परिसरात सुरू करावे. स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे ठिकाण असल्याने त्या दृष्टीने या परिसरात काम करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करून सर्व कामांची माहिती या समितीसमोर सादर करावी, अशा सूचना मंत्री श्री.शिरसाट यांनी यावेळी दिल्या.

स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, स्मारकारसाठी आवश्यक जमीनीचे भूसंपादन करणे, वास्तुविशारद नेमणूक, स्मारकाचे  बांधकाम, प्रकल्पाचे टप्पे, मौजे आंबडवे येथील नागरिकांनाच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करावेत, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

 सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील

शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

        मुंबई, दि. 12 : अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता  अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी. उल्हासनगर परिसरात १०० मुले व मुलींचे वसतीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच उल्हासनगर येथे संविधान भवन उभारण्याबाबत संबधित समाजकल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Featured post

Lakshvedhi