Wednesday, 13 August 2025

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रवेशाची अंतिम मुदत ४ सप्टेंबरपर्यंत

 पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

  • प्रवेशाची अंतिम मुदत ४ सप्टेंबरपर्यंत

 

मुंबईदि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा असूनप्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिममुदत १४ ऑगस्टवरून ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  म्हणालेतंत्रशिक्षण संचालनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे पॉलीटेक्निकमधील प्रवेशात मागील दहा वर्षांतील विक्रम झाला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्ट हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला होतामात्र दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावीतसेच सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेऊ शकतील. हीच अंतिम तारीख थेट द्वितीय वर्ष प्रवेशतसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.

दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत असूनआर्टिफिशियल इंटेलिजन्सडाटा सायन्सरोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमविद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमाउद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन यांसारख्या उपक्रमांमुळे हा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी

 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी

तालुकास्तरावर समिती नेमावी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

·         शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेचे प्रस्ताव स्वतः पाठवण्याची कार्यवाही करावी

 

मुंबईदि. 12 : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेतअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरप्रधान सचिव रणजित सिंह देओलसंचालक कृष्णकुमार पाटीलउपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या योजनेत सुटसुटीतपणा असावा असे सांगून मंत्री श्री.भुसे म्हणाले कीयासाठी कमीत कमी कागदपत्रांची मागणी असावी. हे सानुग्रह अनुदान सध्या असलेल्या रकमेऐवजी वाढवून देण्याचा प्रस्ताव तीन आठवड्यात सादर करावा. या योजनेचा निधी वर्षाच्या सुरुवातीस मिळण्याविषयीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेतया प्रकरणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेतअशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.

०००००

ग्रंथालय विभागस्तरीय पुरस्कार

  ग्रंथालय विभागस्तरीय पुरस्कार

१) अमरावती : श्री. रामभाऊ पंढरी मुळेसचिवछत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयमु. पो. हनुमाननगरअकोलाता.जि. अकोला.

२) छत्रपती संभाजीनगर :  श्री. खंडेराव साहेबराव सरनाईकअध्यक्षश्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयकेंद्रा बु.ता. सेनगावजि. हिंगोली.

३) नाशिक : श्री. राहुलकुमार मालजी महिरेअध्यक्षबौध्दवासी शांताई महिरे वाचनालयआखाडेमु.पो. आखाडेता. साक्रीजि.धुळे

४) पुणे : श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडेअध्यक्षज्ञानदा मोफत वाचनालयजरळीता. गडहिंग्लजजि. कोल्हापूर

५) मुंबई : श्री. सुभाष सीताराम कुळकर्णीअध्यक्षप्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशीनवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

 डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

१) अमरावती : श्री. अनंत श्रीराम सातवग्रंथपालसरस्वती वाचनालयपातुर्डा बु.ता.संग्रामपूरजि.बुलडाणा

२) छत्रपती संभाजीनगर : श्री. सूर्यकांत कमलाकर जाधवग्रंथपालविवेकानंद वाचनालयआलमलाता. औसाजि. लातूर

३)नागपूर : श्री. खेमचंद अंताराम डोंगरवारग्रंथपाल, श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालयनवेगाव / बांधता.अर्जुनी मोरगावजि. गोंदिया

४)नाशिक : श्री. चिंतामण संतोष उगलमुगलेग्रंथपालओंकार नगर सार्वजनिक वाचनालयओंकारनगरपेठ रोडता.जि. नाशिक

५)पुणे : श्रीमती रुपाली यशवंत मुळेग्रंथपालश्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयसातारा.

६)मुंबई : श्री. संजय काशिनाथ शिंदेग्रंथपालनगर वाचन मंदिरमालवणजि. सिंधुदुर्ग

ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाया ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

या समयी पुरस्कार प्राप्त परिचय पुस्तिकेचे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सन 2023 च्या मराठी ग्रंथसूचीचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले

. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

 डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

१) श्री. धनंजय वसंतराव पवारअध्यक्षश्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालयहासाळापो. बुधोडाता. औसाजि. लातूर

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी ग्रामीण

 उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग :

 सार्वजनिक वाचनालयशिवाजी चौककल्याण पश्चिमता.कल्याणजि.ठाणे

  सर्वात्मक वाचनालयबापू बंगला स्टॉपइंदिरानगरनाशिक

 ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयवाघापूरता.जि.यवतमाळ

 मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालयपंचवटीनाशिक

ग्रामीण विभाग

१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालयचोराखळीता. कळंबजि. धाराशिव

२)बलराम सार्वजनिक वाचनालयफुलउमरीता. मानोराजि. वाशिम

३) प्रगती सार्वजनिक वाचनालयसिल्ली (आंबाडी) जि. भंडारा

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे

 सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे

- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील जनतेचे सामाजिकशैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी तसेच ग्रंथालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा. आणि पालकमंत्र्यांच्या निधीतील  एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावाअसे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi