स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणे, धमक्या देणे, हेट स्पीच, फेक न्यूज, अंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात. त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 12 August 2025
सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टी' प्रणाली विकसित pl share
सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टी' प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रस्ताविक केले. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यक्रमापूर्वी गरुड दृष्टि बाबत सादरीकरण केले. सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत;
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
मुंबई, दि. 11 : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, बीड- अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटील, गोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ, सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे, यवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोड, रत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके, सातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई, मुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार, वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, नंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, कोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, गडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर.
राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावे, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत
शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत
- मंत्री मंगलप्रभात लोढा
जनता दरबारात महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
यासंदर्भात कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनाही पत्र लिहिले आहे. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधण्याच्या निर्देशांनुसार कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातील एफ उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत तक्रारी मांडल्या. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी करतात, कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
या अडचणींची कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त श्री.अरुण क्षीरसागर यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सायन-कोळीवाडा मतदारसंघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार श्री. तमिळ सेल्वन यांनी त्यांच्या मतदारसंघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे आवाहनmahotsav.plda@gmail.com,
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे
मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 11 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे शासन क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का. २, दिनांक २० जून, २०२५ अन्वये सुरु होणा-या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" मधील विहीत नमून्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर गणेश चतुर्दशीच्या एक दिवसा पूर्वीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र आणि व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील.
या गणेशोत्सव स्पर्धेच्या निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांचेकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची 'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम -
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची
'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
- नाशिक येथे मोहिमेचा आरंभ
मुंबई, दि. ११ :- सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी मोहिमेचा आरंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आला.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून मिठाई, खाद्यतेल, खवा, मावा दूध इ. अन्न पदार्थाच्या गुणवत्तेवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
राज्यात आगामी काळात साजरे होणारे सण पोळा, गणेशोत्सव, ईद, गौरी पूजन, नवरात्र महोत्सव, दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यास, त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अखाद्य, अपायकारक नमुने नियमानुसार नष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ नुसार शास्ती बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांचाही सहभाग असणार आहे. सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील टोलनाक्यांवर परराज्यातून येणाऱ्या खव्यासारख्या पदार्थ्यांच्या अचानक तपासणी मोहिम सोबतच सुरक्षित अन्न पदार्थाबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही मोहीम दिवाळीसंपेपर्यंत दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
सप्ताह (1 ते 7 ऑगस्ट) दरम्यान 2 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात
महसूल सप्ताह उत्साहात साजरा
मुंबई, दि. 11 : मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाने या सप्ताहात नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा पुरविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महसूल दिन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी महसूल दिनाचे महत्त्व स्पष्ट करून महसूल प्रशासनातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
महसूल सप्ताह (1 ते 7 ऑगस्ट) दरम्यान 2 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान राबवून कार्यालयातील शाखांची स्वच्छता, दस्तऐवजांचे वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वितरित करण्यात आले.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत 4 ऑगस्ट रोजी मुंबई शहरात उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड आदी सेवा देणारी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये प्राप्त अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी कफ परेड, कुलाबा येथे विशेष शिबिरासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
गौण खनिज विभागांतर्गत परवान्यांची तपासणी 7 ऑगस्ट रोजी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच तृतिय पंथियांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
याचबरोबर दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या महसूल सप्ताह कालावधीत राबविलेले शिबीरांद्वारे तसेच फिरते पथकाद्वारे उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्रांबाबत एकूण 2,074 अर्ज प्राप्त झाले असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधारकार्ड, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना लाभ, मतदार नोंदणी व मतदार ओळखपत्र तसेच आरोग्य तपासणीसाठी लवकरच शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...