Tuesday, 12 August 2025

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

 आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

 

मुंबईदि. ११ : शासनसमाज आणि व्यक्ती यांच्यातील सुसंवाद दृढ करण्यासाठी तसेच विचारप्रवृत्त व माहितीपूर्ण लेखन वाचकांसमोर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "आपलं मंत्रालय" या गृहपत्रिकेचा विशेषांक मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

या प्रकाशन सोहळ्यास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेषांकात "भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास", "शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध" यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत. शासनाच्या कार्याचे संवेदनशील व मानवी रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सकारात्मक संवादाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.

"आपलं मंत्रालय" या उपक्रमातून वाचकसमाज आणि शासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व बळकट होईल, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हा विशेषांक https://publuu.com/flip-book/945595/2075357 या लिंकवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

0000

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

 जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेबीड- अजित आशाताई अनंतराव पवारनागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळेअहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटीलगोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळसांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटीलनाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजनपालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकजळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटीलअमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसेयवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोडरत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंतधुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावलजालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडेनांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावेचंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईकेसातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाईमुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलारवाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणेरायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरेलातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेनंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटेसोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरेहिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळभंडारा- संजय सुशिला वामन सावकारेछत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाटधाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईकबुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणेअकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकरकोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकरगडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वालवर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर.

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालयकोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्तकोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावेअसेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत;

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 

मुंबईदि. 11 : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेअसे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई, दि. ७ : राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वर्ष २०२५-२६ करीता वसतिगृहज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अवर सचिव आ. सु. जोगळेकर यांनी  दिली आहे.

 

बी.ए.,बी. कॉम.बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए.एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत. १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी १ सप्टेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वसतिगृह प्रवेशासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहेअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

000

आपदग्रस्तांना मदतीसाठी शासन संवेदनशील

 आपदग्रस्तांना मदतीसाठी शासन संवेदनशील

आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले कीनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. प्रशासनानेही बाधित अतिवृष्टीपूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या निधीस मान्यता  देण्यात आली.

जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकऱ्यांच्या ७२.३२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १६.०१ लाखहिंगोली जिल्ह्यातील ३ हजार २४७ शेतकऱ्यांच्या १६११.३७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३६०.४५ लाखनांदेड जिल्ह्यातील ७ हजार ४९८ शेतकऱ्यांच्या ४७९०.७८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १०७६.१९ लाख आणि बीड जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या  ११ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १.९९ लाख निधीचा समावेश आहे.

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील २ हजार २४० शेतकऱ्यांच्या १३१२.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २७५.७९ लाख,अकोला जिल्ह्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांच्या  ३७९०.३१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४०५.९० लाखयवतमाळ  जिल्ह्यातील १८६ शेतकऱ्यांच्या  १३०.५० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २५.४५ लाखबुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांच्या  ८७३९०.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७४४५.०३ लाख आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या  ५१६२.२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४७१.२१ लाख निधीचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या १८९६१०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २६१४३.३८ लाखछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५४८ शेतकऱ्यांच्या  ४८९१.०५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ६६५.४१ लाख तर धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या ०.३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ०.०४ लाख निधीचा समावेश आहे.

या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यास दिलासा मिळणार असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मान्यता दिल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना

३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. ७:-  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगरअमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिवछत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता दिलीअसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. या बाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे  झालेल्या शेतपिकांच्या मान्यता देण्यात आलेल्या निधीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजारअमरावती विभागासाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिवछत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार निधीचा समावेश आहे.

बार्टीमार्फत युपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

 बार्टीमार्फत युपीएससीएमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

मुंबईदि. 7 : सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टीमार्फत यूपीएससीएमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test -CET) आणि गुणांकन पद्धती‌द्वारे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रताआरक्षण व सीईटीमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संनियंत्रण व अंमलबजावणी समितीमार्फत केली जाणार असल्याची माहिती बार्टी कार्यालयाने दिली आहे.

             बार्टीटीआरटीआयसारथीमहाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी विविध प्रकल्प व योजना राबवल्या जातात. या संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींसाठी विविध स्पर्धा परीक्षा व त्याच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनामार्फत एक सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे.

या धोरणानुसारया पाचही संस्थांमार्फत राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारासाठी दिल्ली येथे युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणमहाराष्ट्र राज्य युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणमहाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणमहाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणमहाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

बार्टी मार्फत अनुसू‌चित जातीतील वि‌द्यार्थ्यांना शासकीय नौकरी मिळावी आणि त्याचा आर्थिक विकास साधावा यासाठी नामांकित खासगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी बार्टी मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.योजनेचा सविस्तर तपशीलशासन निर्णयआवश्यक कागदपत्रे इत्यादी माहिती बार्टीच्या http://barti.maharashtra gov.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारले जातील.

 

Featured post

Lakshvedhi