Monday, 11 August 2025

विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधीविद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी

 विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी

मुंबई, दि. 11 शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना निर्गमित होईलअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.  

           मंत्री श्री. सरनाईक म्हणालेविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य शासनाकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

  परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय (स्कूल) व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्रआपत्कालीन निर्गमनवाहन प्रवेशस्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचनाअग्निशमन अलार्म यंत्रणावाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहेअशी माहिती परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

राज्य‍ शासनाकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य शासनाने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून या संदर्भात अधिसूचना निर्गमित होईलअसे मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतुकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅगपाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये

जीपीएस

सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन

अग्निशमन अलार्म प्रणाली

दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा

ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर

पॅनिक बटणआपत्कालीन दरवाजे

स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

गाडीच्या छतावर शाळेचे नाव

...

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन

 राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन

- मंत्री अतुल सावे

प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस

 

मुंबईदि. ११ : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघरमुफ्त बिजली योजनेतंर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी मॉडेल शासकीय सोलर जिल्हा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली.

 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्पाची अमंलबजावणी होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या जिल्ह्यात जलद गतीने शासकीय इमारतींचे सौरीकरण करण्यात येईलत्या जिल्ह्यास मॉडेल शासकीय सोलार जिल्हा’ म्हणून घोषित केले जाईल. यासाठी स्पर्धा घेतली जाणार असून यात सहभाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील पत्र संबंधित जिल्हाधिकारी व महाव्यवस्थापक (महाऊर्जा) यांना प्रमाणित करून पाठवावे लागणार आहे.

महाऊर्जामार्फत पत्रांची छाननी केल्यानंतर ज्या जिल्ह्यात सर्वाधिक सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होतीलअशा जिल्ह्यांना मॉडेल शासकीय जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येईल.

  दि. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम विजेत्यास पाच लाख रुपयेसन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक ३ लाख तर तृतीय पारितोषिकासाठी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. नागरी सेवा दिनी ( २१ एप्रिल २०२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.


वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी

 वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय

निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी

 

मुंबई, दि. ११ : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ (आयएसएफआयोजित वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (अंडर-15 बॉईज व गर्ल्स) चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान शांग्लूओचीन येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यस्तरावरील निवडीसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नेरूळ जिमखानानेरूळनवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक यांनी दिली आहे.

चीन येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवरील निवड चाचणी २५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलमहाळुंगे-बालेवाडी येथे घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागासाठी निवड चाचणी नेरूळ जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेरायगड व पालघर जिल्ह्यांतील १५ वर्षांखालील पात्र मुले व मुली या चाचणीत सहभागी होऊ शकतील. या निवडीतून विभागातील सर्वोत्तम पाच मुले व पाच मुली यांची निवड राज्यस्तरासाठी केली जाईल. यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० नंतर आणि १ जानेवारी २०१४ पूर्वी झालेला असावा.

तसेचइंग्रजीतील मूळ जन्म दाखला अनिवार्य असणार आहे. राष्ट्रीय चाचणीवेळी किमान सहा महिन्यांची वैधता असलेला भारतीय पासपोर्ट आवश्यकविभागीय चाचणीवेळी पासपोर्ट अर्जाचा पुरावा सादर करणे आवश्यक. आधार कार्ड आवश्यकपहिल्या इयत्तेच्या प्रवेशाची शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदणीची सत्यप्रत आवश्यकभोजन व्यवस्था खेळाडू किंवा संबंधित शाळेने स्वतः करावी असेही विभागीय उपसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

 ‘आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

 

मुंबईदि. ११ : शासनसमाज आणि व्यक्ती यांच्यातील सुसंवाद दृढ करण्यासाठी तसेच विचारप्रवृत्त व माहितीपूर्ण लेखन वाचकांसमोर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "आपलं मंत्रालय" या गृहपत्रिकेचा विशेषांक मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

या प्रकाशन सोहळ्यास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेषांकात "भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास", "शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध" यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत. शासनाच्या कार्याचे संवेदनशील व मानवी रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सकारात्मक संवादाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.

"आपलं मंत्रालय" या उपक्रमातून वाचकसमाज आणि शासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व बळकट होईल, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हा विशेषांक https://publuu.com/flip-book/945595/2075357 या लिंकवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

 जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेबीड- अजित आशाताई अनंतराव पवारनागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळेअहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटीलगोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळसांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटीलनाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजनपालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकजळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटीलअमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसेयवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोडरत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंतधुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावलजालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडेनांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावेचंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईकेसातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाईमुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलारवाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणेरायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरेलातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेनंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटेसोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरेहिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळभंडारा- संजय सुशिला वामन सावकारेछत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाटधाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईकबुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणेअकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकरकोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकरगडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वालवर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर.

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालयकोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्तकोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावेअसेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत;

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 

मुंबईदि. 11 : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेअसे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी द्रुतगती महामार्ग करावा -

 कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्ग


चौपदरी द्रुतगती महामार्ग करावा - पणनमंत्री जयकुमार रावल यांची मागणी

नवी दिल्ली, 6: कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गच्या चौपदरी द्रुतगती महामार्गात रूपांतरची मागणी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. तसेच,सारंगखेडा येथील तापी नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंतीही केली.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणारा कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा हा राष्ट्रीय महामार्ग सध्या दोनपदरी आहे. वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण अत्यंत आवश्यक बनले आहे. याबाबत जयकुमार रावल यांनी नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा महामार्ग द्रुतगती चारपदरी मार्गात विकसित करण्याची मागणी केली. याशिवाय, सारंगखेडा येथील तापी नदीवरील नव्या आधुनिक पुलाच्या बांधकामाला गती देण्याची मागणीही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आशा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi