Tuesday, 12 August 2025

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे आवाहनmahotsav.plda@gmail.com,

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

 

मुंबईदि. 11 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे शासन क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का. २दिनांक २० जून२०२५ अन्वये सुरु होणा-या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" मधील विहीत नमून्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेस्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर गणेश चतुर्दशीच्या एक दिवसा पूर्वीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेतअसे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र आणि व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत प्रकल्प संचालकपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांचेकडे सादर करतील.

या गणेशोत्सव स्पर्धेच्या निकालाचा दिनांकसर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमंत्रालय यांचेकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतीलअसे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची 'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम -

 सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची

'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

  • नाशिक येथे मोहिमेचा आरंभ

 

मुंबईदि. ११ :- सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी मोहिमेचा आरंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आला.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेही मोहीम दिवाळी संपेपर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून मिठाईखाद्यतेलखवामावा दूध इ. अन्न पदार्थाच्या गुणवत्तेवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार  आहे.

राज्यात आगामी काळात साजरे होणारे सण पोळागणेशोत्सवईदगौरी पूजननवरात्र महोत्सवदसरा व दिवाळीच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यासत्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अखाद्यअपायकारक नमुने नियमानुसार नष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम२००६ व अन्न सुरक्षा आणि मानके नियम२०११ नुसार शास्ती बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधीक्षकमहानगरपालिका आयुक्त यांचाही सहभाग असणार आहे. सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील टोलनाक्यांवर परराज्यातून येणाऱ्या खव्यासारख्या पदार्थ्यांच्या अचानक तपासणी मोहिम सोबतच सुरक्षित अन्न पदार्थाबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही मोहीम दिवाळीसंपेपर्यंत दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

सप्ताह (1 ते 7 ऑगस्ट) दरम्यान 2 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात

महसूल सप्ताह उत्साहात साजरा

 

मुंबईदि. 11 : मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाने या सप्ताहात नागरिकांना वेळेतपारदर्शक आणि कार्यक्षम सेवा पुरविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

            महसूल दिन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावीअसे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी महसूल दिनाचे महत्त्व स्पष्ट करून महसूल प्रशासनातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

महसूल सप्ताह (1 ते 7 ऑगस्ट) दरम्यान 2 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान राबवून कार्यालयातील शाखांची स्वच्छतादस्तऐवजांचे वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वितरित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत 4 ऑगस्ट रोजी मुंबई शहरात उत्पन्न दाखलेअधिवास प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रआयुष्मान कार्ड आदी सेवा देणारी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये प्राप्त अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी कफ परेडकुलाबा येथे विशेष शिबिरासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

गौण खनिज विभागांतर्गत परवान्यांची तपासणी 7 ऑगस्ट रोजी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच तृतिय पंथियांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

याचबरोबर दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या महसूल सप्ताह कालावधीत राबविलेले शिबीरांद्वारे तसेच फिरते पथकाद्वारे उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्रांबाबत एकूण 2,074 अर्ज प्राप्त झाले असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधारकार्डशिधापत्रिकासंजय गांधी निराधार योजना लाभमतदार नोंदणी व मतदार ओळखपत्र तसेच आरोग्य तपासणीसाठी लवकरच शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे.

तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा

 तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा

- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करण्याचे निर्देश

मुंबईदि. ११ : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील तलावामध्ये गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते. तर राज्यातील प्रादेशिक उपायुक्तसर्व सहायक आयुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

      ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्यानंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले कीतलावातील गाळ काढल्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढणार आहे. हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वयाने कार्यक्रम आखावा. तलावांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी. कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. जितकी चांगली शिस्त राहील तितके चांगले उत्पादन वाढेल. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी मत्स्योत्पादन वाढीसाठी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे मंत्री श्री.राणे यांनी सांगितले.

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५’चे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार उद्घाटन

 कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५चे

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार उद्घाटन

कौशल्यरोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती

 

मुंबईदि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन  महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.  या महाकुंभात एकूण १६ प्रकारच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा होणार असूनमल्लखांबकबड्डीखो-खोभालाफेकविटी - दांडूकुस्तीलगोरी,  लंगडीरज्जूमलखांबपारंपारिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसंघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या महाकुंभ कालावधीत खेळाडूंना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

 रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

•          जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश

•          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार

लातूरदि. ११ (जिमाका) : लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असूनयामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरेआमदार विक्रम काळेआमदार संभाजी पाटील-निलंगेकरआमदार संजय बनसोडेआमदार अभिमन्यू पवारआमदार रमेश कराडमाजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकरमाजी आमदार गोविंद केंद्रेविशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीनापोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनाजिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावात्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत. घरणीतिरू आणि देवर्जन या प्रकल्पांतून जलवाहिनींद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावाअसे त्यांनी सांगितले. तसेचहाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. पांदण रस्त्यांवरील विद्युत खांब तातडीने हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकासकामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात सुरु असलेली विकासकामेतसेच प्रस्तावित कामांविषयी माहिती सादर केली.

पाईट-खेड येथील अपघाताची घटना दुर्दैवी; अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत

 पाईट-खेड येथील अपघाताची घटना दुर्दैवी;

अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु;

मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 11 :- पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेततसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावीयासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतया कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे असेउपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीपाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनपोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहितीउपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.

Featured post

Lakshvedhi