Monday, 11 August 2025

शेतकरी हित लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी धोरण तयार करणार

 शेतकरी हित लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी धोरण तयार करणार

-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 6 : प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजेही राज्य शासनाची भूमिका आहे. यानुसार पाणंद रस्ते तयार करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून सप्टेंबर अखेर सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत/ पाणंद रस्ते तयार करण्याबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची पहिली बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेरोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह समिती सदस्य आमदारमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेसंबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेशेत/ पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या शेताला रस्ता मिळावा या उद्देशाने शासनाने 12 फुटांचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. हा रस्ता तयार करण्याबाबत आजच्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने याबाबत अभ्यास करुन सूचना केल्या आहेत. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट तयार करण्यात येईल. सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या अभ्यास गटाने 15 दिवसांत आपला अहवाल आणि सूचना दिल्यानंतर समिती आणि अभ्यासगटाच्या बैठका होऊन सप्टेंबर अखेर अंतिम आराखडा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईलअसे त्यांनी सांगितले.

 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेशेत/ पाणंद रस्त्यांसंदर्भातील कायदे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा मेळ घालून मध्यम मार्ग काढावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र निधीची तरतूद करुन दर्जेदार रस्ते तयार करावेत. यासाठीचे जुने शासन निर्णय रद्द करुन नवीन शासन निर्णय काढावा आणि यामध्ये खासगी जागेत रस्ता तयार करण्यासाठीची तरतुदीचा स्पष्ट उल्लेख असावाअशी सूचना त्यांनी केली. रोजगार हमी योजना मंत्री श्री.गोगावले यांनी कंत्राटदारांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी शेत/ पाणंद रस्त्यांचे काम हा प्राधान्याचा विषय ठरवून याबाबत अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी स्वत:हून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना इतर योजनांमध्ये लाभ देण्यात यावेततसेच रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदाराला डिफेक्ट लायबिलिटी कालावधी निश्चित करुन द्यावाअसेही ते म्हणाले.

 

यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी शेत/ पाणंद रस्ते तयार करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असल्याचे सांगून यासंबंधी विविध सूचना केल्या. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत याबाबतचे सादरीकरण केले.

रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा

 रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या

बांधकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

     मुंबईदि. 6 : राज्यातील जमीन मोजणीचे काम अधिक सुलभअचुकतेने आणि जलद गतीने होण्यासाठी अत्याधुनिक रोव्हर्स महत्त्वपूर्ण आहेत. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाला मनुष्यबळाच्या तुलनेत सध्या 1200 रोव्हर्सची आवश्यकता असून खरेदीसाठी 132 कोटी आणि महसूलमधील बांधकाम सुरू असलेल्या कामांसाठी 1600 कोटींची तरतूद करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. रोव्हर्स आणि लॅपटॉपची खरेदी चांगल्या प्रतीची करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

मंत्रालयात आयोजित महसूल विभागाच्या विविध कार्यालयीन इमारतीसाठी वित्तीय तरतूद आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

यावेळी बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातून जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक सुहास दिवसेनोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे उपस्थित होते.

       उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्यात जमीन मोजणीसाठी ई-मोजणी २.० ही आज्ञावली लागू करण्यात आली असून मोजणीनंतर रोव्हर्सद्वारे अक्षांशरेखांश निश्चित करून जीआयएस प्रणालीमध्ये डिजिटल स्वरूपात मोजणी नकाशाची क प्रत जनतेला उपलब्ध होत आहे. सध्या भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार चार हजार रोव्हर्सची आवश्यकता असून त्यातील 1200 रोव्हर्सच्या खरेदीला मान्यता देत येत आहे. याची टेंडर प्रक्रिया त्वरित सुरू करावी.शिवाय भूसंपादन आणि भूमी अभिलेखच्या पीएलए खात्यामधून लॅपटॉपची खरेदी करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

      राज्यात महसूल विभागांतर्गत विविध कार्यालये आणि निवासस्थानांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. विविध लोकप्रतिनिधीकडून काही नवीन बांधकामांना मान्यता तर प्रलंबित कामांसाठी निधीच्या तरतुदीबाबत निवेदने येतात. शिवाय महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी केलेल्या मागणीची दखल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी घेतली. महसूल विभागाच्या प्रलंबित आणि नवीन कार्यालयीन बांधकामांना 1500 कोटींची तर भूमी अभिलेखच्या कार्यालयांसाठी 100 कोटी अशी एकूण 1600 कोटी रुपयांची तरतूद करून या कामांनाही प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. प्रत्येक कामांना विलंब न लावता त्वरित कार्यवाही सुरू करावीउर्वरित निधींची तरतूद डिसेंबरनंतर करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

     मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले कीराज्यातील भूमी अभिलेख कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास राहतीलयासाठी प्रयत्न करावा. तहसीलदार हा तालुक्यातील प्रमुख असतोत्यांनी वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी छापा मारावा लागत असल्याने पोलिसांच्या सारख्या गाड्या घेण्याची सूचना त्यांनी केली.

समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग

 समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना

सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबईदि. ६ समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा केवळ गौरव नव्हेतर समाजातील इतरांनाही प्रेरणा देण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

मेघाश्रेय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबईत आयोजित सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळ्यात राज्यपाल श्री. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णीराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. रामामूर्तीमेघाश्रेय संस्थेच्या संस्थापिका सीमा सिंह आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पद्म पुरस्कार विजेतेमान्यवर शास्त्रज्ञनामवंत क्रीडापटूसमाजसुधारकशिक्षकआरोग्य तज्ज्ञ आणि आरोग्य नवोन्मेषकज्येष्ठ पत्रकारचित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारतसेच बीज माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्या नगरच्या श्रीमती राहीबाई पोपरे आणि हिवरे बाजारचे परिवर्तन घडवणारे पोपटराव पवार यांच्यासारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

सर्व सन्मानित व्यक्तींनी समाजाला उज्ज्वलतेच्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घ्या आणि देशाच्या विकासात योगदान द्याअसे आवाहन राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

भारत आज आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वासाने वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले कीविकास हा सर्वसमावेशी असावा. अनुसूचित जाती-जमातीमहिलांपासून ते दिव्यांग व तृतीयपंथीयांसह सर्व समाजघटकांचा विकास झाल्यास 'विकसित भारतहे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये जर्मनफ्रेंचजपानीइटालियनकोरियन अशा परदेशी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यातयासाठी कुलगुरूंना प्रोत्साहन दिले आहेअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मेघाश्रेय संस्थेच्या श्रीमती सीमा सिंग यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालशिक्षणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. सन्मान मिळालेल्या मान्यवरांचे  कार्य समाजासाठी दीपस्तंभ’ ठरत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी सर्वोत्तम नागरिक सन्मान कॉफीटेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकरपद्मविभूषण विजय भाटकरज्येष्ठ संगीतकार व गायक पद्मश्री शंकर महादेवनचित्रपट निर्माता इम्तियाज अलीज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. अश्विन मेहतापत्रकार नाविका कुमारप्रा. रवींद्र कुलकर्णीज्येष्ठ गायक कुमार शानूअभिनेता व दिग्दर्शक अजिंक्य देवजिगर सचिन  बॉक्सिंग खेळाडू विजेंद्र सिंगबीज माता पद्मश्री राहिबाई पोपरेशिक्षण तज्ज्ञ डॉ. इंदू सहानीपद्मश्री पोपटराव पवारमहिला चळवळीतील डॉ. वर्षा देशपांडेहनुमान केंद्रे आदींना सर्वोत्तम नागरिक पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे...

 अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे...

 

   - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

 मुंबईदि ६ : रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धाअवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणंहे मोठं पुण्याईच काम आहे. लोकांचे प्रबोधन करून अवयवदान चळवळ अधिक गतिमानव्यापक लोकचळवळ करूया असे आवाहन सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब  कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

            केईएम हॉस्पिटलच्या सभागृहात (आरओटीटी ओ- एसओटीटीओ) संस्थेच्या वतीने जागतिक अवयवदान पंधरवडा निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टररुग्णालयेसेवाभावी संस्था तसेच अवयव रोपण केल्यानंतर विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्यातसेच आरओटीटीओ- एसओटीटीओ मॉडेलचे मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            लोकांच्या मनात अवयवदानाबद्दल अकारण भीती असतेअशीच भिती पूर्वी रक्तदानाबद्दल होती. आता रक्तदान सर्वत्र केले जाते. अवयवदानाबद्दल असलेली भिती व गैरसमज सुद्धा दूर करून अवयवदान ही लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व पातळीवरून लोकाचे प्रबोधनजनजागृती केली पाहिजे. प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करून किडनीडोळेहृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लोकांना आपण नवजीवन देवूयाअसे आवाहन मंत्री.श्री.आबिटकर यांनी केले. 

अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणारे झीटीसीसी(आरओटीटी ओ- एसओटीटीओ)विविध रुग्णालयेतज्ज्ञ डॉक्टरसेवाभावी संस्था यांचे कार्य उत्तम असून येत्या वर्षभरात अवयवदानाची प्रतीक्षा यादी कमी व्हावीअशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवारकेईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावतआरओटीटी ओ- एसओटीटीओ चे संचालक आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालयसायन रुग्णालयनायरबी.जे. मेडिकल कॉलेजकमांड हॉस्पिटल पुणेइंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूरएआयआय एमएस नागपूरडी.वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे तसेचरी-बर्थ फाऊंडेशनलिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.

अवयवदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित (एचएन रिलायन्स हॉस्पिटल) आणि डॉ. सुजाता पटवर्धन (केईमयांना बेस्ट एनटीआरसी ॲवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. 6 : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असूनसरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडेतसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, "राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणेग्रामस्वच्छतासुंदर शाळा उभारणीमहिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणेसौर ऊर्जेचा वापरमहिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा."

तसेचमहा-ई-सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवा व दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी 30 टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातोत्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासका मे करावीतअसेही श्री. गोरे यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई येथे सर्वसुविधायुक्त सरपंच भवन उभारणेयासह विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष शत्रुघ्न धनवडेप्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीसकोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटीलतसेच महिला सरपंच उपस्थित होते.

सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा

 सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा

-         सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. 6 : सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रशस्त स्मारकाच्या निर्मितीसाठी जलसंपदा विभागाकडील जमीन ताब्यात घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीस माजी आमदार दिलीप येळगावकरसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री. बागुलसमाज कल्याण आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त शितल सोनटक्केसातारा सहायक आयुक्त सुनील जाधव उपस्थित होतेतर दूरदृष्यप्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

     सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सुभेदार रामजी आंबेडकर ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामावेळी देखरेखीसाठी होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी या ठिकाणी हे स्मारक पूर्णत्वास आल्यास सुभेदार रामजी आंबेडकर यांचे हे पहिलेच स्मारक असेल. चांगल्या वास्तुविषारदांकडून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा.

स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेने स्विकारावी. यासंदर्भात  ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा. सर्व नियमांनुसार बाबी पूर्ण करून प्रस्ताव सादर करावाअसे निर्देशही श्रीमती मिसाळ यांनी दिले.

००००

लेझिम, फुगडी, लगोरी, विटी-दांडूसह पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५

 लेझिम, फुगडी, लगोरी, विटी-दांडूसह पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत

खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

 

मुंबईदि.७: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचेआयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातमुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवाही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देणे गरजेचे असल्याचेही श्री.लोढा यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान देश विसरू शकत नाही. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहितीही कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी दिली. 

पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडीखो-खोलगोरीलेझीमरस्सीखेच,मल्लखांबपावनखिंड दौडकुस्ती, पंजा लढवणेविटी-दांडू, दोरीच्या उड्याफुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तसेच विविध शाळा,आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही श्री.लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला इथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा भारतीकडून करण्यात आले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi