Sunday, 10 August 2025

साइबर अपराध पर रोक लगाने के लिए महाराष्ट्र के पास दुनिया की सर्वोत्तम प्रणाली और तकनीक

 साइबर अपराध पर रोक लगाने के लिए महाराष्ट्र के पास दुनिया की सर्वोत्तम प्रणाली और तकनीक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गरुड़ दृष्टि’ सोशल मीडिया मॉनिटरिंग और साइबर इंटेलिजेंस की मदद से पूरे 10 करोड़ रुपये संबंधित लोगों को वापस

सोशल मीडिया पर किसी भी प्रलोभन में न आएं! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नागरिकों से आह्वान

गरुड़ दृष्टि’ एआई टूल्स पर प्रस्तुति

 

नागपुरदिनांक 10 :- कुछ समाज विरोधी तत्वों द्वारा सोशल मीडिया पर जातीय द्वेष फैलाने वाली उकसाऊ सामग्री डालने के कारण दंगे भड़कने की घटनाएं पहले भी हो चुकी हैं। ऐसे अपराधों पर रोक लगाने के लिए अब महाराष्ट्र के पास दुनिया की सर्वोत्तम प्रणाली और तकनीक उपलब्ध है। ऐसे लोगों को खोज निकालने और उन पर तत्काल कार्रवाई के लिए 'गरुड़ दृष्टिटूल्स अहम भूमिका निभा रहे हैंयह बात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कही।      

नागपुर पुलिस विभाग की ओर से पुलिस भवन में गरुड़ दृष्टि’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व साइबर इंटेलिजेंस प्रोजेक्ट पर प्रस्तुति और विभिन्न साइबर आर्थिक अपराधों की जांच से प्राप्त कुल 10 करोड़ रुपये की राशि के वितरण समारोह में वे बोल रहे थे। उनके हाथों यह राशि धोखाधड़ी के शिकार संबंधित व्यक्तियों को वितरित की गई। इस अवसर पर पुलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसह-पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पुलिस आयुक्त वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठौड़ और वरिष्ठ पुलिस अधिकारी उपस्थित थे।

मुख्यमंत्री ने कहा कि अपने विचार व्यक्त करने के लिए सोशल मीडिया का उपयोग अच्छा हैलेकिन कुछ समाज विरोधी प्रवृत्तियां नफरत फैलानेधमकी देनेहेट स्पीचफेक न्यूज और मादक पदार्थों की तस्करी के लिए इन प्लेटफार्म का उपयोग करती हैं। इनमें आर्थिक धोखाधड़ी वाले प्लेटफार्म अधिकतर विदेशी ऑपरेटर चलाते हैंइसलिए सभी को सावधान रहना चाहिए। मोबाइल पर आने वाले किसी भी प्रकार के ऑफर्स आर्थिक धोखाधड़ी के लिए बिछाया गया जाल हैयह लोगों को समझना चाहिए। यदि किसी को लगे कि उसके साथ आर्थिक धोखाधड़ी हुई है तो जल्द से जल्द 1930 और 1945 इन नंबरों पर संपर्क करेंऐसा आह्वान मुख्यमंत्री फडणवीस ने किया।

सोशल मीडिया के माध्यम से होने वाली धोखाधड़ी की घटनाओं को रोकने के लिए 'गरुड़ दृष्टिप्रणाली विकसित की गई है। इस प्रणाली के माध्यम से इन प्लेटफार्म पर हो रही आपराधिक गतिविधियों को खोज निकालना और उनका पीछा करना संभव होगा। भविष्य में इस टूल्स का विस्तार और क्षमता वृद्धि की जाएगीयह भी उन्होंने बताया।

आज जिन लोगों को उनके पैसे वापस मिलेउनका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अभिनंदन किया। पुलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल ने प्रास्ताविक भाषण किया। उपायुक्त लोहित मतानी ने कार्यक्रम से पहले गरुड़ दृष्टि पर प्रस्तुति दी। सह-पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ने उपस्थित गणमान्य व्यक्तियों का आभार व्यक्त किया।

गरुड दृष्टी चे वैशिष्ट्ये व यश सोशल मीडिया मॉनिटरिंग pl share

 गरुड दृष्टी चे वैशिष्ट्ये व यश

 सोशल मीडिया मॉनिटरिंग: गरुड दृष्टि सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्ट्स तपासण्यात आल्या आहेत.

 आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई: यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट्सची नोंद घेऊन त्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या आहेत.

 कायदा व सुव्यवस्था नियंत्रण: सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवाद्वेषपूर्ण मजकूरवादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

▪ कमी खर्चातील स्थानिक नवकल्पना: सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असूनयाचे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) नागपूर पोलिसांकडे आहेत.

 बहुपयोगी क्षमता: गरुड दृष्टि केवळ गुन्हे प्रतिबंधासाठीच नव्हेतर समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषणसंशयास्पद खाते शोधणेव तत्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे.

 

फसवणूक झालेल्या लोकांना तपासानंतर परत मिळाल्या अशा रकमा

 फसवणूक झालेल्या लोकांना तपासानंतर परत मिळाल्या अशा रकमा

रोहित अग्रवाल 73 लाख रुपयेशशिकांत नारायण परांडे 34 लाख 77 हजार 724, देविदास पारखी 35 लाख 15 हजार 842, विजय प्रकाश पाठक 19 लाख 90 हजार 354, विजय मेनघाणी 19 लाख रुपयेदेवेंद्र खराटे 12 लाख 81 हजारश्रीमती राजमनी अजय जोशी 29 लाख 95 हजारराहुल चावडा 15 लाखबुद्धपाल बागडे 10 लाखआदित्य गोयंका 26 लाख 20 हजार 556, संगीता आष्टणकर 8 लाख 24 हजार रुपये या प्रमाणे रक्कम परत करण्यात आली. ही प्रातिनिधिक नावे आहेत

आदिवासी समाज शब्दाला पक्का ‘नाही’ म्हटले तर नाहीच –

 आदिवासी समाज शब्दाला पक्का ‘नाही’ म्हटले तर नाहीच – आमदार विलास तरे


# आपल्या आदिवासी समाजाची एकजुटीची गरज; जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रेरणादायी संदेश


डहाणू / पालघर. ( प्रतिनिधी ) – “आदिवासी समाज हा नेहमीच शब्दाला पक्का असतो. त्याने एकदा ‘नाही’ म्हटले तर तो निर्णय बदलत नाही. जंगल, पाणी आणि निसर्गावर जर कोणाचा खरा अधिकार असेल, तर तो केवळ आदिवासी समाजाचा आहे,” असे प्रतिपादन आमदार विलास तरे यांनी केले.

यावेळी आमदार तरे म्हणाले, “७ ऑगस्ट २०१४ रोजी आदिवासी समाजावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आम्ही ५० हजार लोकांना एकत्र करून ऐतिहासिक आंदोलन उभारले होते. ही ताकद केवळ एकतेमुळेच येते. "आपला वारसा, आपले सण-उत्सव, आपली बोली, आपली परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. त्यांचे जतन करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचे रक्षण करणे." "आपली संस्कृती म्हणजे आपली ताकद. आपला पोशाख, वाद्ये, गाणी, नृत्य ही जगाला प्रेरणा देणारी अमूल्य संपत्ती आहे. पण ती फक्त जतन करून चालणार नाही, तिला पुढील पिढीकडे अभिमानाने पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे." त्यांनी युवकांना शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. “आपण एकत्र आलो, तर आपल्या हक्कांवर कोणीही गदा आणू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपल्या आदिवासी समाजाला एकजुटीची आवश्यकता आहे. असे आ. तरे यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण म्हणाले की, आदिवासी समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या साठी आमचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आपल्या पाठीशी आहेत. आम्ही आपल्या समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करू. "आगामी पाच वर्षांत आदिवासी बहुल भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवू. रोजगार निर्मितीसाठी स्थानिक उद्योगांना चालना देऊ." त्यांनी महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प, तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याची घोषणाही केली.

सरपंच रुपजी कोल म्हणाले की, आमचे ध्येय म्हणजे समाजाचा विकास आणि हक्कांचे रक्षण करणे आहे. आमच्या कार्यक्रमाची नक्कल काही लोक करतात. त्याची आम्हाला गय नाही. आणि मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून आपण दिलेली ताकत व पाठिंबा त्यामुळे आम्हाला बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी पथनाट्ये द्वारे महामार्गावर होणारे अपघात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची सूचना व दुचाकी स्वरांनी हल्मेट वापरावे असा संदेश देण्यात आला. तसेच, आदिवासी समाजात असलेल्या अशिक्षितेच्या प्रमाणामुळे होणारे बाल विवाह मग त्यातून होणारे गर्भधारणा व त्यामुळे महिलांना होणारा त्रास या बाबत पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली.  पथनाट्याने उपस्थित प्रेक्षकांना भावनिक आणि विचारप्रवर्तक संदेश दिला.

यावेळी अनेक ठिकाणी असलेल्या विविध जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार अमित घोडा, पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, आगवन ग्रामपंचायत सरपंच रुपजी कोल, विलास सपाटे, डॉ. आदित्य अहिरे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणावर आदिवासी बंधू - भगिनींना उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून, आपल्या ओळखीचे, परंपरेचे आणि हक्कांचे जतन करण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट एकतेच्या घोषणांनी आणि हक्कांच्या लढ्यात खंबीर राहण्याच्या निर्धाराने झाला.

-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न

 






नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री


 


नागपूर दि.10: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.


आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे आज नागपूर (अजनी) -पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.


नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे.


या प्रसंगी रेल्वेस्थानकाचा परिसर पुष्पहार, तोरण, पताका व फुलांनी सजवण्यात आला होता. मुख्यमंत्री व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील रेल्वे मार्गांचा विकास म्हणजे विकसित भारताला आधुनिक आणि गतिमान प्रवास सुविधांची भेट असून या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास आता सुलभ आणि गतिमान होणार आहे. या सुविधेमुळे स्थानिकांना व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या 

संधींची उप

सोलापुरातील रे नगर मधील कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

 सोलापुरातील रे नगर मधील कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

-सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

 

मुंबईदि. ३०: सोलापूर शहरातीलरे नगर येथे कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. या वसाहतींमध्ये कामगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिल्यास कामगार रोजगारक्षम होतील. त्यादुष्टीने येथील रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी औद्योगिक वसाहती किंवा अन्य पर्यायांची पडताळणी करावीअसे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी  मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

रे नगर येथील रहिवाशांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सुभाष देशमुखउद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाहगृहनिर्माण विभागाचे उपसचिव श्री. कवडे आदींसह सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणालेस्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उद्योग विभागाच्या समन्वयातून समूह विकास किंवा सहकारी औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात याव्यात. येथील कामगारांना राहण्याच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईलयाबाबत प्रर्याय तपासावे उद्योगासाठी जागेच्या उपलब्धतेकरिता म्हाडाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. असेही डॉ. भोया यांनी सांगीतले.

होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अ‍ॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार उपलब्ध

  

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi