Sunday, 10 August 2025

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा

 महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील

रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. ३० : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालच्या रहिवाशांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. जे रहिवासी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेतत्यांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरण कामाचा  आढावा घेतला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळमाजी आमदार समीर भुजबळनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. तर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीस्मारक विस्तारिकरण व एकत्रिकरणाच्या भूसंपादन कामासाठी राज्य शासनाने २०० कोटींचा निधी दिला आहे. मात्र अद्याप भूसंपादनाची कामे सुरु झाली नाहीत. स्मारकासभोवतालच्या सुमारे एक हजार राहिवाशांना अन्यत्र स्थलांतरीत करण्यासाठी पर्याय दिले आहेत. त्यातील २०० रहिवासी पर्यायी ठिकाणी जाण्यास तयार आहेतत्यांच्याकडून स्थलांतराची कार्यवाही करावी. इतर रहिवाशांना टप्प्या टप्प्याने हलविण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या १५ दिवसात भू संपादनची प्रक्रिया सुरु करावी.

अन्ननागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले कीस्मारकाच्या विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यात येत असून जे नागरिक तेथून पर्यायी जागेच्या ठिकाणी जाण्यास तयार आहेतत्यांचे स्थलांतर पहिल्या टप्प्यात करुन त्यानंतर इतरांना स्थलांतरीत करावे.

पुणे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर यांनी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाखांचा धनादेश

 नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून

 मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाखांचा धनादेश

 

मुंबईदि. ३० : राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबवित मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलकबॅनरपुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.

माजलगाव ते केज,परतूर ते माजलगाव पॅकेज कामांची दुरुस्ती कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत

 माजलगाव ते केज,परतूर ते माजलगाव पॅकेज कामांची दुरुस्ती कामे

 मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. ३० : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत बीड जिल्ह्यातील माजलगाव ते केज व जालना जिल्ह्यातील परतुर ते माजलगाव पॅकेजच्या कामांची दुरुस्ती व उर्वरित कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच माजलगाव शहरातील पाईपलाईनच्या पूर्ण झालेल्या कामांची चाचणी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत माजलगाव ते केज (जि. बीड) व माजलगाव ते परतूर (जि. जालना) या कामाबाबत  बैठक झाली.

 

यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्रीनिवास कातकडेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखरस्ते वाहतूक आणि महामार्गचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीवगेराष्ट्रीय महामार्गच्या अधीक्षक अभियंता वृषाली गाडेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 मौजे सादोळा जवळील छोट्या पुलाचे जोडरस्त्याचे काममौजे सावंगीगंगा किनारा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे चालू असलेले काममौजे सावंगीगंगा किनारा गावाजवळ छोट्या पुलांचे व जोडरस्त्याची कामेमौजे श्रीष्टी येथील चालू असलेली कामे मार्च २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने माजलगाव शहरातील नालीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

           

यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) मधील माजलगाव शहरातील नालीचे बांधकाम करणेरस्त्यांची दुरुस्ती करणे,  पाईपलाईनचे काम पूर्ण करणेमाजलगाव ते परतूर पॅकेजचे काम पूर्ण करणेमाजलगाव ते केज पॅकेजमधील रस्त्याची दुरुस्ती करणे आदी कामांविषयी चर्चा झाली.

आयएमएमएएसटी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील करार -

 आयएमएमएएसटी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील करार - परिचारिकांसाठी व्यावहारिक प्रशिक्षणाचा नवा टप्पा

 

आयएमएमएएसटी ही राष्ट्रीय संस्था अतिदक्षता विभागपरिचर्यासर्जरी इत्यादी क्षेत्रातील हायपर-रिॲलिस्टिक सिम्युलेशन आधारित प्रशिक्षणासाठी ओळखली जाते. या कराराअंतर्गत पुढील ३ वर्षांत महाराष्ट्रातील १,००० परिचारिकापरिचारिका विद्यार्थी व सहयोगी आरोग्य सेवा व्यावसायिक यांना आयएमएमएएसटीच्या माध्यमातून अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात मास्टर ट्रेनर्स तयार करून प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

 आरोग्य सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणार आहे. हा करार ३ वर्षांचा असूनआवश्यकतेनुसार विस्तार केला जाऊ शकतो.

आयएमएमएएसटीने आतापर्यंत २५,००० हून अधिक डॉक्टर आणि नर्सेसना २३ सुपर स्पेशालिटी विभागामध्ये प्रशिक्षण दिले असून३५ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

000

पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यातील सामंजस्य करारामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि धोरण निर्मितीचा नवा अध्याय

 सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पीएचएफआयआयएमएमएएसटी यांच्यातील सामंजस्य करारामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षणसंशोधन आणि धोरण निर्मितीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. या करारामुळे आरोग्य क्षेत्रात तांत्रिक सहकार्य आणि धोरण पातळीवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. या दोन करारांमुळे महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या अधिक सशक्त होणार आहे.

पीएचएफआय ही संस्था भारतात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणसंशोधन व धोरण निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या कराराअंतर्गत खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे :

- राज्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम.

- सार्वजनिक आरोग्य धोरणप्रशिक्षण धोरण आणि तांत्रिक सहकार्य यासाठी पीएचएफआयकडून मार्गदर्शन.

- आरोग्य प्रणाली व धोरणांवर आधारित संशोधननवतंत्रज्ञान आणि अंमलबजावणी.

- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ महाराष्ट्रात स्थापन करण्याची शक्यता.

- हा करारनामा ५ वर्षांसाठी असूनपरस्पर सहमतीने आणखी ५ वर्षे वाढवता येईल.

पीएचएफआयने गेल्या १७ वर्षांत ४५,००० हून अधिक प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे. संस्थेने भारतातील ५८३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून धोरण निर्मितीपासून ते व्यावसायिक प्रशिक्षणराष्ट्रीय तज्ज्ञ यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

 आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआयआयएमएमएएसटी

यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती

 

मुंबईदि. ३० : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अ‍ॅन्ड मिनिमल अ‍ॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (आयएमएमएएसटी) या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकवैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमारआरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडेआरोग्य सेवा संचालक तसेच दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारीप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया दोन्ही सामंजस्य करारामुळे आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेलजे त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना माझी अत्यंत महत्वाकांक्षी, भाग 2,pl share

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना माझी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. खासगी आणि शासकीय जागेत विकसित होणा-या सौर प्रकल्पासाठी स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.जिल्हास्तरीय टास्क फोर्सने या योजनेच्या वेळोवेळी होणा-या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा.कामे करण्यासाठी ना- हरकत दाखले,विकासकांना येणा-या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतून सप्टेंबर २०२५ पर्यंत पाच हजार मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध होईल याप्रकारे जिल्हानिहाय कामांना गती देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीपर्यायी जमिनींचा भाडेपट्टा देणे,पिक अतिक्रमण हटविणे,कायमस्वरूपी रचनांचे अतिक्रमण काढणे, रस्ता पुन्हा तयार करणे आणि आवश्यकतेनुसार जमिनीचे वेळेवर मोजमाप व सीमांकन करणे तसेच ग्रामपंचायतींना ना हरकत दाखले देणे ही कामे जिल्हाधिकारी यांनी प्राधान्याने करावीत. सौर प्रकल्पाच्या साहित्याची चोरी झाल्यास पोलीसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. दाट लोकवस्ती असलेल्या भागात योजनेचे काम करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी. झाडांसंदर्भात मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, वीज वाहिनी वन क्षेत्रातून जात असल्यास वन विभागाकडून परवनगी लवकरात लवकर देण्यात यावी. खासगी तसेच लगतच्या वन क्षेत्रासाठी नाहरकत परवानग्या विहित वेळेत देण्याची कार्यवाही वन विभागाने करावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

             यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरग्रामविकास विभागाचे एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीमहापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी.महाऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व  जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित  होते.

००००

Featured post

Lakshvedhi