Tuesday, 5 August 2025

अवकाळीमुळे बाधित झालेल्या 3 लाख 98 हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी 337 कोटी 41 लाखाच्या निधीस मान्यता

 अवकाळीमुळे बाधित झालेल्या 3 लाख 98 हजार शेतकऱ्यांना

मदतीपोटी 337 कोटी 41 लाखाच्या निधीस मान्यता

 

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. 26:- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे 2025 या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी  छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी  ५९ कोटी ९८ लाख २० हजारपुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार,नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजारकोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजारअमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

 मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

 

 मुंबईदि. 26:- यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये मातीचा मलबा ढासळल्याने दि. 25 रोजी सायंकाळी काही काळ वाहतूक बंद झाली होती. याबाबत तात्काळ कार्यवाही करून महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

      एक्सप्रेस वे वर 45/300 किमी अंतरावर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये रस्त्यावर झाडाच्या फांद्या व काही मातीचा मलबा ढासळला होता. काही काळ वाहतूक बंद झाल्याने त्याबाबत माध्यमातून वृत्त आले होते. एमपीईडब्ल्यू पॉईंट येथे तैनात असलेल्या पथकाने जेसीबी व यंत्रणेच्या सहाय्याने पावणे सात वाजता ते पूर्णपणे दूर करण्यात आले. महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली.

तोपर्यंत एक लेन मोकळी करण्यात आली. त्यानंतर 18:44 वाजता सर्व लेन मोकळी करण्यात आल्या आणि 18:45 पर्यंत वाहतूक पूर्णपणे मोकळी झाली. एक्सप्रेसवेची वाहतूक स्थिती सामान्य आहे आणि सर्व लेनमधील सर्व वाहनांसाठी खुली आहेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा

 आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा

प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबई, दि. 29 : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावातसेच त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईकेअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईकआमदार भीमराव केरामनितीन पवारआमश्या पाडवी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुखआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअर्थसंकल्पात एकूण रकमेच्या प्रमाणात अनुसूचित जातीजमातींना निधीचे वितरण निकषाप्रमाणे करण्यात येते. आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहांची कामे दर्जेदार झाली पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            यावेळी भौतिकदृष्ट्या पूर्ण व प्रगतीपथावरील रस्ते व पुलांची कामेलेखाशीर्ष 3054 अंतर्गत कामे, ठक्कर बाप्पा योजना, शासकीय आदिवासी विभागातील इमारतींची बांधकामेअधिसंख्य झालेल्या जागेवर विशेष भरती, राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये रोजंदारीवरतासिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

००००

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

 पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी

तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

 

मुंबईदि. २९ :- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड)राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत)तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगावचाकणशिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावेअशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीपुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या चार लेन असलेला हा रस्ता सहा लेनमध्ये रुपांतर करावाराष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेनमध्ये रूपांतर करावातसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगावचाकणशिक्रापूर) – सध्या दोन लेन असलेला मार्ग सहा लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्थाऔद्योगिक पट्टावसाहतीरुग्णालयेपेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कीया मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तत्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावेजेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळेबाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेचतळेगावचाकणशिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहेजेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.

गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार

 गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे

 पर्यटन सुरक्षा दल नेमणार

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ४ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे  पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यासंदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या निवासस्थानी मेघदूत येथे बैठक झाली. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपयटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

       मंत्री श्री. देसाई म्हणालेसध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दल हा उपक्रम सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढविण्यात येत आहे. मुंबईत पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असून पर्यटकांना सुरक्षा दिल्यास सुरक्षित पर्यटन होऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन
 गेट वे ऑफ इंडिया
, गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे 
पर्यटक सुरक्षा दल नेमण्यात यावेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

००००००

प्रो गोविंदा लीग 2025 वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण 7 से 9 ऑगस्ट तक रोमांच

 प्रो गोविंदा लीग 2025 

वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण

7 से 9 ऑगस्ट तक रोमांच 



मुंबई, 5 अगस्त 2025: 'ग्लोबल वेंचर्स' के तहत काम करने वाली 'अस्पेक्ट स्पोर्ट्स' ने 'प्रो गोविंदा लीग 2025' के लिए 'वाराणसी महादेव असेंडर्स' का अधिग्रहण कर लिया है। पहले यह टीम 'ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक' (मालाड पश्चिम) के नाम से जानी जाती थी। यह अधिग्रहण ₹74 लाख में हुआ है।

अब यह टीम 'वाराणसी महादेव असेंडर्स' के नए नाम से 7 से 9 अगस्त तक मुंबई के वर्ली स्थित एनएससीआई डोम में होने वाली इस बहुप्रतीक्षित प्रतियोगिता में भाग लेगी।

अस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स की कार्यकारी अध्यक्षा, श्रीमती अक्षा कंबोज ने इस अधिग्रहण पर बोलते हुए कहा, “हमें ऐसी टीम के साथ प्रो गोविंदा लीग 2025 में हिस्सा लेने पर बहुत गर्व है, जो धैर्य, अनुशासन और गहरी सांस्कृतिक जड़ों का प्रतीक है। वाराणसी महादेव असेंडर्स सिर्फ एक टीम नहीं, बल्कि भारत के युवाओं की भावना का प्रतिनिधित्व करती है, जो परंपरा और टीम वर्क के जरिए आगे बढ़ते हैं।”

यह लीग महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त है और यह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के विचारों से प्रेरित है। इस लीग का उद्देश्य दही हांडी की सदियों पुरानी परंपरा को एक सुरक्षित, प्रशिक्षित और प्रायोजित पेशेवर खेल में बदलना है।

इस साल के टूर्नामेंट की कुल पुरस्कार राशि ₹1.5 करोड़ है, जिसमें विजेता टीम को ₹75 लाख मिलेंगे। इसके अलावा, प्रत्येक टीम को भागीदारी प्रोत्साहन के रूप में ₹3 लाख दिए जाएंगे, जिससे यह लीग एक गंभीर प्रतिस्पर्धी मंच के रूप में स्थापित होगी। श्रीमती अक्षा कंबोज के स्वामित्व वाली वाराणसी महादेव असेंडर्स अपनी मजबूत भावना और विरासत को राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाने के लिए तैयार है।

----------------------

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार pl share



 मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार 


मुंबई, ५ ऑगस्ट २०२५ : ' ग्लोबल व्हेंचर्स 'अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘अस्पेक्ट स्पोर्ट्स'च्या वतीने बहुप्रतिक्षित 'प्रो गोविंदा लीग २०२५' साठी पूर्वी ओम ब्रह्डमांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाचे आता ७४ लाख रुपयात अधिग्रहण केले असून त्यानंतर या पथकाचे वाराणसी महादेव अॅसेन्डर्स नावाने रिब्रॅंड करण्यात आले आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट डार्विन ही स्पर्धा पार पडणार आहे.

या अधिग्रहणावर बोलताना अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अक्षा कंबोज म्हणाल्या की, “धैर्य, शिस्त आणि सखोल मुळे असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचे मूर्त स्वरूप असलेल्या संघासह प्रो गोविंदा लीग २०२५ मध्ये सहभागी होण्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. वाराणसी महादेव अॅसेन्डर्स म्हणजे निव्वळ संघ नसून परंपरा आणि सांघिक कार्याद्वारे उदयास येणाऱ्या भारताच्या युवकांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता लाभलेल्या प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही लीग, शतकानुशतके जुनी परंपरा सुरक्षितता, प्रशिक्षण आणि प्रायोजकत्वाद्वारे समर्थित व्यावसायिक, दूरचित्रवाणीवरील क्रीडा स्पर्धेत रूपांतरित करून दहीहंडीच्या खेळात क्रांती घडवून आणणार आहे.

या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य १.५ .कोटी रुपयांचे असून ज्यात विजेत्यांसाठी ७५ लाख रुपयांचा  समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघासाठी ३ लाख रुपयांचा सहभाग प्रोत्साहन मूल्यासह, एक गंभीर स्पर्धात्मक व्यासपीठ म्हणून लीगची स्थिती मजबूत करते. श्रीमती अक्षा कंबोज यांच्या मालकीची वाराणसी महादेव अॅसेन्डर्स ही संस्था त्यांची प्रबळ भावना आणि वारसा राष्ट्रीय प्रकाशझोतात आणण्यासाठी सज्ज येत्या गोविदात सज्ज होत आहे.


Featured post

Lakshvedhi