Tuesday, 15 July 2025

Maharashtra to become the country’s largest electric‑vehicle manufacturing hub,

 Maharashtra to become the country’s largest electric‑vehicle manufacturing hub,

says Chief Minister Fadnavis;

Inaugurates Tesla showroom as Tesla officially enters India

Mumbai, July 15 : Chief Minister Devendra Fadnavis expressed confidence during the inauguration of Tesla’s Experience Centre that Maharashtra will become the state with the highest electric-vehicle (EV) manufacturing capacity in India.

World-renowned EV manufacturer Tesla has entered the Indian market. Their first Experience Centre in India—based in Mumbai—was inaugurated by CM Fadnavis, with Transport Minister Pratap Sarnaik, Principal Secretary/CEO Kaustubh Dhavse, and Tesla representatives also present.

CM Fadnavis said this was momentous for Maharashtra and Mumbai, as "the world’s smartest car" arrives in India, and officially starts here under central government support. The Mumbai centre is not just an Experience Centre but also a delivery location, logistics and service unit. Bookings for Tesla cars have also begun here.

Tesla’s global bestseller, the Model Y, has been launched in India today. According to the CM: it charges in about 15 minutes, covers up to 600 km on a single charge, produces zero emissions, and is globally acclaimed for its safety features.

The state government has implemented a dynamic policy to promote EVs, offering special incentives in charging infrastructure, tax exemptions, and manufacturing. The CM believes Maharashtra will lead India’s EV industry in the near future. After Mumbai, services will expand to two more Indian cities, and in Mumbai alone four large charging hubs and 32 charging stations are being set up.

महाराष्ट्र देश में सबसे बड़ी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाला राज्य बनेगा,pl shate

 महाराष्ट्र देश में सबसे बड़ी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाला राज्य बनेगा,

मुख्यमंत्री फडणवीस का विश्वास;

टेस्ला का आधिकारिक प्रवेशमुख्यमंत्री ने शो रूम का उद्घाटन किया

मुंबई१५ जुलाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने टेस्ला एक्सपीरियंस सेंटर के उद्घाटन समारोह में कहा कि महाराष्ट्र देश का सबसे बड़ा इलेक्ट्रिक वाहन (ईवी) उत्पादन केंद्र बनने की दिशा में अग्रसर है।

विश्व प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला ने भारतीय बाजार में प्रवेश किया है। मुंबई में उनका पहला एक्सपीरियंस सेंटर मुख्यमंत्री फडणवीस ने उद्घाटित किया। इस अवसर पर परिवहन मंत्री प्रताप सरनाइकमुख्य कार्यपालक अधिकारी कौस्तुभ धवसे और टेस्ला कंपनी के प्रतिनिधि उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र व विशेष रूप से मुंबई के लिए यह गर्व की बात है कि "दुनिया की सबसे स्मार्ट कार" भारत आ रही हैऔर उसकी शुरुआत महाराष्ट्र से हो रही है। मुंबई का यह सेंटर केवल एक्सपीरियंस सेंटर नहीं हैबल्कि डिलीवरी लोकेशनलॉजिस्टिक्स और सर्विस यूनिट भी है। यहां से टेस्ला कारों की बुकिंग भी शुरू हो चुकी है।

टेस्ला का ग्लोबली बेस्टसेलिंग मॉडल ModelY आज भारत में लॉन्च किया गया। मुख्यमंत्री के अनुसार इसे केवल १५ मिनट में चार्ज किया जा सकता हैएक बार चार्ज में यह ६००किमी तक चल सकती हैयह शून्य प्रदूषण उत्पन्न करती है और इसके सुरक्षा फीचर्स वैश्विक स्तर पर प्रतिष्ठित हैं।

राज्य सरकार ने इलेक्ट्रिक वाहनों को बढ़ावा देने के लिए गतिशील नीति लागू की हैजिसमें चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरकर छूट और उत्पादन के लिए विशेष प्रोत्साहन शामिल हैं। मुख्यमंत्री ने कहा कि निकट भविष्य में महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योग में देश में अग्रणी राज्य बनेगा। मुंबई के बाद दो अन्य भारतीय शहरों में सेवाएं विस्तारित की जाएंगीऔर मुंबई में चार बड़े चार्जिंग हब तथा 32 चार्जिंग स्टेशन भी तैयार किए जा रहे हैं।

0000

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा

 कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा

– मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. १५ : कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी माध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेतअसे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबाडी पाणीपुरवठा योजनेऐवजी शिवना टाकळी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजना जाधवमाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कन्नड शहराच्या नागरिकांसाठी वाढत्या गरजेनुसार योग्य व शाश्वत पाणीस्रोतांचा विचार करूनदोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर करावेतअसेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

OOOO

कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार

 कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

राज्यस्तरीय समिती स्थापन करणार

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 15 : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञडॉक्टरस्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा समावेश असणार आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार असूनतिच्या शिफारसींमुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईलअसा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे राज्यस्तरावर योग्य निरीक्षण होण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती शहरीग्रामीण आणि शालेय स्तरावरील रुग्ण शोध मोहीमउपचारतसेच पुनर्वसन यासाठी कार्यपद्धती निश्चित करेल आणि राज्यभरातील कामकाजाचे मार्गदर्शन करेल.

बैठकीत राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी अनुदानवाढीची मागणी मांडली. सध्या राज्यात कुष्ठरोगावर उपचार करणाऱ्या 12 स्वयंसेवी रुग्णालयांमध्ये 2,764 खाटा आहेततर पुनर्वसन करणाऱ्या 11 संस्थांमध्ये 1,825 खाटा मंजूर आहेत. यातील रुग्णालय तत्त्वावरील संस्थांना प्रति खाटा प्रतिमाह रु. 2,200 तर पुनर्वसन संस्थांना रु. 2,000 इतके अनुदान मिळते. हे अनुदान वाढवून रु. 6,000 प्रति खाटा करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार करून वित्त विभागाकडे सादर केला असूनलवकरच तो राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहेअशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक जोरदारपणे करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. "कुष्ठरोग शोध मोहीमउपचार आणि निर्मूलन या त्रिसूत्रीवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करावे. आशा सेविकाशालेय आरोग्य तपासणी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा," असेही ते म्हणाले.

 या बैठकीस आमदार सुलभा खोडकेविदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचे प्रतिनिधीआरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाडकुष्ठरोग सहसंचालक डॉ.सांगळेतसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शो रूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री

 महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन

उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शो रूमचे उद्घाटनभारतात टेस्लाची अधिकृत एंट्री

 

मुंबईदि. १५ : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे,  की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत  आहे.  याची सुरुवात महाराष्ट्रातून होते असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहताडिलिव्हरी लोकेशनलॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल "Model Y" आज भारतात लाँच करण्यात आले असूनया कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर ६०० किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असूनतिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातातअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरकर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असूनमुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेतअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत

 देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. १४ : राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सदाशिव खोतअमोल मिटकरीप्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले१०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. जानेवारी २०२५ या महिन्यातील केंद्र सरकारचा निधी उशिरा उपलब्ध झाल्याने काही काळासाठी देयके आणि वेतनाची रक्कम प्रलंबित राहिली होती. तथापि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून सर्व देयके आणि वेतन अदा करण्यात आले असल्याने ही सेवा सुरळीत सुरू आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नयेयासाठी उपाययोजना करण्यात येतील तसेच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य शासनाच्या निधीतून ही गरज भागविण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ९ ते १४ वयोगटातील महिलांसाठी उपाययोजना करण्याची केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे. तथापिजागतिक आरोग्य संघटनेने अद्याप यासाठी मान्यता दिलेली नसल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

जल जीवन मिशनमुळे मराठवाड्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार

 जल जीवन मिशनमुळे मराठवाड्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार

- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. १४ : मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना पूर्ण झाल्यानंतर पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होईलअसे पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य हेमंत पाटील यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्याराज्यात प्रत्येक शहरासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नलनल से जलही पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरजालना या शहरांसाठी सुद्धा या योजनांची कामे सुरू आहेत. मराठवाड्याच्या पाणी समस्येवर उपाययोजना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम देखील हाती घेतले आहे. या योजनांच्या पूर्ततेनंतर पाण्याची समस्या दूर होईलअशी माहितीही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi