Monday, 14 July 2025

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार

 न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी

लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक प्रयोगशाळा

·         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन

नागपूरदि. 13महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहेआधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात आहेततंत्रज्ञानसायबर आणि फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता येत्या काळात लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करुन न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांची व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री  तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील धंतोली परिसरात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि गृह विभागाच्या तीन नवीन प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होतेगृह (ग्रामीणराज्यमंत्री डॉपंकज भोयरखासदार श्यामकुमार बर्वेआमदार संदीप जोशी आणि संजय मेश्राममहासंचालक (न्यायिक व तांत्रिकसंजय वर्मामहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आणि न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉविजय ठाकरे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगुन्ह्यांची सिद्धता होऊन गुन्हेगारास शासन व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची ठरतेनवीन भारतीय फौजदारी कायद्यांनी न्यायसहायक पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे तसेच विवक्षित गुन्ह्यांमध्येही यास अनिवार्यता प्राप्त झाली आहेराज्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी 2014 नंतर विशेष प्रयत्न झाले असून वैविध्यपूर्ण पद्धतीचा अवलंबतांत्रिक पुरावे आणि न्यायसहायक वैज्ञानिक पुराव्यांवर भर देण्यात आला व 14 शासन निर्णय काढून गुन्हे सिद्धतेचे प्रमाण 9 वरुन 54 टक्क्यांवर आणलेविकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करतांना गुन्हे सिद्धतेचे हे प्रमाण 90 टक्क्यांपुढे घेऊन जावे लागेलअसेही त्यांनी सांगितलेराज्यात आधुनिक सायबर न्यायसहायक प्रयोगशाळान्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळामोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि नवी मुंबई येथे सायबर केंद्र उभारुन त्याचे महामंडळात रुपांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही अत्याधुनिक करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आलीया प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन ही एक समाधानाची बाब असून फेब्रुवारी 2027 पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावेअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

            प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या कामांमध्ये लोकाभिमुखता व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करण्यात येईलयामुळे वेळेत गुन्ह्यांची सिद्धता होऊन न्यायदानास गती येईलन्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था हे एक लोकसेवेचे कार्य असून या वर्षाअखेर प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

         तत्पूर्वीगृह विभागांतर्गत नव्याने कार्यन्वित झालेल्या प्रयोगशाळा संगणकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचेमुंबई येथील सेमी ॲटोमेटेड सिस्टीमचे आणि पुणे येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉविजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूरचे उपसंचालक अश्विन गेडाम यांनी आभार मानले.

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी

 कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती

शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश

मुंबईदि. 12 :- कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव संचालक (पणन) यांनी शासनास सादर करावा. तसेच जामखेड  येथे  शेतकरी भवनाच्या बांधकाम परवानगी मागणीचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सादर केला आहे. या प्रस्तावास संचालक (पणन) यांनी तातडीने मान्यता द्यावीअसे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

                     कर्जत व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित विषयांबाबत आढावा बैठक महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनमुंबई येथे झाली. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेसह सचिव वि.ल. लहानेतालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच पणन विभागाचे संचालक श्री.रसाळ व उपसंचालक श्री.निंबाळकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

                    जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी 22 एप्रिल, 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिलेली आहे. हे शेतकरी भवन उभारण्यासाठी शासन अनुदान 50 टक्क्याच्या मर्यादेत दिले जाणार असून उर्वरित 50 टक्के निधी बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जातून उपलब्ध करुन घ्यायचा आहे.

       राज्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून  डिसेंबर 2023 मध्ये याबाबत शासनाने निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कर्जत येथे शेतकरी भवन उभारण्यासाठी तसेच बाजार समितीकडून नियमानुसार सादर होणाऱ्या अन्य बाबींवरील प्रस्तावास देखील तातडीने मान्यता दिली जावीअशा सूचना सभापती प्रा. शिंदे यांनी दिल्या आहेत.

.......

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे

 डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

 

मुंबईदि. १२ : मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत पात्र झोपडपट्टी धारकांचे त्यांच्या सध्याच्या निवासाच्या नजिकच पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठकीत आढावा घेताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतीसाठी जागा खरेदी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अहमदाबाद येथील भास्कराचार्य अंतराळ अनुप्रयोग आणि भू - सूचना संस्थेच्या माध्यमातून विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे  महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन केंद्र (एमआरसॅक) च्या सहकार्याने अतिक्रमणाच्याबाबत अलर्ट देणारी यंत्रणा निर्माण करावी. ही कार्यप्रणाली कांदळवन अतिक्रमणबाबतही लागू करावी. अशी यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असावी. अशा यंत्रणेमुळे अतिक्रमण करण्यास अटकाव करता येणे शक्य होईल. ही संगणकीय प्रणाली पीएम गतिशक्ती पोर्टलशी संलग्न असावी. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 बायोमेट्रिक पद्धतीवर आधारित घरोघरी सर्वेक्षणाचे काम डिसेंबरपर्यंत संपवावे. बंद असलेल्या झोपड्या रेकॉर्डवर आणाव्यात. नियोजन करताना अशा बंद झोपड्यांचा समावेश करता येईल. पुनर्वसनाची योजना राबवताना संयुक्त भागीदारीतून विकासाला प्राधान्य द्यावे. यामध्ये यंत्रणांनी प्राधान्याने काम करावे. किंवा यंत्रणेऐवजी नियमित तत्त्वावर पुनर्वसन योजना राबवावी. समूह पुनर्विकास योजनेमध्ये सर्व सुविधा देण्यात याव्यात. यासाठी चांगल्या सल्लागाराची नियुक्ती करावी. चटई निर्देशांक हा समूह विकासामध्ये वापरण्यासाठी देण्यात यावा. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सेल तयार करून या सेलच्या माध्यमातून समूह विकास (क्लस्टर) योजनेला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेरमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम गतीने पूर्ण करावे. समुद्राकडील जागेचा पुनर्वसनासाठी उपयोग करताना त्यातील अडथळे दूर करावे. तसेच पुणे शहरामध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. त्यांना भाडे पद्धतीने किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करून घरे देण्यात यावीत. पुणे शहरातील नदी काठावरील नागरिकांना पुराच्या पाण्याचा नेहमी सामना करावा लागतो. अशा नागरिकांचे गृहनिर्माणच्या योजनेद्वारे पुनर्वसन करावे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपात्र झोपडीधारकास प्रशस्त घर मिळून देतत्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करावे. प्राधिकरणाने आपल्या संकेतस्थळावर नागरिकांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून द्यावी.

बैठकीदरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मोबाईल ॲप व पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

0000

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळींच्या सदनिका हस्तांतरणाचे नियोजन

 म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. १२ : विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेगृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ताम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.

बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणारे विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करणेम्हाडास उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका या संक्रमण शिबिरासाठी वापरणे अथवा सोडतीद्वारे विक्री करणेविनिमय 33(4) अंतर्गत रहिवाश्यांना अतिरिक्त क्षेत्राचा लाभ देणे व या क्षेत्रावर प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचा लाभ देणे यासह विनिमय ३३(५)३३(७)३३(९) व ३३ (२४) अंतर्गत सुचविण्यात आलेल्या सुधारणांवर तसेच म्हाडा वसाहतीतील विकास आराखड्यातील आरक्षणसर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

बीडीडी चाळींच्या सदनिका हस्तांतरणाचे नियोजन

म्हाडाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ प्रकल्पांवरही यावेळी चर्चा झाली. वरळी बीडीडी चाळीतील 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन आठवड्यात 556 सदनिकांचे हस्तांतरण होणार आहे. तसेच 1419 सदनिकांचे सप्टेंबर 2025 मध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर 1642 सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट 2027 पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नायगाव बीडीडी चाळीतील 3344 सदनिकांपैकी 1938 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2025मध्ये 864 सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या प्रकल्पातील 2560 पुनर्वसन सदनिकांपैकी 1241 सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी 342 सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर 2025पर्यंत करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ 672 सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पातील 3 भूखंडावरील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून 4 भूखंडावरील एकूण 1243 सदनिका बांधकामासाठी कार्यादेश जारी करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय सुरभी गृहनिर्माण संस्थापोलीस वसाहतींचा पुनर्विकासआराम नगर अभिन्यासाचा पुनर्विकासमोतीलाल नगरअभ्युदय नगर प्रकल्पवांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर वरळी वसाहतजीटीबी नगर सायन कोळीवाडा वसाहत पीएमजीपी वसाहतपूनम नगर प्रकल्प तसेच मुंबई महानगर ग्रोथ हब आदी प्रकल्पांच्या पुनर्विकास प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी म्हाडाने योग्य सुधारणा करण्याचे निर्देश नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकरमिलिंद शंभरकर यांच्यासह विविध मंडळाचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्याची तपासणी करून एक महिन्यात अहवाल द्या

 पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्याची

तपासणी करून एक महिन्यात अहवाल द्या

- वन मंत्री तथा पालघर पालकमंत्री गणेश नाईक

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. ११ : पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसि रिसायकलींग कंपन्यामधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि या संबंधीचा अहवाल एक महिन्यात द्यावाअसे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलींग कंपन्यामधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी- मुरबे खाडी मधील रासायनिक प्रदूषण बाबत वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वासपालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखडप्रधान वन संरक्षक  नरेश झिरमुरेउपसचिव विवेक होशिंगउदय ढगे आदी उपस्थित होते.

नवीन खनिज धोरण सर्वसमावेशक असेल

 नवीन खनिज धोरण सर्वसमावेशक असेल

- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. ११ : राज्य शासन नवीन खनिज धोरण करत आहे. प्रस्तावित खनिज धोरण सर्वसमावेशक बनविण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईलप्रत्येकाने आपली मते याबाबत मांडावीतअसे आवाहन खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

        मंत्रालय येथे नवीन प्रस्तावित खनिज धोरणाबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीत खनिकर्म मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री डॉ.आशिष जयस्वालखनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबालसिंह चहलखनिज कायदा सल्लागार ॲड बी.के.शुक्लाराजेंद्र कोरडे उपस्थित होते.

           राज्य शासनाने खाणपट्टे सुरू करण्याबाबत करावयाची कार्यवाहीतज्ज्ञ व जाणकार यांची मतेनागरिकांची मतेकेंद्र व राज्य शासन यांचा समन्वय,  राज्यस्तरावर खाणवनपर्यावरण आणि महसूल विभागांमधील समन्वयासाठी यंत्रणा तयार करणेभूवैज्ञानिक अहवालांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा  करणेदफ्तर दिरंगाई टाळणेखाणपट्टे लिलाव प्रक्रियेमध्ये व इतर कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र अभ्यासाचा अधिकाधिक वापर  करणेमहसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून  देणेज्या खाणी कार्यरत नाहीत अथवा कालबाह्य झालेल्या आहेत त्यांचे विश्लेषण  करणे यासह इतर सर्वसमावेशक बाबींचा अभ्यास करून लवचिक आणि आधुनिक धोरण तयार करणे गरजेचे असल्याचेही खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

००००

पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे सादरीकरण,विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या समस्यांबाबत आढावा

 पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे सादरीकरण

        पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांच्या नियोजन आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. मोशी येथे न्यायसंकुल इमारत (खालचा तळ मजला+तळ मजला +५ मजले) (२८ कोर्ट हॉल)नवीन शासकीय विश्रामगृह इमारतमोशी येथील अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय व प्रयोगशाळा इमारतीमधील आधारभितसंरक्षक भिंतकाँक्रिटीकरण तसेच प्रशिक्षण केंद्र उभारणीचिखली येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी नवीन इमारतरावेत येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट साठवणुकीकरीता गोदाम इमारतीचे बांधकाम या विकास कामांच्या नियोजन आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वेकक्ष अधिकारी संदीप पाटीलकामगार उपायुक्त ल. य. भुजबळ यासह पोलीसकामगारनगरविकाससार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या समस्यांबाबत आढावा

         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विधिमंडळ समिती कक्ष येथे आयोजित बैठकीत विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलभांबोली येथील प्लास्टिक ओमनियम प्रा.लि.धानोरी येथील मे.राठी ट्रान्सपॉवरपॉलीबाँड या खाजगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. यावेळी न्यायालयात दाखल प्रकरणांबाबत चर्चा झाली. न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. आर. बी. पवारअप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघराष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसलेकामगार संघटनेचे अर्जुन सुद्रिक यासह अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi