Saturday, 12 July 2025

कारखान्यांना फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या उपाययोजना बंधनकारक

 कारखान्यांना फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या उपाययोजना बंधनकारक

- कामगार मंत्री आकाश फुंडकर

 

मुंबईदि. १० : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व कारखान्यांनी फायर ऑडिट करणे आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स या कारखान्यात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य नाना पटोलेसरोज अहिरेराजेश बकाने, अमित देशमुख  राम कदम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

मंत्री श्री. फुंडकर म्हणाले कीसदर घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला असूनत्याचा अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल.

जिंदाल पॉलिफिल्म्स या कारखान्यात गेल्या अडीच वर्षांत दोनदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कारखाना पूर्णपणे बंद केल्यास हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येईलहे लक्षात घेऊन अपघात झालेला भाग तातडीने बंद करून आवश्यक सर्व दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रत्येक कारखान्यात नियमित फायर ड्रील (रंगीत तालिम)सीआयएस प्रणालीद्वारे तपासणी केली जाते. कोणत्याही कारखान्याला फायर ऑडिट शिवाय परवाना दिली जात नाही,  कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी शासनाने सुरक्षेचे कठोर निकष लागू केले असूनत्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे, असेही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.

जनावरांसाठी गोठा बांधणे अनुदानामध्ये नोंदणीकृत गोशाळांचा समावेश करण्यासंदर्भात बैठक घेणार

 जनावरांसाठी गोठा बांधणे अनुदानामध्ये

नोंदणीकृत गोशाळांचा समावेश करण्यासंदर्भात बैठक घेणार

- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

 

मुंबई दि. १० :- रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांसाठी गोठा बांधण्याकरिता देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्यातील नोंदणीकृत गोशाळांचा समावेश करण्यासंदर्भात रोजगार हमी योजना आणि पशुसंवर्धन विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईलअसे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी या विषयीची लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अभिमन्यू पवार, सत्यजित देशमुख यांनी सहभाग घेतला.

गाईला राज मातेचा दर्जा दिला असल्याने तिचे संगोपन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. रोजगार हमी विभागामार्फत प्रत्येक तालुक्यात गोशाळा मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी अनुदानही देण्यात येते, या गोशाळांना वाढीव अनुदान देण्यासंदर्भातही विचार केला जाईल. ग्रामीण भागातील आजारी गाई, भाकड आणि इतर जनावरांच्या संगोपनासाठी अनुदान देणेबाबतही आयोजित बैठकीत चर्चा करण्यात येईल. या बैठकीसाठी संबंधित लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल, असे मंत्री श्री. गोगावले यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया; बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित

 अंगणवाडी सेविकामदतनीस भरती प्रक्रिया;

बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित

- महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

 

मुंबईदि. १० :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील घनसागंवी प्रकल्प  १ व २ मध्ये झालेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत दोषी आढळून आलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य हिकमत उढाण यांनी विधानसभेत याविषयीची लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी ही माहिती सांगितली.

            महिला व बाल विकास राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितलेफेब्रुवारी २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भरती मधील याद्या एप्रिल-मे महिन्यात जाहीर करण्यात आल्या. जाहीर याद्यांवर काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर या तक्रारींच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारीजालना यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे.  या अहवालानुसार संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने  त्यांचे निलंबन करण्यात येत आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना

 फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना

- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. १० :- वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य रोहित पाटील यांनी अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांवर होणारे परिणाम या विषयासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य हेमंत ओगलेअभिजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

कृषीमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितलेवातावरणातील बदलाचा फळबागांवर परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. द्राक्ष बागांवर हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रपुणे यांच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण व सल्ला देण्यात येत आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल आणि बैठकीमध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींनाही बोलवले जाईल.

राज्यात द्राक्ष पिकाखाली एक लाख २३ हजार ४२४ हेक्टर क्षेत्र असून सुमारे २४ लाख ८९ हजार २६८ मे. टन उत्पादन होते.  नाशिकसांगलीसोलापूरअहिल्यानगर आणि  धाराशिव या जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात आले असून शेतकऱ्यांना शासन निकषानुसार मदत करण्यात आली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना शासन निकषानुसार मदत दिली जाईलअसेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना हवामानाची माहिती जलदगतीने मिळावी यासाठी प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

 शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

- कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट

कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९ कोटींचा खर्च

 

मुंबईदि. १० : शेतकरी आत्महत्या होऊच नये यासाठी  शेतकरी हिताच्या विविध योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्यात येत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणुक करून कृषीला समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी शासन सर्वतोपरी कार्य करीत आहे. याचबरोबर शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना लवकरच राज्यात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार आणि कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणालेराज्यामध्ये १ कोटी ७१ लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. संकटकाळात त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. ‘नमो शेतकरी सन्मान योजना’‘पीक विमा योजना’कृषी यांत्रिकीकरणगोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेसह राज्यात ६९ हजार ८८९  कोटींचा खर्च करण्यात आला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतून गेल्या तीन वर्षात ५६ हजार २९३ कोटींची मदत करण्यात आली आहे. मागील तीन वर्षात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसह १९ हजार ३१० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पीक विमा योजनेतून १६ हजार ३८९ कोटीनुकसान भरपाईपोटी १९ हजार ५९२ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी निर्यातक्षम पीक लागवडीला शासन प्रोत्साहन देणारा आहे. पिकांची संपत्ती आणि दायित्व (labality) अशा दोन पद्धतीने विभागणी करण्यात येईल. पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत दिली आहे. पीक विमा योजनेत मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करेल. शासनाने एक रुपयात पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे यामधून वाचलेले ५ हजार कोटींची कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. कृषी विभागात लाभासाठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीनुसार लाभ देण्यात येणार आहे. ज्या योजनेत जास्त मागणी आहे त्या योजनेत नियतव्यय वाढवून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या बाबींसाठी सर्वेक्षण करून त्यानुसार साहित्य देण्यात येईलअसेही कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणालेराज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या लागवडीमुळे रासायनिक खतांवरील राज्याच्या अनुदान खर्चात घट होत आहे. वन्य जीवनापासून पिकांच्या संरक्षणासाठी नवीन धोरण आणण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे ज्या शेतकऱ्यांना शेती सोडावी लागली आहेअशा शेतकऱ्यांसाठी पीक पद्धतीत बदलकुंपणाची उभारणीतसेच अनुदान देण्याबाबत योजना आणण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. नैसर्गिक आपत्तीतून पिकांचे नुकसान होत असते. अशा सतत नुकसान होणाऱ्या पिकांऐवजी नवीन पिके घेण्याबाबत योजना आणण्यात येणार आहे. शेतीला पांदण रस्ते देण्याबाबत शासनाचा प्राधान्यक्रम राहणार आहे. राज्यात ४५ हजार किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी मोठी तरतूद करण्यात येईल. पीक व्यवस्थापनकीड रोग नियंत्रणासाठी ५०० कोटींची तरतूद असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित धोरण शासनाने आणले आहे. तसेच पंचनामे गतीने पूर्ण करण्यासाठी ‘एमआर सॅक’च्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येईल.  खतांच्या लिंकेज तक्रारीचे निरसन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असेही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी

 शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांची

‘एसआयटी’ मार्फत चौकशी

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. १० : राज्यातील शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन करून सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य रणधीर सावरकरवरुण सरदेसाईकिशोर आप्पा पाटील, गोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणालेया प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएसआयपीएस अधिकारी तसेच शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. संबधित शिक्षण उपसंचालक यांना निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

****

आवास योजनेतील घरांसाठी 'महाआवास' ॲप विकसित

 आवास योजनेतील घरांसाठी 'महाआवासॲप विकसित

-         मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. 10 : राज्यातील नागरिकांना आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची माहिती एका ठिकाणीसुलभतेने मिळावी यासाठी नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाआवास’ हे विशेष ॲप विकसित केले जात असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य प्रवीण दटके यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री. देसाई म्हणालेया ॲपच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आणि गृहनिर्माण योजनेंतर्गत राज्यभरात ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेतत्या सर्वांची माहिती नागरिकांना एकत्रित स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या पसंतीनुसार घर निवडून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत हे ॲप विकसित होऊन या सगळ्यात सुसूत्रता येईल. या ॲपद्वारे पारदर्शकतेसह घरांची लॉटरी प्रणाली कार्यान्वित केली जाईल. दर आठवड्याला नोंदणीकृत लाभार्थ्यांची लॉटरी म्हाडामार्फत काढून घरांचे वाटप करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi