Saturday, 12 July 2025

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; पोट हिस्स्याची नोंदणी आता सातबारावर रस्त्यांची रुंदी कमीत कमी १२ फूट असणे बंधनकारक

 पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्यपोट हिस्स्याची नोंदणी आता सातबारावर

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १० : राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असूनयासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा प्रकारे या उपक्रमात निवडण्यात आले आहेतअशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेतील सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोतचंद्रकांत रघुवंशी आणि शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेआतापर्यंत सातबारावर केवळ जमीन क्षेत्राची नोंद होत होतीपरंतु भावांमधील वाटणी किंवा पोट हिस्सा दाखल होत नव्हता. अशा वाटण्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येतीलतर पोट हिस्सा मोजणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाईल. आता कमीत कमी एक गुंठा क्षेत्र सुद्धा स्वतंत्रपणे नोंदविता येणार आहे.

ते पुढे म्हणालेया नव्या पद्धतीमुळे आधी मोजणीनंतर नोंदणी’ अशी प्रक्रिया निश्चित करता येईल. यामुळे भावकीतील वाद टाळता येणार आहेत. 'डिजिटल इंडियाउपक्रमांतर्गत राज्यातील ७० टक्के गावांचे नकाशे व नोंदी डिजिटायझेशन करण्यात आले असूनत्यामुळे बांधशेत रस्तेतसेच पांदण रस्त्यांवरील वादही मोठ्या प्रमाणात कमी होतील.

पांदण रस्त्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले कीपांदण रस्त्यांची रुंदी कमीत कमी १२ फूट असणे बंधनकारक करण्यात येणार आहेजेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी सहज वादमुक्त प्रवेश मिळू शकेल.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठीत

 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठीत

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत घोषणा

 

मुंबईदि. १० : शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावेत्याच्या जीवनात आर्थिक उन्नती साधण्यासाठी राज्य शासन संवेदनशीलपणे काम करीत आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सहकार मंत्री श्री. पाटील बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि शेतीविषयक इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूलकृषीपणनवन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील योजनांची अंमलबजावणीवितरित निधी आणि प्रलंबित प्रकरणांचा सखोल आढावा घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - २०१७ यामध्ये कर्जमाफीएकवेळ समझोता योजनानियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जुलै २०२० पर्यंत २६.१७ लाख शेतकऱ्यांसाठी १५,३४९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी २४.८८ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३,७०५ कोटी रुपये थेट लाभ देण्यात आला आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभासाठी १७.२२ लाख शेतकऱ्यांना २७७३ कोटी मंजूर करण्यात आले असून १४.८९ लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात २४२७ कोटी वितरित करण्यात आले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ अंतर्गत दोन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेमध्ये ३२.४४ लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यापैकी ३२.३३ लाख कर्जखात्यांना लाभ देण्यासाठी २०,५३७ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी ३२.२७ लाख कर्जखात्यांवर २०,४९७.५३ कोटी जमा करण्यात आले आहेत. या योजनेची अंमलबजावणी ९९ टक्के पूर्ण झाले आहे उर्वरित प्रकरणांवरही लवकरच कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. सन २०१७-१८सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल ५० हजार रुपये पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत १५.४० लाख कर्जखात्यांना योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने ५२२२ कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी १४.३८ लाख कर्जखात्यांवर ५२१६.७५ कोटी इतक्या रक्कमेचा लाभ प्रत्यक्ष वितरीत करण्यात आलेला आहे. उर्वरित कर्जखात्यांना लाभ देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान व कार्यक्षम करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

****

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल - मारोडा येथील कृषी महाविद्यालयासाठी जागा लवकरच देणार

 चंद्रपूर जिल्ह्यातील मूल - मारोडा येथील

कृषी महाविद्यालयासाठी जागा लवकरच देणार

- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. १० : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल- मारोडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे.  या इमारत बांधकामासाठी असलेली जागेची अडचण लवकरच सोडवण्यात येऊन येथे महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात येईलअशी माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेमध्ये सदस्य नारायण कुचे यांनी सहभाग घेतला.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणालेकृषी विभागाच्या आकृतीबंध निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. या नवीन कृषी महाविद्यालयासाठी पदभरती दोन महिन्यात करण्यात येईल. महाविद्यालयाला देण्यात येणाऱ्या जमिनीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहर व लगत जमीन उपलब्धतेनुसार गिरणी कामगारांना घरे देणार

 मुंबई शहर व लगत जमीन उपलब्धतेनुसार गिरणी कामगारांना घरे देणार

मंत्री उदय सामंत

शेलू येथील घरांबाबत सक्ती नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णय

मंत्री उदय सामंत यांनी निवेदनाद्वारे दिली माहिती

मुंबईदि. १० : मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाहीयाची काळजी शासन घेत आहे. मुंबई शहर व लगतच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेलअशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरे बांधून देण्यात येतील असा निर्णय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. सामंत म्हणालेआझाद मैदानावर गिरणी कामगारांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गिरणी कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विधीमंडळात बैठक झाली. या बैठकीत कामगारांना घरे देण्याबाबत विविध निर्णय घेण्यात आले.

शेलू येथील घरे घेण्याबाबत गिरणी कामगारांना कुठलीही सक्ती करण्यात आली नाही. असा कुठलाही निर्णय झाला नसताना अपप्रचार करण्यात आल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. शेलू येथील घरे गिरणी कामगारांना घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे. तसेच २०२४ मध्ये घर न घेतलेल्या गिरणी कामगारांचा घराचा दावा संपुष्टात येईलअसे होणार नसून यासंदर्भातील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक १७ रद्द करण्याचा निर्णय देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरे मिळवून देण्याबाबत कोटा निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील मिठागरांच्या जागांवर गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात येत असून गिरणी कामगारांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आज झालेल्या या बैठकीत गिरणी कामगारांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी

 शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांची

‘एसआयटी’ मार्फत चौकशी

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. १० : राज्यातील शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन करून सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य रणधीर सावरकरवरुण सरदेसाईकिशोर आप्पा पाटील, गोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणालेया प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएसआयपीएस अधिकारी तसेच शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. संबधित शिक्षण उपसंचालक यांना निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आवास योजनेतील घरांसाठी 'महाआवास' ॲप विकसित

 आवास योजनेतील घरांसाठी 'महाआवास' ॲप विकसित


- मंत्री शंभूराज देसाई


 


मुंबई, दि. 10 : राज्यातील नागरिकांना आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची माहिती एका ठिकाणी, सुलभतेने मिळावी यासाठी नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘महाआवास’ हे विशेष ॲप विकसित केले जात असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.


सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य प्रवीण दटके यांनी चर्चेत सहभाग घेतला.


मंत्री श्री. देसाई म्हणाले, या ॲपच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आणि गृहनिर्माण योजनेंतर्गत राज्यभरात ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्या सर्वांची माहिती नागरिकांना एकत्रित स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या पसंतीनुसार घर निवडून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत हे ॲप विकसित होऊन या सगळ्यात सुसूत्रता येईल. या ॲपद्वारे पारदर्शकतेसह घरांची लॉटरी प्रणाली कार्यान्वित केली जाईल. दर आठवड्याला नोंदणीकृत लाभार्थ्यांची लॉटरी म्हाडामार्फत काढून घरांचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सायबर गुन्ह्यात 'फ्रीज' केलेल्या बँका खात्यांना पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे,pl share

 सायबर गुन्ह्यात 'फ्रीजकेलेल्या बँका खात्यांना

पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १० : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वोकृष्टता केंद्र असून या माध्यमातून सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या नागरिकांची रक्कम तातडीने परत करण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यात बँकांनी फ्रीजकेलेल्या बँक खात्यातून फसवणुक झालेली रक्कम संबंधिताना लवकर मिळण्यासाठी बँकांनी पोलिस प्रमाणपत्रावर बँक खाते खुले करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सायबर गुन्हेबाबत सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य राहुल कूलअभिजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेरिझर्व बँकेच्या परिपत्रकानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये यापुढे बँकांना हात झटकता येणार नाही. बँक सबंधित फसवणुकीच्या गुन्ह्यात रक्कम बँकांना द्यावी लागणार आहे. सायबर फसवणुक लक्षात आल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार करावी. यासाठी १९४५ व १९३० हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहे. यावर तक्रार झाल्यास तातडीने फसवणूक होत असलेली रक्कम थांबवता येते. अशी यंत्रणा आहे. सायबर गुन्हेगारीतून फसवणूक टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीतील रक्कम विदेशातून परत आणण्यासाठी कायद्यात बदल करणेकायदा अधिक सक्षम करणेसबंधित देशांशी करार करणे आदीबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल.

उत्तरात गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, VPN नेटवर्क वापरून फसवणूक झालेल्या गुन्ह्यात भारतातील VPN शोधता येते. मात्र विदेशातील VPN शोधणे अडचणीचे ठरते. पुणे शहरात पाच सायबर पोलिस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव आहे. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून फसवणूक प्रकरणात दोन ते अडीच मिनिटात खाते फ्रीज करून रक्कम थांबविता येते. पुढील ५ वर्षात सायबर बाबत ५ हजार पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात येत आहेअसेही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi