Sunday, 6 July 2025

भविष्य निर्वाह निधी वार्षिक खाते पत्रके 2024–25 वर्षासाठी आता ऑनलाईन उपलब्ध

 भविष्य निर्वाह निधी वार्षिक खाते पत्रके 202425 वर्षासाठी

आता ऑनलाईन उपलब्ध

 

            मुंबई,दि.4 : सन 202425 या आर्थिक वर्षासाठीचे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (जीपीएफखाते पत्रके महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई, महाराष्ट्र यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहेत. ही पत्रके लेखावहिनी व कोषागारे संचालक यांना प्रदान करण्यात आली असून ती आता राज्य शासनाच्या सेवार्थ (SEVAARTH) पोर्टलवर (https://sevaarth.mahakosh.gov.inअपलोड करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या जीपीएफ सदस्यांना त्यांच्या वार्षिक खाते पत्रकांची पाहणीडाउनलोड व प्रिंट वरील संकेतस्थळावरून करता येईल. सामान्य प्रशासन विभागमहाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक GPF-2019/प्र.क्र.61/क्र.24 दिनांक 11.06.2020 नुसार201920 या वर्षापासून जीपीएफ पत्रकांची हार्ड कॉपी देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

खाते पत्रकात काही तफावत आढळल्याससंबंधित आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओयांच्या माध्यमातून ती महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई कार्यालयातील उपमहालेखापाल (निधी) यांच्याकडे कळवावी. खाते पत्रकावर जन्मतारीखनेमणुकीची तारीख तसेच क्रेडिट/डेबिट तपशील मुद्रित नसेल तर ती माहिती त्वरित महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावीजेणेकरून ती तपासून अभिलेख अद्ययावत करता येतील.

सदस्यांना हवी असल्यास विरोध/तफावतीची माहिती या agaeMaharashtral@cag.gov.in ईमेलवरही पाठवू शकतातअसे महालेखापाल (लेखा व अनुदाने ) कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.

००००

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

 जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

 

नवी दिल्लीदि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदननवी दिल्ली येथे पार पडली.

 

 या बैठकीला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेछत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि  यांच्यासह नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होतेतर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. यावेळी आंध्र प्रदेशगुजरात आणि तेलंगणा राज्यांच्या प्रतिनिधींनी आपली सविस्तर सादरीकरणे सादर केली.

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेही जीएसटीआयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्यातरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे. यावेळी तांत्रिक चर्चा मर्यादित राहिलीपरंतु पुढील बैठकींमध्ये सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपले सादरीकरण करेलत्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्राकडून सादरीकरण करण्यात आले नाही.

 

बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्तीआर्थिक घटकांचा प्रभावकरचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली. जीएसटी अंमलबजावणी समितीने महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), जीएसटी नेटवर्क (GSTN) आणि आंध्र प्रदेशगुजरात व तेलंगणा यांनी एकसमान अंमलबजावणी आणि अनुपालन व्यासपीठ विकसित करण्यावर जोर दिला. करचोरीला प्रवण क्षेत्रांमधील समस्यांचे निराकरणनोंदणीई-वेबिल आणि बीटूसी अनुपालन यावरही लक्ष केंद्रित झाले. जीएसटी अंमलबजावणी समितीने पुढील बैठकीत या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले.

 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलेही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र-राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

000000

घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स.🧠*

 *🫀घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स.🧠*


*🍁संदर्भ : हेल्थ मंत्रा ~ आरोग्य मंत्र*

*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*



चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराची हालचाल न करणे अशा अनेक कारणांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. हृदय रोगांमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या जगभरात जास्त आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हृदयरोग होतात आणि हृदय काम करणं बंद करतं. अशात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ईसीजी आणि इकोसारख्या टेस्ट करून हृदयाच्या क्रिया कशा होत आहेत याची माहिती मिळते. 


सामान्यपणे हृदयाचं आरोग्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर या टेस्टची मदत घेतात. मात्र, काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आरोग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता. यासाठी ना तुम्हाला मशीन लागते ना पैसे. ॲडल्ट ॲन्ड पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रिल चुग यांनी सांगितलं की, कशाप्रकारे घरी बसूनच तुम्ही हृदयाच्या कमजोरीची माहिती मिळवू शकता.


*🔸कंबरेची साईज मोजा :*

जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅकचा धोका जाणून घेण्यासाठी कंबरेची साईज मोजणे हा एक उपाय आहे. एका अंदाजानुसार, कोणत्याही पुरूषाच्या कंबरेची साईज ३७ इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांचं हृदय कमजोर असू शकतं. तेच महिलांमध्ये हे याची सीमा ३१.५ इंच असते. पुरूषांमध्ये ४० इंच आणि महिलांमध्ये ३५ इंच हृदयासाठी गंभीर ठरू शकते. कारण लठ्ठपणामुळे हृदयावर अधिक दबाव पडतो. लठ्ठपणा असल्यावर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं कॉमन आहे आणि याने फॅट नसांमध्ये ब्लॉकेज करण्याचं कारण ठरतं.


*🔸हार्ट ब्लॉकेज जाणून घेण्याची घरगुती टेस्ट*

नसांच्या माध्यमातून तुम्ही पल्स रेट किंवा हार्ट रेट जाणून घेऊ शकता. पल्स रेट मोजून हे जाणून घेता येतं की, नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही. ब्रिटिश हार्ट फाउंडेशन नुसार, एक सामान्य हालचाल आणि वयाच्या व्यक्तीची नस आरामाच्या स्थितीमध्ये एक मिनिटामध्ये ६० ते १०० बीट्स दरम्यान असली पाहिजे. हार्ट रेट कमी असल्यावर श्वास भरून येणे, चक्कर येणे अशी लक्षणं दिसली तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.


*🔸४० पायऱ्या चढा :*

डॉक्टर चंद्रिल चुग यांच्यानुसार, ही टेस्ट एक्सरसाईज टॉलरेन्स दाखवते. जर तुम्ही ४० पायऱ्या दम न लागता किंवा न थकता चढू शकत असाल तर तुमचं हृदय चांगलं आहे. कमजोरी किंवा ब्लॉकेज असल्यावर हृदयावर दबाव पडतो. अशात हृदय वेगाने धडधडतं आणि दमही लागतो.


*🎯हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?*


*🔸काय खाणं टाळावं? :*

अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा. तसेच जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केट मधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात बनवलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.


*🔸पाकिटातील पदार्थ टाळा :*

प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. रेडी टू इट म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेट मधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.


*🔸एक्सरसाईज गरजेची :*

कितीही कंटाळा आला तरी रोज कमीत कमी अर्धा तास तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पायी चालावं किंवा रनिंग करावी यानेही बराच फायदा मिळतो. एक्सरसाइजने शरीरातील नसा मोकळ्या होतात, फॅट बर्न होतं, रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.



*हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा  📲*



शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*

 .




*शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*


*कॅल्शिअम कशात असतं?*

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.

*कमतरतेमुळे काय होतं?*

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.


*लोह कशात असतं?*

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.

*कमतरतेमुळे काय होतं?*

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

*कार्य काय असतं?*

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते.


*सोडिअम कशात असतं?*

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

*कार्य काय असतं?*

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.


*आयोडिन कशात असतं?*

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.


*पोटॅशिअम कशात असतं?* सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.)

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.


*फॉस्फरस कशात असतं?*

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

*कमतरतेमुळे काय होतं?*

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

*कार्य काय असतं?*

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.


*सिलिकॉन कशात असतं?*

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

*कमतरतेमुळे काय होतं?*

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.


*मॅग्नेशिअम कशात असतं?* बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

*कार्य काय असतं?*

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.


*सल्फर कशात असतं?*

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

*कार्य काय असतं?*

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.


*क्लोरिन कशात असतं?*

पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.

*कार्य काय असतं?*

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.


*खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...*

*फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.


*डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.


*काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.


*दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.


*फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा  📲*


**

प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

 प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

-         सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

मुंबई, दि.4 : प्रत्येक घरात मोफत वीज पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. शासनामार्फत सुरू असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा विभागाशी समन्वय साधूनसकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालप्रधान सचिव हर्षदिप कांबळेआयुक्त सुरेंद्र पवार आदिसह अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले कीसामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबवावी. तसेचपात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करण्यासाठी आयुक्तालयामार्फत यंत्रणा राबवावी. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरावर सौर पॅनल उभारल्यास त्यांना 300 मेगावॅट वीज मोफत मिळणार असूनवीजेची बचतही होणार आहे. याचा लाभ त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य

 प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य

-सरन्यायाधीश भूषण गवई

 

मुंबई, दि. 4 : व्यक्तीच्या जडणघडणीत चांगले संस्कार आणि सकस मुल्यांची जोपसना या गोष्टी जास्त महत्वाच्या असतातकोणत्याही यशाचा मार्ग हा खडतर असतो. मात्र प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य असतेअसे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

कुलाबा येथील होली नेम हायस्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सरन्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी आर्च बिशप जॉन रॉडरिक्सबिशप डॉमनिक्स फर्नांडिसव्यवस्थापक फादर कॉनस्टॉन्सीयो नोरोनाप्रिन्सिपॉल सिस्टर लॉरेन्सीया  परेरा यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले कीप्रत्येकाच्या वाटचालीत शालेय जीवनाचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो. शालेय जीवनातील अनेक आठवणी होली नेम हायस्कुलमधील आहेतत्याच  शाळेत आज विशेष सत्कार होत असल्याचा क्षण निश्चितच खूप आनंदाचा आणि अभिमानाचाही आहे. आईवडिलांसोबतच या शाळेने आपल्यावर धर्मनिरपेक्षताएकात्मताबंधुभावाचे संस्कार केले. या  शाळेत वेगवेगळ्या समुहाच्या मित्र-परिवारासोबत एका उत्तम वातावरणात शालेय जीवन जगता आले. भारतीय संविधानाचे समतेचे तत्वही शालेय जीवनात या ठिकाणी शिकायला आणि अनुभवायला मिळाले. आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत होली नेम शाळेच्या शिकवणुकीचेयेथील शिस्तसंस्काराचे मोठे योगदान असल्याचे सांगून श्री.गवई म्हणाले कीयशाचा मार्ग हा खडतर असला तरी कोणत्याही क्षेत्रात करियर करण्याचे ठरवत असताना विद्यार्थ्यांनी त्यासाठी कष्ट घेण्याचीप्रामाणिक मेहनत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. जिंकण्याच्या इच्छाशक्तीमुळेच ध्येय प्राप्त करणे शक्य होत असते. आपल्या वडिलांच्या इच्छेमुळे आपण वकिली क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले असेही श्री.गवई यांनी यावेळी सांगितले.

आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद असलेल्या सरन्यायाधीश पदी विराजमान होत असल्याचा सार्थ अभिमान आणि  आनंद शाळा व्यवस्थापनाला असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक प्रेरणा असल्याच्या भावना  आर्च बिशप जॉन रॉडरिक्स यांनी यावेळी व्यक्त केल्या.

००००

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर

 वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर

-         राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. 4 : अवकाळी पाऊसवादळी वारा यांमुळे जीर्ण झालेल्या विद्युत पुरवठा तारा यांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात. राज्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य निलेश राणे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य नमिता मुंदडासुनील शेळकेरोहित पवारस्नेहा दुबेभास्कर जाधव  यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्यावीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून विद्युत यंत्रणांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. तसेचकोकण किनारपट्टीस येणाऱ्या वादळात विद्युत यंत्रणेचे कमीत कमी नुकसान व्हावे व ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा व्हावा याकरीता विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करणे यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत  ६३५ किलोमीटर उच्च दाब भूमिगत केबल टाकण्याचे नियोजन असूनत्यापैकी २२५.८० किलोमीटर काम पूर्ण झाले आहेतर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच १,२२७ किलोमीटर लघु दाब भूमिगत केबल वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे नियोजन असूनत्यातील १०९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत एबी केबलची ४८ किलोमीटरची कामे११ के. व्ही. उच्चदाब वाहिनीची १९४.२० किलोमीटरची कामेलघुदाब वाहिनीची ८१ कि.मी. कामेभूमिगत केबलची १० कि.मी. कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

  कोकण भागात वारंवार येणाऱ्या वादळी होणाऱ्या वीजपुरवठ्याचे नुकसानीला प्रतिबंध करण्यासाठी आपत्ती सौम्यीकरणमदत व पुनर्वसन विभागामार्फतही विशेष उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणदेवगडकुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनपावसाळ्यानंतर भूमिगत वीजवाहिन्यांचे कामे पूर्ण करण्यात येणार आहे. कोकणातील वीज समस्याबाबत अधिवेशनात कालावधीत कोकण विभागातील सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi