Sunday, 6 July 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधी महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण

 . बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी

सरन्यायाधीश भूषण गवई

§  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधी महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण


            मुंबई दि 5:- विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व
 विधीज्ञअर्थतज्ञसमाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्यकारकीर्दीला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतीपटलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

            यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेन्यायमूर्ती मनिष पितळेमहाधिवक्ता बिरेंद्र सराफ व प्राचार्या डॉ.अस्मिता वैद्य हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय विधी महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव करण्यात आला. विविध संस्था तसेच मान्यवरांनीही यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा गौरव केला.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी ठरली. शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले. 1935 च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अॅक्टमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

            शासकीय विधी महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक विधीज्ञ या महाविद्यालयातून घडले. महाविद्यालयाच्या विविध समित्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यही अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार श्री गवई यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही श्री गवई यांनी नमूद केले.
            प्राचार्य अस्मिता वैद्य प्रास्ताविकात म्हणाल्याशासकीय विधी महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक नामवंत विधीज्ञ या महाविद्यालयाने घडविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 1935 मध्ये अध्यापन कारकीर्दीस सुरुवात केली. न्यायशास्त्रासारख्या अत्यंत गहन विषयाचे अध्यापन डॉ आंबेडकर करीत असत. या महान कार्याला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त               डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधी सेवा क्षेत्रात महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखलेन्यायाधीश रेवती ढेरेन्यायाधीश नीला गोखलेकुलगुरू डॉ. दिलीप उकेकुलगुरू डॉ हेमलता बागलाकुलगुरू डॉ अपूर्वा पालकरकुलगुरू डॉ गोसावीप्रधान सचिव सुवर्ण केवले, सिनियर कौन्सेल र‍फिक दादा,  बार कौन्सिल अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, प्रिन्सेस आशाराणी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.


पंढरपूर बाजार समिती ही उत्कृष्ट बाजार समिती आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब

 पणनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, पंढरपूर बाजार समिती ही उत्कृष्ट बाजार समिती आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब सोलापूर जिल्हा बनले आहे. मनुके, द्राक्ष, डाळिंबाच्या क्षेत्रात प्रगती करणारा हा जिल्हा आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचे धाडस तालुक्यात झाले आणि ते यशस्वीही करण्यात आले.


लवकरच ‘एडीबी’ची योजना राज्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये मार्केट कमिटीची बळकटी करण्यासाठी योजना आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटीच्यावर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. प्रशासनाने आषाढी वारीचे अत्यंत चांगले नियोजन केले, असेही ते म्हणाले.


यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती देण्यात येत असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

 कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले, वारकरी आणि शेतकरी वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती देण्यात येत असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत चांगली शेती करत आहेत. केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. माशीमुळे डाळिंब आणि इतर फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी बॅगेजठिबकमल्चिंग पेपर आदीं योजनांचा फलोत्पादसाठी  शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले.

राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याला

एआय मध्ये मोठे काम करायचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने कृषी मध्ये ५००कोटींची तरतूद केली आहेअसेही ॲड. कोकाटे म्हणाले.

पणनमंत्री जयकुमार रावल म्हणालेपंढरपूर बाजार समिती ही उत्कृष्ट बाजार समिती आहे. केळीचे सर्वात मोठे निर्यात हब सोलापूर जिल्हा बनले आहे. मनुकेद्राक्षडाळिंबाच्या क्षेत्रात प्रगती करणारा हा जिल्हा आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचे धाडस तालुक्यात झाले आणि ते यशस्वीही करण्यात आले.

लवकरच एडीबीची योजना राज्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यामध्ये मार्केट कमिटीची बळकटी करण्यासाठी योजना आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणालेही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटीच्यावर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. प्रशासनाने आषाढी वारीचे अत्यंत चांगले नियोजन केलेअसेही ते म्हणाले.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाडउपसभापती राजू गावडे संचालक मंडळ आदी उपस्थित 

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर,पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

 शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार
  • पंढरपूर येथे 'कृषी पंढरीकृषी प्रदर्शनाचे उदघाटन

 

पंढरपूरदि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरीकृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेपणन मंत्री जयकुमार रावलआमदार विजय देशमुखआमदार रणजित सिंह मोहिते पाटीलगोपीचंद पडळकरसमाधान आवताडेअभिजीत पाटीलमाजी आमदार प्रशांत परिचारकपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादविभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारणजलनियोजन पासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतीच पिक विमा योजना सुधारित केली आहे.

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेशेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संचकृषी यांत्रिकीकरणशेततळेपंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानयोजनांची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ मध्ये व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभागकृषी विद्यापीठे यांचे स्टॉलविविध योजनावेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही या प्रदर्शनात समवे आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय'चा वापरउत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी प्रदर्शने या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खतेनैसर्गिक खतेवेगवेगळ्या खतांचे मिश्रणेमाती परीक्षण ते कापणीपर्यंत पर्यंतच्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळतेअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेजकोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांचा माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल असा प्रयत्न असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

 पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतिशील असून अत्यंत चांगले काम करत आहे. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावाअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

 मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार समाधान आवताडेअभिजित पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कलशेट्टीडॉ.बाबासाहेब देशमुखमाजी आमदार प्रशांत परिचारकनगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.


राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

 राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

यावेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कारमुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक मानेदेवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

 

हरित वारी' ॲपचे उद्घाटनpl share

 हरित वारीॲपचे उद्घाटन

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'हरित वारीहा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या 'हरित वारीॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

'हरित वारीउपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जातत्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना   देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हतापारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहेअसे यावेळी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Featured post

Lakshvedhi