Thursday, 3 July 2025

क्षयरोग प्रसार रोखण्यासाठी बी-पाल्म उपचारांसह विशेष मोहीम

 विधानसभा लक्षवेधी सूचना :

क्षयरोग प्रसार रोखण्यासाठी बी-पाल्म उपचारांसह विशेष मोहीम

आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

 

मुंबईदि. १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला असूनत्यानुसार राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची चाचणी करूननिदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराखाली आणण्यावर भर देण्यात येत आहे. तसेचक्षयरोगविरोधी औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांसाठी राज्यात नव्याने बी-पाल्म (BPaLM) उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहेअशी माहिती आरोग्य राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री  साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.

सन २०२५ मध्ये २ लाख ३० हजार क्षयरुग्ण नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असूनजानेवारी ते मे या कालावधीत राज्यात १७ लाख ३० हजार ८०८ क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामधून ९५ हजार ४३६ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले असूनत्यांची केंद्र शासनाच्या 'निक्षयप्रणालीवर नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना तत्काळ उपचाराखाली आणण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेअंतर्गत उपचारादरम्यान योग्य पोषण मिळावे यासाठी रुग्णांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक क्षयरुग्णासाठी निक्षय मित्र’ नेमले जात असूनउपचारादरम्यान किमान सहा महिन्यांसाठी फूड बास्केट’ पुरविण्याची कार्यवाही सुरू आहे. क्षयरोग दूर करण्यासाठी ही मोहीम लोकचळवळ व्हावी यासाठी सर्वसामान्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सभागृहात केले.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य बाबासाहेब देशमुखसमीर कुणावरनीषा चौधरी आणि विक्रम पाचपुते यांनीही सहभाग घेतला होता.

0000

विधानसभा लक्षवेधी सूचना : डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई

 

विधानसभा लक्षवेधी सूचना :

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या

दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई

मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. १ : डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचे तत्काळ निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

   सदस्य विनोद निकोले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.

 मंत्री श्री. पाटील म्हणालेदुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी जबाबदार ठरलेल्या हरिश बोरवेल्स या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा प्रश्नोत्तर : टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांनी कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक - पर्यावरण मंत्री

 वृत्त क्र. ११

विधानसभा प्रश्नोत्तर :

टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांनी

कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. १ : टायर पायरोलिसिस रिसायकलिंग प्रक्रियेविषयी राष्ट्रीय हरित लवादाने तयार केलेल्या कार्यप्रणालीचे पालन करणे सर्व टायर रिसायकलिंग कंपन्यांसाठी बंधनकारक असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

सदस्य दौलत दरोडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्याटायर पायरोलिसिस प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीराष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक सुस्पष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सहसंचालकद्योगिक सुरक्षा व आरोग्ययांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मागील तीन वर्षात पायरोलीसीस पद्धतीने स्क्रॅप टायरपासून पायरोलीसीस ऑईल व कार्बन ब्लॅक पावडर बनविणाऱ्या कारखान्यामध्ये सात अपघात झाल्यामुळे या अपघातांची सखोल चौकशी करुन सात फौजदारी खटले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीवसई यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

****

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दोषींवर कारवाई करणार

 कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत

दोषींवर कारवाई करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबई दि. १ : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होणार आहे. अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईलअसे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

 

विधान परिषद सभागृहात इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य प्रसाद लाडप्रविण दरेकरश्रीमती उमा खापरेअशोक ऊर्फ भाई जगतापश्रीमती चित्रा वाघडॉ.परिणय फुकेसदाशिव खोत आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

मंत्री श्री. भोसले म्हणालेपुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीस-पस्तीस वर्षांपूर्वी सदर लोखंडी पूल उभारण्यात आला होता.लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना १५ जून२०२५ रोजी घडली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती नियुक्त केली आहे.

मंत्री श्री. भोसले म्हणालेनवा पूल उभारण्यासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु सदर पूल उभारताना त्यासोबत पदपथ असावे यासाठी मागणी आल्याने आराखड्यामध्ये सुधारणा करण्यात आली. नवीन पुलाचे काम सुरू करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

              पावसाळ्यात पर्यटकांचा अतिउत्साह व गर्दी होते. यामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या धोकादायक पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. अशा ठिकाणी फक्त धोकादायक असल्याबाबत फलक न लावतासंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तेथे वापर बंद होण्यासाठी सिमेंटचे गरडर अथवा अडथळे उभे करण्यासाठी आदेश देण्यात येतील असेही मंत्री श्री.भोसले यांनी सांगितले.

00000

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

 अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत

तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा (ऑनलाईन) देत असलेल्या कंपन्यांच्याबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी विभागाकडून लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईलअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

विधान परिषद सभागृहात अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत लक्षवेधी सदस्य संदीप जोशी यांनी मांडली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य एकनाथ खडसे ,  सत्यजित तांबेप्रविण दरेकरश्रीमती उमा खापरेअशोक ऊर्फ भाई जगतापश्रीमती चित्रा वाघडॉ.परिणय फुकेसदाशिव खोत आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

मंत्री श्री. झिरवाळ म्हणालेराज्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा२००६ नियम व नियमने मधील तरतुदींनुसार नियमानुसार झेप्टोस्वीगीझोमॅटो इत्यादी कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. एकूण ४३ अन्न ई-कॉमर्स आस्थापनांपैकी सखोल तपासणी दरम्यान अस्वच्छता तसेच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले. या गभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. ३४ अन्न आस्थापनांना त्रुटींच्या सुधारणा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. एक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पाच अन्न आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्री श्री.झिरवाळ म्हणालेई-कॉमर्स आस्थापना या केंद्रीय परवानाधारक आस्थापना असून सदर आस्थापनांच्या गोदामांसाठी राज्याचा परवाना देण्यात येतो. या गोदामांच्या तपासण्या वाढविण्यात येत आहेत.

नागपूर विभागातील शालार्थ लॉगिन गैरवापर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

 विधानसभा लक्षवेधी सूचना :


नागपूर विभागातील शालार्थ लॉगिन गैरवापर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू


- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


 


 मुंबई, दि. १ : नागपूर विभागात शालार्थ प्रणालीच्या लॉगिन आयडीचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपासणी पथक तसेच शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.


विधानसभेत सदस्य अजय चौधरी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य नरेंद्र भोंडेकर, प्रशांत बंब, काशिनाथ दाते, प्रवीण दटके, सुरेश भोळे, मुफ्ती महोम्मद इस्माईल अब्दुल खालिक या सदस्यांनी सहभाग घेतला.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले, यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येणार नाही. आतापर्यंत या प्रकरणात १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, संस्था चालक आणि संचालक यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

विधानसभा लक्षवेधी सूचना : इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 विधानसभा लक्षवेधी सूचना :

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनाचौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबईदि. १ :- मावळ तालुक्यातील (जि. पुणे) इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी दिली.

या संदर्भात सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विक्रम पाचपुते यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. भोसले यांनी सांगितलेइंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल धोकादायक असल्याचे घोषित करून त्यावर हा पूल वापरू नये अशा सूचना लावल्या होत्या. मात्र या पुलावर पर्यटकांची गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडून चार व्यक्तींचा मृत्यू झाला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या १६ हजार ३४५ पुलांचे नियमित  स्ट्रक्चरल ऑडिटदुरुस्ती व सुरक्षिततेचे काम वेळोवेळी होत असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणालेराज्यात सध्या चार पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे.  याशिवाय आणखी आठ पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट प्राप्त होताच त्यांचीही दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी केली जाईलअसेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

०००

Featured post

Lakshvedhi