Thursday, 3 July 2025

विधानसभा प्रश्नोत्तर : ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ११.३३ कोटींची औषध खरेदी

 विधानसभा प्रश्नोत्तर :

ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 

११.३३ कोटींची औषध खरेदी

- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. ३ : ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून २०२४- २५ मध्ये ५० कोटींची औषध खरेदी नसून ११ कोटी ३३ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. आयुक्त आरोग्य सेवाएकात्मिक आदिवासी विकास योजना आणि नियोजन समितीच्या निधीतून ही औषध खरेदी करण्यात आली आहेअसे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य राहुल पाटील यांनीही सहभाग घेतला. उत्तरात अधिक माहिती देताना राज्यमंत्री म्हणाल्याही औषध खरेदी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली आहे. औषध खरेदीमध्ये कुठलाही अपहार झाला नाही.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?, आमदार अतुल भातखळकर

 महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?



मुंबई, दि. ०३ जुलै (प्रतिनिधी)

गुरुवारी (०३ जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सत्रादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले, “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या आपण प्रयत्नात आहात हे कधी पर्यंत वाढणार?”

यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या बाबीवर सभागृहाचे लक्ष केंद्रित करत सवाल केला की, “मुंबई शहर व उपनगरात या दोन आरोग्य योजनांमध्ये अंतर्भूत रुग्णालयांची संख्या कमी आहे. या संदर्भातल्या किंमती राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ठरवलेल्या आहेत त्या अत्यंत स्पर्धात्मक आहेत ही चांगली गोष्टं  असली तरीही त्या मुंबईसारख्या शहराच्या रुग्णालयांना परवडणाऱ्या किंमती नाहीत. त्यामुळे रुग्णालय या योजनेत यायला टाळाटाळ करतात. त्याकरिता उपाययोजना करुन रुग्णालयांना या योजनेत आणण्यासाठी सरकार किती गती देणार आहे?”

याव्यतिरिक्त भातखळकरांनी “धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरक्षित खाटा असतात त्याचा गरजू रुग्णांना १०० टक्के लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे पण त्यासोबतच महाराष्ट्रातल्या सर्व चॅरिटेबल रुग्णालयाच्या ऑनलाइन डॅशबोर्ड आपण लोकांकरिता उपलब्ध करणार आहोत का?” असा प्रश्न उपस्थित केला. “आपण सॉफ्टवेअर तयार केलं आणि रुग्णालयांना ते बसवणं सक्तीचं केलं तर खरोखर त्यांच्याकडे किती खाटा रिकाम्या आहेत हे आपल्याला मंत्रालयात बसूनही कळू शकेल. त्यामुळे अशी योजना असेल तर ती कधी पर्यंत अंमलात आणणार?”

आमदार भातखालकरांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नांना उत्तर देत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, “जी ऑनलाईन व्यवस्था आहे तिची रियलटाईम माहिती देणारा सॉफ्टवेअर आधीच अपलोड केलेला आहे बहुतांश रुग्णालय याचे पालन करीत आहेत. जी रुग्णालये याचे पालन करत नाही त्यांना आपण नोटीस दिलेली आहे की आपण तात्काळ हे लागू करावे, अन्यथा तुमच्यावर कदम 66 नुसार कारवाई करण्यात येईल. या संदर्भात आपल्याला  अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरता येईल लोकांसाठी रियलटाईम डेटा पब्लिक डोमेनमध्ये ठेवता येईल असे प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त रुग्णालयात आरोग्यदूतही ठेवण्याची प्रयत्न सुरू आहेत.”

नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप

 नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच

शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील

मुंबईदि. १ : राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रमराठवाडाविदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असूनपंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईलअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधान परिषद सदस्य सर्वश्री राजेश राठोडअभिजित वंजारीप्रवीण दरेकरशशिकांत शिंदेसतेज पाटील यांनी राज्यात अवकाळी पाऊसवादळी वारे आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि जनजीवनाच्या नुकसानीबाबत मदतीचे वाटप करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना मंत्री जाधव-पाटील म्हणाले कीराज्यात वीज पडून 63 जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही त्यांना दोन दिवसांत ती देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी यावेळी सांगितले. 

शेती पिकांच्या नुकसानीबाबत बोलताना मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी सांगितले कीएकूण 75,355 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 1,68,750 शेतकरी प्रभावित झाले आहेत. यासाठी सुमारे 213 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे.

ओल्या दुष्काळासंदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 24 तासांत 65<


घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार

 घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून

पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १ : राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण लागू केले आहे. या धोरणाअंतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांमार्फत ही वाळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेअशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री दादाराव केचेशशिकांत शिंदेॲड.अनिल परब यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडा येथे अवैध वाळू साठ्याचा तपास केला होता. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असूनमोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यांमध्ये नदीतून चोरटी वाळू काढण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी ड्रमपाईपचाळण्याटोपले आदींचा समावेश आहे. या प्रकारावर कारवाई करताना संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली असूनशासनाच्या सूचनेनुसार दोषी तलाठी व महसूल निरीक्षकांना निलंबित करण्यात येणार असल्याचेही महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शासनाने वाळू चोरी रोखण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात एम.सी.आर.डी.ओ. धोरण लागू करून प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर युनिट्स सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होईल आणि वाळूचा तुटवडा कमी करून काळाबाजाराला आळा बसेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक ग्रामपंचायतीनगरपंचायती व खासगी बांधकामांसाठी देखील ठराविक दराने वाळू उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे सांगून महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले कीया सर्व प्रक्रियेचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असूनहे पोर्टलमार्फत पारदर्शकपणे राबवले जाणार आहे.

गृह व महसूल खात्यांनी संयुक्त निर्णय घेतला आहे कीवाळू चोरीसंदर्भात महसूल किंवा पोलीस यांपैकी कोणाकडेही गुन्हा दाखल झाला असेल तरी दोन्ही विभाग हे संयुक्त कारवाई करतीलअसे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवरील हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार

 मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवरील हत्या प्रकरण

फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार

- गृहराज्यमंत्री योगेश कदम

 मुंबईदि. १ : मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असूनया प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईलअसे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळावायासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येईलअसेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य देवयानी फरांदे यांनी प्रश्न उपस्थित केला.

गृहराज्यमंत्री श्री. कदम म्हणालेसदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. फॉरेन्सिक तपास अहवाल निश्चित वेळेत प्राप्त व्हावायासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

*****

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

 अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 मुंबईदि. १ : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असूननागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

याबाबत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य नाना पटोलेजितेंद्र आव्हाड यांनी उपप्रश्न विचारले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवानेनोंदणी व अधिकृत मंजुरी आहेत की नाहीयाची खातरजमा करावी. कोणतेही अतिरिक्त लाभाचे किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावे. अशा योजनांमार्फत फसवणुकीचे प्रकार घडू नयेत याकरिता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट कार्यरत करण्यात आले असूनसंबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.

  टोरस कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी शासनाने कारवाई सुरू केली असूनमागील तीन महिन्यांपासून एमपीआयडी कायद्यान्वये कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली.

विधानसभा कामकाज बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

 

विधानसभा कामकाज

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १ : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेवरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापना करून या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.

****

Featured post

Lakshvedhi