Thursday, 3 July 2025

सन २०२३-२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर

 सन २०२३-२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. २ :- सन २०२३-२०२४  मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असूनयातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित रक्कम देखील दोन ते तीन दिवसांत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईलअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.

 

या संदर्भात सदस्य सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधी मांडली.  या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य श्वेता महालेशेखर निकममनोज कायंदेसंजय कुटेरोहित पवारआशिष देशमुखअमित झनकचंद्रकांत नवघरेश्रीजया चव्हाणआदित्य ठाकरेकैलास पाटीलअभिजित पाटीलअमोल जावळेबाबाजी काळेकिसन वानखेडे आदींनी सहभाग घेतला.

 

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितलेशेतकरी हा अन्नदाता आहे. नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे असल्याचे सांगून श्री. जाधव पाटील म्हणालेनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यास एनडीआरएफच्या निकषांपेक्षा कमी मदत दिली जाणार नाही.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे पंचनामे होऊन याबाबतचा अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकरलोणारचिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यात ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याने ५० हजार ३९७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनकापूसमूगभाजीपाला यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवायसुमारे ७३ घरांची अंशतः पडझड झाली असूनदुर्दैवाने दोन नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. बाधित  शेती आणि घरांच्या नुकसानीची तातडीने पंचनाम्याचे काम सुरू केले असून याचा अहवाल प्राप्त होताच एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वितरित केली जाईलअसे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील यांनी सांगितले.

शासकीय जमिनींच्या वर्गीकरणातील नियमांमध्ये सुस्पष्टतेसाठी विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

 शासकीय जमिनींच्या वर्गीकरणातील नियमांमध्ये सुस्पष्टतेसाठी

विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २ : सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषीवाणिज्यिकऔद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा शासकीय जमिनींचे वर्गीकरण भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांमध्ये सुस्पष्टतेसाठी विशिष्ट कार्यप्रणाली आणण्यात येईल. याबाबत अधिवेशन काळात बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

 

सदस्य सुनील प्रभू यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवारअमित साटमअतुल भातखळकरयोगेश सागर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

 

मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेदि. ८ जानेवारी २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार भाडे तत्वावरील जमिनींच्या वापर आणि वर्गांत (वर्ग-२ व वर्ग-१) रूपांतरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. या अंतर्गत गृहनिर्माण संस्थासहकारी संस्थावाणिज्यिक तसेच औद्योगिक वापरासाठी जमिनींच्या वर्गीकरणात ठराविक अटी व अधिमूल्य आकारणीची तरतूद आहे. विशेषतः अल्प उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पाच टक्के दराने वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरणाची तरतूद करण्यात आली आहे. यावर आणखी सवलत देता येईल कायाबाबत तपासणी करून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल. कायद्यात ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शाळांच्या अडचणीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार

 विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शाळांच्या अडचणीसंदर्भात

 धोरणात्मक निर्णय घेणार

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. २ : विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शाळांच्या अडचणी संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून या भागातील सर्व शाळांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईलअसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा,इमारतखेळाचे मैदानजागा आणि विद्यार्थ्यांना असणाऱ्या आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी गठीत समितीच्या अहवालानुसार धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये मुरजी पटेलमनीषा चौधरी, ज्योती गायकवाड यांनी चर्चेत सहभागी घेतला.

0000

महापालिका वसाहतीमधील सदनिका संदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करणार

 महापालिका वसाहतीमधील सदनिका संदर्भात

 उच्चस्तरीय समिती गठीत करणार

-         उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 2 महानगरपालिका हद्दीतील चेंबूर घाटलामिठानगरमालवणीदेवनारपार्क साईट विक्रोळीबर्वेनगर घाटकोपर या महापालिका वसाहतीमधील अनुज्ञा व अनुमती तत्वावर दिलेल्या बैठ्ठ्या खोल्या मालकी तत्वावर करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मच्याऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आला आहे. यासंदर्भात उच्च स्तरीय समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानससभेत सांगितले.

विधानसभा सदस्य तुकाराम काते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री उदय सामंत म्हणाले कीसदनिकांवरील मालकी हक्कन्यायालयीन आदेश आणि पुनर्वसन योजनेतील सहभाग अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीतकरून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री. सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

सदस्य सुनील प्रभूसना मलिकयोगेश सागर हे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शिराळा नागपंचमी संदर्भात केंद्रीय वन मंत्र्यांसोबत बैठक

 शिराळा नागपंचमी संदर्भात केंद्रीय वन मंत्र्यांसोबत बैठक

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबई‍‍दि. २ : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दरवर्षी नागपंचमीच्या सणानिमित्त नागधामण यासारख्या जिवंत सर्पांची पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिराळा येथील पारंपरिक नागपंचमी साजरी करण्याच्या परंपरेबाबत नागरिकांच्या भावना आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदी  या पार्श्वभूमीवर केंद्रीय वन मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे असे वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सत्यजित देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य जयंत पाटीलअर्जुन खोतकरगोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री. नाईक म्हणालेमा. उच्च न्यायालयाने २००३ व २०१४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने समिती गठीत करून राज्य कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला २६ फेब्रुवारी २०१५ रोजी शासन मान्यता मिळाली असून दरवर्षी नागपंचमीस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातात.


विकसित महाराष्ट्र २०४७' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

 'विकसित महाराष्ट्र २०४७साठी सर्वेक्षणामध्ये

नागरिकांनी मत नोंदवावे

 

मुंबईदि. २० : 'विकसित महाराष्ट्र २०४७चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय  नागरिकांचे मतअपेक्षाआकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर नागरिकांनी आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.https://wa.link/o93s9यावर आपले मत नोंदवावे, असे आवाहन नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

              केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दि. ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

          या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) तयार करण्यात येणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) तयार करताना दीर्घकालीनमध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) चा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषिशिक्षणआरोग्यग्राम विकासनगरविकासभूसंपदाजलसंपदापायाभूत सुविधावित्तउद्योगसेवासामाजिक विकाससुरक्षासॉफ्ट पॉवरतंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतशीलशाश्वतसर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीशासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मतअपेक्षाआकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिनांक १७ जून२०२५ रोजी झाले आहे. सर्व आयुक्तजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेतअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार

 धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानअंतर्गत

आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार

 

          जळगावदि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानअंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

          कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटीलवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेआदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईकेखासदार स्मिता वाघआमदार सुरेश भोळेआमदार मंगेश चव्हाण,पद्मश्री चैत्राम पवारअनिल भालेरावशरदराव ढोलेजिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

          मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेक्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक अत्यंत सुंदर झाले आहे. राणी दुर्गावतीभगवान बिरसा मुंडासिद्धू-कान्हूतंट्या मामाझलकारी बाईराघोजी भांगरेभिमा नाईकरुमाल्या नाईकराणा पुंजा भिलयांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शन या स्मारकात घडते. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाहीतर येथे आश्रमशाळा असून अस्मिता जागवण्याचे कार्यही केले जाते. भविष्यात येथे महिलांसाठी कौशल्य विकास व फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. संस्कृती संवर्धनाचाही उपक्रम येथे राबविण्यात येईल.

          छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यानंतर जनजाती समाजातील अनेक नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. परंतु त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा नायकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

          खाज्याजी नाईक यांनी १८५७ च्या समरात भिल्ल जमातीचे ३० हजार लढवय्ये उभे करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात मोठा लढा दिला. त्यांच्या लढ्यामुळे इंग्रजांची सत्ता हादरली. इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले. त्यांच्यावर त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र खरेदी केली. जिथे अन्यायतिथे खाज्याजी नाईक’ हे समीकरण बनले होते. अंबापाणीच्या लढाईत महिलांनीही शौर्य दाखवले. खाज्याजी नाईक अधिक काळ जगले असते तर कदाचित इंग्रजांना भारत सोडावा लागला असताअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'धरती आबायोजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले असूनपुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षणआरोग्यपोषणरोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

          गोर बंजारा समाजाने देशभरात बावड्यातलाव व पाणवठे उभारून समाजसेवा केली आहे. अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल," असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

              कार्यक्रमात शरदराव ढोलेअनिल भालेरावपद्मश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक समितीचे सचिव विलास महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोद्री येथील प्रसंगांवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.

खाज्याजी नाईक स्मृतीस्थळाचे उद्घाटन

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याजी नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.

Featured post

Lakshvedhi