Thursday, 3 July 2025

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही;,ol share

 वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही;

परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

मुंबईदि. १६ : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचणअडथळा निर्माण होणार नाहीअशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे वाहून नेत असल्यासअशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पर्यावरणास अनुकूलव्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतातयाकरीता बरेचसे वाहन धारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.

मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीतअसे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई होणार नाहीपरिपत्रकात नमूद केल आहे.


मुंबईतील वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू करावे,वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना

 मुंबईतील वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू करावे

-         मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना

 

मुंबईदि. 16 : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावेतसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे आज मंत्रालयात मंत्री श्री.राणे यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह कोची मेट्रो रेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर मेट्रोच्या कामासाठी मंत्री राणे यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आता लवकरच वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. 

मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी  मोठ्या संधी असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले कीविशेषतः बांद्रावरळीवर्सोवादक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वॉटर मेट्रोचे मार्ग निवडताना या संधींचा पूर्ण विचार करावा. जास्तीत जास्त प्रवासी असणारा आणि जास्तीत जास्त फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरवताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. तसेच त्यांना वाहतुकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.राणे यांनी यावेळी दिल्या.

            मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणेबोट खरेदीइतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे

 नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे

-मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबईदि. 16 : राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या विविध दुर्घटना आणि त्यात झालेले नागरिकांचे मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावेअसे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.

 

मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडल्याने नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी संबंधित रेल्वेमेट्रोपोलीसमहानगरपालिकाप्रशासकीय यंत्रणा आदींची बैठक घेऊन रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

 

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्यापावसाळा आणि त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात सर्व यंत्रणांनी अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. रेल्वेने या कालावधीसाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करून आवश्यकता भासल्यास निवृत्त आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. रेल्वे आणि मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. ज्या ठिकाणी प्रवाशांची अधिक गर्दी होते तेथे डिस्प्लेबोर्डअनाउन्समेंट सिस्टीमसोशल मीडियाएफएम रेडिओ आदींच्या माध्यमातून प्रवाशांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. लोकलचे दरवाजे बंद होतील अशी व्यवस्था करण्याबाबत पावले उचलावीत. गर्दी जास्त झाल्यानंतर लिफ्टप्रमाणे सायरन वाजेल अशी व्यवस्था करावी. अधिक पाऊस आणि भरतीच्या वेळी विशेष काळजी घ्यावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

दुर्घटनेच्या काळात चुकीची माहिती पसरू नयेयाची दक्षता घेण्याची सूचना मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी केली. त्या म्हणाल्यातातडीने आणि योग्य माहिती नागरिकांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी. याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सर्वत्र बॅगेज स्कॅनर लावण्यात यावेत. दुर्लक्षित बॅगा तसेच कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलावीतअसेही त्यांनी सांगितले.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहपोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायणमहामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवालबृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरयांच्यासह रेल्वेमहसूलगृहपरिवहननगरविकास आदी विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी ज्या भागात नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहेत्याच भागात आवश्यक माहिती प्रसारित होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. त्याचबरोबर माहिती दिल्या जाणाऱ्या विविध माध्यमांतून एकसारखी माहिती दिली जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा,विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

 पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

मुंबई, दि. १७ : मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना कौशल्यरोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री श्री. लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

मंत्री श्री.लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावीशाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी एक सोहळा होऊन अविस्मरणीय ठरावाया उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित करावी त्यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेस्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठीही महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.

मंत्री श्री.लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी दिली. यापुढे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास मंत्री प्रयत्नशील राहतीलअसा दृढ विश्वासही कंकाळ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सहायक उपायुक्त मनीष वळंजूकवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख श्रोमती सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

 अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

              श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावीतसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभागइतिहास तज्ज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रेपरिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीतअसे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

 येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १७ : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन - साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोतअसे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरधाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारजिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोषअतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री. तुळजाभवानी देवीतुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवताप्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

             हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादनतांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही बाबी समांतर पातळीवर करण्यात याव्यात.  तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री श्री. सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा

 वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

 

मुंबई, दि. १७ : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी  या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना जागेचा सर्वे करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा- आष्टा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मानेआमदार सुहास बाबरगौरव नायकवडी आदी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसी करिता जागा अंतिम झाल्यानंतर त्या जागेचा कालमर्यादेत विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असूनवाळवा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवे आयाम मिळणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi