Wednesday, 11 June 2025

नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू,सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये


मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू


सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा


 


मुंबई, दि. 11 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील दुर्लक्षित भागांतील नागरिकांसाठी एक दिलासादायक आरोग्य सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी सॅनोफी इंडिया लिमिटेड, नागपूर महानगरपालिका आणि पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन व संशोधन संस्था (पीएसएमआरआय) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार होऊन दोन मोबाइल मेडिकल युनिट्स (एमएमयू) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.


हा उपक्रम सॅनोफीच्या सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी -सीएसआर) कार्यक्रमांतर्गत राबविला जात आहे. नागपूरमधील 30 वर्षांवरील सुमारे दोन लाख नागरिकांना या माध्यमातून मोफत प्राथमिक आरोग्यसेवा मिळणार आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब व तोंडाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार अथवा पुढील रुग्णालयीन सेवेसाठी रुग्णांना पाठविणे हे या युनिट्सचे मुख्य उद्दिष्ट आहे.


ही मोबाइल युनिट्स शहरातील आझाद कॉलनी, बडा ताज, बीडी पेठ, बिनाकी, छोटा जात, धंतेश्वरी नगर, धरम पेठ, डॉ. आंबेडकर नगर, एकात्मता नगर, गिट्टीखदान, गोपाल नगर, जैताळा, जयंती नगर, महात्मा फुले चौक, नंदनवन, पाचपोळी आदी विविध भागातील मार्गावर कार्यरत असून, नागरी गरीब व वंचित समाजघटकांपर्यंत सातत्याने आरोग्यसेवा पोहोचवली जात आहे. यासोबतच आरोग्य विषयक जनजागृती, जीवनशैली सुधारणा आणि व्यसनमुक्ती सल्ला सेवा यांचा समावेश देखील या उपक्रमात करण्यात आला आहे.


राज्य शासनाच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयाशी सुसंगत


हा उपक्रम राज्य शासनाच्या सर्वसमावेशक व सुलभ आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्यामुळेच या सेवांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनासोबत अधिक सघन सहकार्य करण्यात येणार आहे.


00000

Paraguay President calls for international cooperation to fight drug mafia in Latin America

 Paraguay President calls for international cooperation

to fight drug mafia in Latin America

 

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan hosted a reception in honour of the President of the Republic of Paraguay Santiago  Peña Palacios upon his arrival in Raj Bhavan, Mumbai on his first State Visit to Maharashtra on Wed (4 Jun).

President Santiago Peña who is on a 3 day visit to India, expressed his deep admiration for all that he has witnessed during his visit to India. 

He expressed hope that India, as the world’s fourth-largest economy and largest democracy, will play an even more significant role on the global stage in the years ahead.

Highlighting Paraguay’s strengths as the 'food basket of Latin America', the President emphasized that his country has much to offer and is keen to build strong partnerships with India in the areas of agriculture, green energy, etc.

The President noted that the two nations share many common values and interests, forming a solid foundation for enhanced cooperation across multiple sectors.

The Paraguayan President said Paraguay is not involved in any war or conflict . He told the Governor that Latin America is suffering from organised crime and drug trafficking. He said Latin America is a large producer of drugs although Europe is the consumer. He called for international cooperation to fight the menace of the drug mafia.

President Santiago Pena said in the year 1955, during a session of the United Nations General Assembly, Paraguay had paid a special tribute to Mahatma Gandhi, recognizing his philosophy of non-violence (Ahimsa) and his immense contribution to the global struggle for peace and justice.

The President of Paraguay was accompanied by Foreign Minister Ruben Ramirez Lezcano, Ambassador of Paraguay in India Fleming Raul Duarte Ramos, National Senator of Paraguay Natalicio Chase, Member of Parliament Miguel del Puerto, Governor of the Department of Amambay Juan Acosta and other representatives.

The Governor hosted a State Banquet in honour of the Paraguayan President and his delegation. Chairman of Maharashtra Legislative Council Ram Shinde, Minister of Protocol Jaykumar Rawal, Chief of Staff, M G & G area Maj Gen Bikramdeep Singh, Flag Officer Commanding Maharashtra Area Rear Admiral Anil Jaggi and invitees were present.

0000

महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी

 महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये

स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबईदि. 4 : राज्यातील सर्व महामार्गावरील धाबेहॉटेलमॉल या ठिकाणांसह सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत असणे ही सर्वच विभागांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनीच दक्ष असले पाहिजे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळुन) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.

            मंत्रालयात महिला शौचालयांसंदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार चित्रा वाघसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेराज्य परिवहन महामंडळाचे महा व्यवस्थापक दिनेश महाजननगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह महिला बाल विकास विभागग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महामार्गालगत शौचालयांची विशेषतः महिलांसाठीच्या शौचालयाची व्यवस्था चांगली असणे गरजेचे असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले कीमहिला शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आणि अन्य तक्रारीसंदर्भात क्युआर प्रणाली विकसीत करण्याविषयी आराखडा तयार करावा. क्युआर कोडच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागस्तरावरील अधिकारी तातडीने कारवाई करतील. महामार्गावर उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीएसआरच्या माध्यमातून 400 शौचालये उभारण्यात येणार आहेत. महिला बाल विकास विभागामार्फत या शौचालयांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. शौचालयांमध्ये चांगल्या प्रकारचे एक्झॉस्ट फॅन पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी पॅड व्हेंडिग मशिन्स बसवणे यासारख्या सुविधांही उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या.

महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपावर पुढील बाजूस शौचालय उभारण्याचा नियम करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले कीसार्वजनिक शौचालयाविषयी नगरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी चांगली शौचालये उभारावीत आणि त्याच्या देखभालीची व्यवस्थाही निर्माण करावी. शहरांमध्ये उभारण्यात येणाऱ्या शौचालयांचे चांगले डिझाईन स्विकारुन त्यानुसार बांधकाम करावे. त्यामध्ये खेळती हवा असावीसमोर भिंत उभारावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शौचालयांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन करता येईल. सर्वच संबंधित विभागांनी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी कडक उपाययोजना कराव्यात. शौचालयांच्या तपासणीसाठी पथकांची निर्मिती करावी. एसटी महामंडळाने त्यांच्या बसगाड्यांना दिलेल्या थांब्याच्या ठिकाणी शौचालये सुस्थितीत असल्याची वारंवार खात्री करावी.

            राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 लाख 60 हजार शौचालये उभारण्यात येत आहेत.  यापैकी 83 हजार शौचालये ही महिलांसाठी असणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच समुह विकास अधिकारी यांच्यामार्फत शौचालयांची तपासणी करुन त्याच्या देखभालीचे मूल्यमापन करून एखाद्या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

0000

भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया

 भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योगआर्थिक क्षेत्रांसह सामाजिकसांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई दि. 4 :- भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिकसांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचे वेगळे नाते आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीतपायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तरपुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिकआर्थिकसामाजिक प्रगतीतरोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योगआर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिकसांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुयाअसं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.

जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासहउद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योगआर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक, सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

मुंबईपुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्तेपुरेशी वीजआवश्यक पाणीसुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहेती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्तेवीजपाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातीलअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्यानेसामाजिक उत्तरदायित्व निधीजायकाएस.टी.पी.पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.

कृती आराखडा: महाराष्ट्र 2029

 कृती आराखडा: महाराष्ट्र 2029

राज्याच्या गतीमान प्रशासनामुळे विविध उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीशंभर दिवसाच्या कार्यक्रमातंर्गत  अतिशय चांगली अंमलबजावणी सर्व प्रशासकीय विभागांनी केली असून  सध्या प्रशासनासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक विभागाने विकसित महाराष्ट्र 2047’ या दीर्घकालीन ध्येयासाठी आपापल्या विभागांची उद्दिष्टेकृती आराखडा तयार करायचे आहेत. या योजनेत तीन टप्पे असून त्यात दीर्घकालीन दृष्टिकोन: महाराष्ट्र 2047 तसेच  मध्यम कालावधीचा आराखडा: महाराष्ट्र 2035 आणि तत्काल कृती आराखडा: महाराष्ट्र 2029 या  तीन टप्प्यांचा समावेश असेल. या सर्व टप्प्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असून त्याचा प्रशासनावर आणि उद्योगांवर होणारा परिणामआणि नवीन गुंतवणुकीच्या संधी यांचा विचार केला जातअसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

 टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

मुंबईठाणे आणि पुणे या पारंपरिक औद्योगिक केंद्रांपलीकडेराज्य शासनाने आता टियर २ आणि 3 शहरांमध्ये औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर हे आता ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उद्योगाचे केंद्र बनले असून अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या ठिकाणी आर्थिक वाढीसाठी पूरक वातावरण तयार होत आहे. गडचिरोली हे देशातील नवीन स्टील सिटी म्हणून उभारले जात आहेजिथे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. नागपूरनाशिक आणि धुळे यांसारख्या शहरांमध्येही माहिती तंत्रज्ञानउत्पादन आणि अन्य क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होत आहे. या सर्व शहरांमध्ये केवळ उद्योगच नव्हेतर दर्जेदार पायाभूत सुविधास्वच्छतापाणीपुरवठारस्तेकरमणुकीच्या सुविधा यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महामार्गाच्या कडेला झाडे लावण्याची जबाबदारी आता वन विभागाकडे,सावली देणारी देशी झाडे लावावीत

 महामार्गाच्या कडेला झाडे लावण्याची जबाबदारी आता वन विभागाकडे

राज्यातील राष्ट्रीय महामार्गराज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात १ कोटी झाडे लावण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय जोतिबाच्या डोंगरावही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाड्यात विशेषतः बीडलातूर सारख्या जिल्ह्यात सर्वात कमी वृक्ष लागवड असून तेथील झाडांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबविण्याची सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. बांबू मिशन हे सर्वच विभागांचे मिशन समजून सर्वांनी काम केले पाहिजेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

सावली देणारी देशी झाडे लावावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या कडेला झाडे लावताना भविष्यात होऊ शकणाऱ्या रस्ता रुंदीकरणाचा विचार करण्यात यावा. तसेच या ठिकाणी जांभूळबहावासुरंगीपिंपळवडकडूलिंबअर्जून या सारखी देशी व सावली देणारी झाडे लावण्यात यावीत. राज्यातील प्रत्येक भागात वेगवेगळी झाडे जगतात. त्यानुसार झाडांचे रोपण करण्यात यावे. वस्त्रोद्योग,पणन यासारख्या विभागांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करू - वन मंत्री गणेश नाईक

वन मंत्री गणेश नाईक म्हणाले, महामार्गांवर वन विभागाच्या वतीने झाडे लावण्यात येतील. तसेच कॅम्पाअंतर्गतच्या निधीचा पुरेपूर वापर वृक्षारोपण अभियानासाठी करण्यात येणार असून दहा कोटी वृक्षारोपणाची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

वृक्ष लागवड व देखरेख प्रणालीचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेसंदर्भात अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व देखरेखीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. बांधकाम विभागाच्या वतीने राज्यात विविध भागात करण्यात येत असलेल्या वृक्षारोपणाची व त्याच्या देखरेखीची माहिती या अँपद्वारे मिळणार आहे. अँड्रॉईड व आयओएस या दोन्ही प्रणालीवर हे अँप चालणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्तजिल्हास्तरावरील महसूलवन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi