Monday, 9 June 2025

जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 

मुंबईदि. 9 गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहेआणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रामुख्याने विदर्भमराठवाडाआणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहेतर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.

14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपार नंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेलज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नयेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

00000

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे 'स्टॉकहोम कॉन्फरन्स'मध्ये उद्या भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे

'स्टॉकहोम कॉन्फरन्स'मध्ये उद्या भाषण

स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

 

मुंबईदि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral Integrity) या आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. ही परिषद 10 ते 12 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तेथे ज्ञानेश कुमार यांनी स्वीडनमधील भारतीय प्रवासी समुदायासोबत मनमोकळा व संस्मरणीय संवाद साधला.

या संवादादरम्यान त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाच्या समावेशात्मक सहभाग आणि नागरिक सजगतेवरील भर दिला. विशेषत: परदेशस्थित भारतीय (NRIs) आणि प्रवासी भारतीय नागरिक (OCIs) यांच्यासाठी आयोगाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यात ऑनलाइन मतदार नोंदणी प्रणाली (Online Voter Registration System) व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतपत्रक व्यवस्थापन प्रणाली (Electronic Transmission of Postal Ballot Management System) सारख्या उपक्रमांचा समावेश आहेजे परदेशस्थित मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास सुलभ करतात.

            भारताच्या निवडणूक व्यवस्थापनातील नेतृत्वाची दखल घेत उद्या सुरू होणाऱ्या परिषदेमध्ये ज्ञानेश कुमार यांना उद्घाटनपर कीनोट भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय निवडणुकांचा व्यापक व्यापप्रचंड लॉजिस्टिक यंत्रणा व त्यातील व्यवस्थापन प्रणाली अनेक देशांच्या निवडणूक संस्थांना आकर्षित करत असते. सुमारे 50 देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत. ही परिषद इंटरनॅशनल आयडिया (लोकशाही आणि निवडणूक सहाय्य (International Institute for Democracy and Electoral Assistance) या संस्थेद्वारेस्वीडन परराष्ट्र मंत्रालयस्वीडिश निवडणूक प्राधिकरण आणि ऑस्ट्रेलियन निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

परिषदेच्या पूर्वसंध्येला आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडिया (International IDEA) चे महासचिव केविन कॅसस-झमोरा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडमनेदरलँड्सफ्रान्सदक्षिण आफ्रिकाइंडोनेशियामेक्सिकोमंगोलियाआणि स्वित्झर्लंड यांच्यासह सुमारे 20 देशांच्या निवडणूक आयुक्तांशी द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. या भेटी भारताच्या जागतिक लोकशाही सहकार्य आणि उत्तम सरावांच्या देवाण-घेवाणीत योगदान करतील.

या दौऱ्यात ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडियाच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या संचालिका श्रीमती लीना रिक्किला तमंगनामिबियाच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा डॉ.एल्सी टी. न्गिकेंबुआआणि मॉरिशसचे निवडणूक आयुक्त अब्दूल रहमान मोहम्मद इर्फान यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत.

ही स्टॉकहोम परिषद निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकतेसमोरील सध्याच्या आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील निवडणूक संस्थांचे प्रमुखधोरणकर्ते आणि संस्थात्मक नेते यांना एकत्र आणते. डिजिटल गोंधळदिशाभूल करणारी माहितीनिवडणूक सुरक्षेची चिंताहवामानाशी संबंधित जोखमीआणि निवडणुकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर चर्चेला या परिषदेत महत्त्व आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने इंटरनॅशनल आयडिया सोबत दीर्घकाळाचे सहकार्य राखले आहे. भारताचे निवडणूक आयोग व भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था (India International Institute of Democracy and Electoral Management) मार्फत जागतिक स्तरावर लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनातील नवोपक्रमांचे नेतृत्व भारत करत आहे.

या दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये आयआयआयडीइएम (IIIDEM) चे महासंचालक राकेश वर्माकायदा विभागाचे उपमहासंचालक विजय कुमार पांडेयआणि मुख्य सचिव राहुल शर्मा यांचा समावेश आहे.

एक कदम स्वच्छता के लिये, आओ चले ,pl share

 Very Beneficial For Big Housing Societies


छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 6.30 वा होणार रवाना

 छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 6.30 वा होणार रवाना

       मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे.

IRCTC, रेल्वे मंत्रालयआणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी ही विशेष पाच दिवसांच्या या  सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे  रायगड किल्लाशिवनेरी किल्लाप्रतापगड किल्लापन्हाळा किल्लालाल महालकसबा गणपतीशिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे.

ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव देईल. सोयीसुविधासांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

00000

 

जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत. पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रियेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

       प्रास्ताविकात राजेश सिन्हा यांनी प्रकल्पाची माहिती दिली. उद्योगांसाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.


70 टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे.

 जॉन डिअरने तंत्रज्ञान आधारित स्मार्ट मशिन्स महाराष्ट्रात तयार करून त्या जगात निर्यात कराव्या

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

       पुणे, दि. 8 :  जॉन डिअर इंडिया या पुण्यातील प्रकल्पाने  मेक इन महाराष्ट्रला महत्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट मशिन्सच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       शिरुर औद्योगिक वसाहत क्षेत्रात जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त  दीपक सिंगला, पोलीस अधिक्षक संदीप गिल, राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी उपस्थित होते.

       महाराष्ट्रासह भारत आणि पूर्ण जगात जॉन डिअरने आपले मूल्य कायम ठेवत प्रगती साधली असल्याचे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे. जॉन डिअरसारख्या उद्योगसंस्था नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून चांगले कार्य करीत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला असून कृषी प्रक्रियेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येतील, असे ते म्हणाले.

       नुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पना पुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता जॉन डिअरमध्ये आहे. उद्योगसंस्थेला  बाजारातील महत्व कायम ठेवण्यासाठी नाविन्याचा शोध घ्यावा लागतो आणि जॉन डिअर त्यात आघाडीवर आहे. जॉन डिअरने स्मार्ट मशिन्सची ही क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि  स्मार्ट मशिन्स इथे तयार करून जगात निर्यात करावेत. महाराष्ट्रात संस्थेच्या विस्तारात राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली..

       मुख्यमंत्री पुढे म्हणाले,  70 टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडीया आणि मेक फॉर द वर्ल्ड या तिन्ही गोष्टी जॉन डिअर इंडियाने अनुसरल्या आहेत. राज्यातून  9 देशात निर्यात केली जात आहे. संस्थेचा 80 टक्के महसूल हा निर्यातीतून मिळत आहे. डिझाईनींगच्या क्षेत्रात भारतात त्यासाठी आवश्यक  गुणवत्ता उपलब्ध आहे. जॉन डिअरकडून उत्पादनाचे डिझाईनींग आणि प्रमाणिकरण इथे होत आहे.  या दोन बाबी प्रत्येक उद्योगासाठी महत्वाच्या आहेत. संस्था  या दोन्ही गोष्टी इथेच करीत असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्था आहे.

       जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत. पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रियेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

       प्रास्ताविकात राजेश सिन्हा यांनी प्रकल्पाची माहिती दिली. उद्योगांसाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

00000

 

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा

 नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

 

मुंबईदि. 30 : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावाअसे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

            मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री श्री. सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरकंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते.

            बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षीत असल्याचे सूचीत करीत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणालेकंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेताराज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेभाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

            यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

0000

Featured post

Lakshvedhi