Tuesday, 10 June 2025

राज्यात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुले उभारावीत

 राज्यात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुले उभारावीत

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि ६ : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी अत्याधुनिक सुविधांसह तालुका व जिल्हा क्रीडा संकुले उभारणीची कामे करावीत, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे राज्य क्रीडा विकास समितीची बैठक झाली. यावेळी राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गतक्रीडा योजनांमध्ये सुधारणा करणेनवीन धोरणांमध्ये अभिप्रेत असलेल्या योजनांना मान्यता देणेविभागाच्या क्रीडा सुविधा हाती घेणे तसेच क्रीडा योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह महसूल, वित्त, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीराज्यात ३८० तालुक्यात ४२५ क्रीडा संकुलास मान्यता असूनपूर्ण झालेल्या १६२ क्रीडा संकुलात जास्तीत जास्त खेळाडूंना सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. उर्वरित क्रीडा संकुलाची कामे जलदगतीने पूर्ण करून खेळाडूंसाठी ती उपलब्ध करून द्यावीत.

याचबरोबर मुंबई शहरउपनगरधारावीकळवाठाणे येथील क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व उभारणीसंदर्भात जलदगतीने कार्यवाही करावी. कराडकल्याणअंबरनाथचंद्रपूर येथील क्रीडा संकुलाच्या उभारणीबाबत तसेच १२८ तालुक्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या १५० क्रीडा संकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.

2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार

 2030 पर्यंत 52 टक्के वीज  अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार

            सौर ऊर्जा निर्मितीसाठी येणाऱ्या समस्या दूर करण्याला प्राधान्य देत असल्याने वेगाने काम होत आहे. नुकताच रशियाच्या शासकीय कंपनीसोबत थोरियमपासून ऊर्जा निर्मितीत करार करण्यात आला असून हा करार भारतासाठी ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलणारा ठरेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे पर्यावरणाचा विनाश थांबविता येईल आणि 2030 पर्यंत 50 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल. 2030 पर्यंत राज्यात 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

       मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी अन्य मान्यवरांसह अपारंपरिक उर्जेसंदर्भातील प्रदर्शनाला भेट दिली. सुरवातीला त्यांच्या हस्ते महाऊर्जा कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प

 उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला असून ४० प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या २१२ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला असून २०२५-२६ मध्ये ४०० शाळांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सक्षम कार्यक्रमामार्फत २५०० हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या१५०० प्रोटोटाइप तयार झालेतर ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची विक्री केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल दिसून आला असून५०० शिक्षकांना उद्योजकतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.


शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

 शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी


‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी


मुंबई, दि. 9 : युवकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गत दोन वर्षांत नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात शासकीय व अनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या’ माध्यमातून ‘सक्षम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्यमशील मानसिकता विकास कार्यक्रम प्रभावी ठरल्याचे निष्पन्न झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. उद्यम लर्निंग फाउंडेशन ही मेकिन महेश्वरी यांनी ना-नफा तत्वावर स्थापन केलेली संस्था असून 14 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पाधारित शिक्षणातून उद्यमशील मानसिकता व कौशल्ये विकसित करणे तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून देणे ही या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित केली होती.


विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यास हा कार्यक्रम मदत करणार असून या माध्यमातून राज्यातील 17 हजार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत १२ राज्यांतील सरकारी शाळा, महाविद्यालय, आयटीआय संस्थांमध्ये २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना उद्योजकीय शिक्षण दिले आहे.


नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायाला आकार देऊन त्याची वाढ करण्यासाठी राज्यात योग्य वातावरण आपण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख युवा मनुष्यबळ दाखल होत असल्याने त्यांच्या हातांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी ‘सक्षम’ सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रोत्साहन अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


राज्य शासनाच्या यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून ‘सक्षम’ सारखे कार्यक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविल्यास शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेचा पाया रुजवण्याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


2023-24 मध्ये नागपूर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सक्षम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे उद्यमशिलतेला चालना देणारे संस्कार घडविता आले. यातून उत्तम प्रकारे कौशल्य शिक्षणाचा एक यशस्वी प्रयत्न आम्हाला करता आला याचे समाधान आहे. यातून विद्यार्थ्यांनी नोकरी/ स्वयंरोजगार निर्मिती कशी होऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. विद्यार्थ्यांचा विश्वास यातून वाढला. हा उपक्रम भविष्यातही मोठे परिवर्तन साध्य करुन दाखविल, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवाससर्किट रेल्वेला हिरवा झेंडा

 छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ

 

मुंबईदि. 9 : भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मोगलपरकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. ही गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरीलालमहालपुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन ही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच राज्याचे संस्कृती कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि त्यांचा विभागपर्यटन विभाग यांचे अभिनंदन करतो. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. तसेच या पहिल्याच सर्किट यात्रेत प्रवास करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरसांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारसांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगेपर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीभारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीनाआय आर सी टी सी चे राहुल हिमालियनमहाराष्ट्र पर्यटन विभागाचे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वालवरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारीप्रवासी उपस्थित होते.

रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे कडून पारंपरिक ढोल-ताशा यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

पर्यटकांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली माहिती पत्रके वाटून माहीती देण्यात आली. एकूणच उत्साही वातावरणात पर्यटकांना या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

 या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटइतिहासावर आधारीत कार्यक्रम  आयोजित  केले आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधूनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेलत्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावायासाठी महामंडळाचे अधिकारी आयरसीटीसी च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंतप्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेतपर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल

सहल तपशील 

पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे. रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

 लाल महालपुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

कसबा गणपती व शिवसृष्टीपुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

००००

बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा

 बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे

गती व पारदर्शकतने पूर्ण करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 9 :- कारंजाआनंदवाडीमिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण कराअशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडेमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठकउपसचिव श्री. जकातेसह आयुक्त दिनेश देवरेप्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉकरायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.

येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेडबर्फ कारखानावर्कशॉपमासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेडप्रसाधनगृह यांसह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेआनंदवाडी येथील विकासकामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपयेमिरकरवाडा येथील  विकासकामांसाठी 26 कोटी 23 लक्ष रुपये, कारंजा येथील विकासकामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील सात ठिकाणी होत असलेल्या मासे उतरवणी केंद्रातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्री राणे यांनी यावेळी दिले.

0000

सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

 सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

             मुंबईदि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १० जून २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे काम करण्याचे निर्देश  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

 सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच  विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. शिरसाट म्हणालेहा पुरस्कार वितरण सोहळा प्रेरणादायी ठरावा यासाठी प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष द्यावे. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

 मंत्री संजय शिरसाट यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाबैठक व्यवस्थास्वच्छतावाहनतळ व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेतला.

Featured post

Lakshvedhi