Monday, 9 June 2025

बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा

 बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे

गती व पारदर्शकतने पूर्ण करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 9 :- कारंजाआनंदवाडीमिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण कराअशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडेमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठकउपसचिव श्री. जकातेसह आयुक्त दिनेश देवरेप्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉकरायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.

येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेडबर्फ कारखानावर्कशॉपमासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेडप्रसाधनगृह यांसह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेआनंदवाडी येथील विकासकामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपयेमिरकरवाडा येथील  विकासकामांसाठी 26 कोटी 23 लक्ष रुपये, कारंजा येथील विकासकामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील सात ठिकाणी होत असलेल्या मासे उतरवणी केंद्रातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्री राणे यांनी यावेळी दिले.

२०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारासाठी निवड

 सामाजिक न्याय विभागाचा उद्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

             मुंबईदि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १० जून २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे काम करण्याचे निर्देश  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

 सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच  विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. शिरसाट म्हणालेहा पुरस्कार वितरण सोहळा प्रेरणादायी ठरावा यासाठी प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष द्यावे. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

 मंत्री संजय शिरसाट यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाबैठक व्यवस्थास्वच्छतावाहनतळ व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेतला.

उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला

 उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला असून ४० प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या २१२ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला असून २०२५-२६ मध्ये ४०० शाळांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सक्षम कार्यक्रमामार्फत २५०० हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या१५०० प्रोटोटाइप तयार झालेतर ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची विक्री केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल दिसून आला असून५०० शिक्षकांना उद्योजकतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

2023-24 मध्ये नागपूर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सक्षम उपक्रम राबविण्या ते आला

 2023-24 मध्ये नागपूर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सक्षम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे उद्यमशिलतेला चालना देणारे संस्कार घडविता आले. यातून उत्तम प्रकारे कौशल्य शिक्षणाचा एक यशस्वी प्रयत्न आम्हाला करता आला याचे समाधान आहे. यातून विद्यार्थ्यांनी नोकरी/ स्वयंरोजगार निर्मिती कशी होऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. विद्यार्थ्यांचा विश्वास यातून वाढला. हा उपक्रम भविष्यातही मोठे परिवर्तन साध्य करुन दाखविल, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

 शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी

सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

मुंबईदि. : युवकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गत दोन वर्षांत नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात शासकीय व अनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या’ माध्यमातून सक्षम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्यमशील मानसिकता विकास कार्यक्रम प्रभावी ठरल्याचे निष्पन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. उद्यम लर्निंग फाउंडेशन ही मेकिन महेश्वरी यांनी ना-नफा तत्वावर स्थापन केलेली संस्था असून 14 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पाधारित शिक्षणातून उद्यमशील मानसिकता व कौशल्ये विकसित करणे तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून देणे ही या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सक्षम’ कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित केली होती.

विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलताआत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यास हा कार्यक्रम मदत करणार असून या माध्यमातून राज्यातील 17 हजार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत १२ राज्यांतील सरकारी शाळामहाविद्यालयआयटीआय संस्थांमध्ये २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना उद्योजकीय शिक्षण दिले आहे.

नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायाला आकार देऊन त्याची वाढ करण्यासाठी राज्यात योग्य वातावरण आपण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख युवा मनुष्यबळ दाखल होत असल्याने त्यांच्या हातांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी सक्षम’ सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रोत्साहन अधिक उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्य शासनाच्या यंत्रणास्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून सक्षम’ सारखे कार्यक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविल्यास शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेचा पाया रुजवण्याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो

 मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना  दिले आहेत. मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललो आहे.

रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लगेच सामोरे येईल.

एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री


उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक

 उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू

दुर्दैवी आणि क्लेशदायक

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

मुंबईदि. 9 :- मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवीक्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेलअसा विश्वास आहे.

अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवोअशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Featured post

Lakshvedhi