Monday, 9 June 2025

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

 आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

-         गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. ५: आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवासपुरुषमहिलातृतीयपंथी कैदीन्यायाधीन कैदी यांच्यासाठी  स्वतंत्र कोठडीचा समावेश असावा. बहुमजलीपर्यावरणपूरकजास्तीत जास्त ग्रीन एनर्जीचा उपयोग असणाऱ्या कारागृह निर्मितीसाठी महापालिकेला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक बाबत नियमात शिथीलतेचा प्रस्ताव द्यावा. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळाल्यानंतर पुनर्विकासाचा सुधारित आराखडा सादर करावाअसे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

 

मंत्रालयात आयोजित आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबत बैठकीत राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगीपोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीसहसचिव श्री. धपाटेनगरविकास व कारागृह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्री कदम म्हणालेबहुमजली कारागृहाचा प्रस्ताव सादर करताना जगातील अशा पद्धतीने असलेल्या कारागृहांचा अभ्यास करण्यात यावा. सुरक्षेच्यादृष्टीने काटेकोर उपायोजनांचा समावेश आराखड्यात असावा. आर्थर रोड कारागृहाप्रमाणेच भायखळा येथील कारागृहाच्या पुनर्विकास बाबतही आराखडा तयार करावा.

 

नवीन कारागृह निर्मितीसाठी मानखुर्द येथील २२ एकर जागेची पाहणी करण्यात यावी. भविष्यात नवीन कारागृह निर्मिती करताना अडचण येऊ नयेयासाठी या जागेवर आरक्षण टाकण्याची कार्यवाही करण्यात यावीअशा सूचनाही राज्यमंत्री श्री कदम यांनी दिल्या.

०००

पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा - पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

 पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

  • पर्यावरण परिषदेत तज्ज्ञांचे विचारमंथन

 

मुंबईदि. ५ : एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावीअसे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

            जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमाहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीगेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. यासर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणेएकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल.

            पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. मात्रनागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी स्वतः आलेल्या अभ्यागताना बुकेसाडी किंवा शाल ऐवजी अकरा कापडी पिशव्या द्यावेतअसे आवाहन करते. त्यातून जमा होणाऱ्या पिशव्या वापरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहेअसेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना,अन्य प्रकल्पांनाही गती

 कृषीपर्यटन विकासऔद्योगिकीकरणाला चालना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसमृद्धी महामार्गामुळे वेळइंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषीपर्यटन विकासऔद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग मराठवाडापश्चिम महाराष्ट्रकोकण भागासाठी लाभदायक ठरेल,  त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या महामार्गावर वाहन चालकांनी वेग मर्यादेचे व वाहतूक निमयांचे पालन करावेअसेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

अन्य प्रकल्पांनाही गती

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेपर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईलअसे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारीकर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारीनागरिक उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण,महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

 समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेसमृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भमराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेतआता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहेअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा

 पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा

-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि.: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावीअसे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

      विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंगपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगलापुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.    

मेट्रो मार्गाचा विस्तार

          मेट्रो मार्गाचा विस्तार पिंपरी चिंचवड ते निगडी येथेपर्यंत केला जाणार असून या जवळपास साडेचार किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 910 कोटी रुपये आहे या मार्गावर तीन स्थानक प्रस्तावित आहेत. तसेच भक्ती शक्ती ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मोरवाडी मेट्रोस्थानकाच्या जवळ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची अडचण दूर करण्यात यावी व यासाठी पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागेचा विकास केल्या जावाअशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केल्या.

         यावेळी पिंपरी चिंचवड महानगर विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूकजल व्यवस्थापनकचरा व्यवस्थापनशिक्षणआरोग्य आणि सामाजिक सुविधा यांचा समावेश आहे याची माहिती देण्यात आली.

         यासह पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी पार्किंग झोन आणि इतर सुविधाशहराच्या विविध भागांना जोड मार्गजलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याची टाकी. घनकचरा व्यवस्थापन व मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठीअण्णासाहेब मगर स्टेडियमसंविधान भवनचे कामऔद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

          पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या कामाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा ·

 चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

·         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि.:- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामांचा आढावा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला.

            विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमारकोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीबौद्ध धर्मगुरू, बुधिष्ठ सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधीप्रदीप कांबळेशशी प्रभूतसेच सामाजिक न्याय विभागबृहन्मुंबई महानगरपालिकाएमएमआरडीए व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची भव्य वास्तू उभी राहत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने हा मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरणविषयक मान्यतातसेच हा मार्ग रुंद बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित विभागांकडून नियोजन करण्यात यावे.

         या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईलसायन-पनवेल महामार्गावरील

 ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे

वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण

 

            ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुंबईपुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईपुणे प्रवास अधिक वेगवानसुलभ आणि सुरक्षित होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेअन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळसार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरेनिरंजन डावखरेशांताराम भोईरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकरमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाडठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीची संक्षिप्त माहिती:-

ठाणे खाडीवर आधीपासून मानखुर्द-वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत. या नवीन पूलामुळे इतर दोन पुलांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुलाची निर्मिती होणेही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

00000


Featured post

Lakshvedhi