Sunday, 8 June 2025

नागपूर येथील सहकार भवन बांधणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

 नागपूर येथील सहकार भवन बांधणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. 5 : नागपूर येथे भव्य सहकार भवन उभारण्याचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सुंदर आणि प्रशस्त इमारत असेल अशा पद्धतीचा आराखडा तयार करावा, अशा सूचना सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.

मंत्रालयात नागपूर येथे सहकार भवन उभारण्याबाबत बैठक झाली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरेसहकार विभागाचे उपसचिव अंकुश शिंगाडेनागपूर विभागीय उपनिबंधक दिनेश चंदेलसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अविनाश गुव्हाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, नागपूर येथील गणेश पेठमधील भूविकास बँकेच्या जागेवर सहकार भवन उभारण्यात यावे. या इमारतीचा आराखडा तयार करताना इमारतीची देखभाल दुरुस्ती लक्षात घ्यावी. तसेच पुणेछत्रपती संभाजीनगर येथील सहकार भवनच्या आराखड्याचा अभ्यास करून सर्वंकष असा आराखडा तयार करावा. या विषयी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) चा पूर्ण वापर करावा. सध्या या ठिकाणी असलेल्या भूविकास बँकेच्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करुन घ्यावेअशा सूचनाही राज्यमंत्री भोयर यांनी दिल्या.

जागतिक पर्यावरण दिनाच्याअन्य प्रकल्पांनाही गती

 अन्य प्रकल्पांनाही गती

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेपर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईलअसे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारीकर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारीनागरिक उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

0000

कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना

 कृषीपर्यटन विकासऔद्योगिकीकरणाला चालना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसमृद्धी महामार्गामुळे वेळइंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषीपर्यटन विकासऔद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग मराठवाडापश्चिम महाराष्ट्रकोकण भागासाठी लाभदायक ठरेल,  त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या महामार्गावर वाहन चालकांनी वेग मर्यादेचे व वाहतूक निमयांचे पालन करावेअसेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

अन्य प्रकल्पांनाही गती

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण

 समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेसमृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भमराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेतआता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहेअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे

भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 

मुंबई, 8 : भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला 24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असूनत्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, "निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यासआम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत."

श्री. राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावाअशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

"निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे," असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यासलोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेलअसे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

 राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

 

मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमीधाराशिव 13.8 मिमीठाणे 7.9 मिमीरत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे 7.9, रायगड ,20.8, रत्नागिरी 6.7,  सिंधुदुर्ग 2,  पालघर 0.9, नाशिक 3.5, धुळे 1.9, नंदुरबार 0.3, जळगाव 0.9, अहिल्यानगर 5.7, पुणे 3.1, सोलापूर 3.8,  सातारा 3.5,  सांगली 2.6,  कोल्हापूर 3.1, छत्रपती संभाजीनगर 5, जालना 5.3, बीड 1.2, लातूर 4.5,  धाराशिव 13.8, नांदेड 0.7,  परभणी 2.9,  हिंगोली 0.5, बुलढाणा 0.8, वाशिम 0.2, यवतमाळ 0.3, वर्धा 0.1. अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफएसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस टँकरची मिनीबसला धडक होऊन 29 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टँकरमधून गॅस गळती थांबवण्यासाठी जेएसडब्ल्यू टीम पोहचली असून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती पाण्यात बुडून मृत झाली आहे. तर नाशिक जिल्हा वादळी पावसामुळे एक प्राणीवीज पडून दोन प्राणीधुळे व लातूर जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी दोन प्राणी आणि जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक प्राणी मृत झालेले आहे.  तसेच वादळी पावसामुळे जालना जिल्ह्यात दोनजळगाव जिल्ह्यात वीज पडून एक आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता अपघात मध्ये 29 व्यक्ती आणि 2 प्राणी जखमी झाली असल्याची माहिती

अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे –

 अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे

आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावेअसे संचालक ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले.  श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिकराज्य  व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात.

या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेवून ती समाजमाध्यमेवृत्तपत्रेदूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी.

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणेआणि आवश्यक सूचना पोहचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी  प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावाज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावीआपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावीविशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले.

यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळेमुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या.

Featured post

Lakshvedhi