Sunday, 8 June 2025

उद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी

 उद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी

-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

 

           पुणेदि. 6 : समाजाच्या विकासासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिलेल्या सर्व उद्योग व भागिदारांचे मनापासून कौतुक असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांनी मिळालेल्या नफ्यातून काही हिस्सा समाज कार्यासाठी खर्च करण्याची भावनासामाजिक बांधिलकी ठेवून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावीअशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे आयोजित चॅम्पियन ऑफ चेंज - सीएसआर अॅवार्ड या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदीजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडूउपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात उपस्थित होते.

चॅम्पियन ऑफ चेंज - सीएसआर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व उद्योगांचे अभिनंदन करुन उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणालेविविध उद्योगांनी सामाजिक कार्यात दिलेले योगदान कौतुकास्पद असून पुढील काळात सुद्धा ते सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजचा दिवस हा अनेक अर्थाने महत्वाचा असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा श्रीशिवराज्याभिषेक दिन आज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळामध्ये दाखविलेले धैर्यशौर्य आणि त्याग आणि पराक्रमाला आपण सर्वजण वंदन करतो त्यांच्या कार्य आणि विचारस्मृतींना अभिवादन करतो. राज्यातदेशात जातीय सलोखा राहीला पाहिजे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने आदराची भावना ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शाहू महाराजजोतिबा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनेच राज्य शासन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असते असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने विविध सीएसआर क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी मंच उभा केला गेला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा परिषदेचा पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या उपक्रमात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे काम होणार आहे. 

शाळा परिवर्तन म्हणजे समाज परिवर्तनपुणे मॉडेल स्कुल या उपक्रमांतर्गत डिजीटल शाळा ही संकल्पना जिल्हा परिषद राबविणार असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणसर्व सुविधाप्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात विविध उद्योगांनी पुढाकार घेतल्यामुळे हे शक्य होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी सीएसआर भागीदार महत्वाची भूमिका बजावू शकतात हे या माध्यमातून दिसून येते असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमातून चांगले काम केलेल्या उद्योगभागीदारांना सीएसआर पारितोषिक वितरणसीएसआर प्रकल्पांचा गौरव ही बाब निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पुणे जिल्हा परिषदेने उभारलेल्या सीएसआर पायाभूत रचना इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय आहे. पुणे जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता विकास व आरोग्य सेवा बळकटीकरण व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हाती घेतलेल्या या पथदर्शी प्रकल्पाला सीएसआरच्या माध्यमातून साथ देऊन पुणे जिल्हा देशात अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमात सुरुवातीला ग्रामीण भागातील समग्र शिक्षण सीएसआरद्वारे भविष्यासाठी सक्षम गावांची घडणग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सीएसआरची भूमिका या प्रमुख विषयांवर विचारमंथन झाले.

कार्यक्रमात शिक्षण व खेळ प्रोत्साहनआरोग्य व स्वच्छतापर्यावरण संवर्धनउत्पन्न निर्मिती व कौशल्य विकाससमाज सक्षमीकरण या पाच विभागांमध्ये विविध सोळा उद्योगांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

प्रास्ताविकात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारीउद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी आभार व्यक्त केले.

नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू pl share राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन; बांधकाम व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन;

बांधकाम व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

पुणेदि. 6: राज्य शासनामार्फत नवीन गृहनिर्माण धोरण करण्यात येत असून त्यात विकसकांनी सूचना दिल्यास त्यांचा अंतर्भाव करण्यात येईलअसे प्रतीपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नवीन गृहनिर्माण धोरणानुसार येत्या पाच वर्षात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे. यामध्ये तसेच प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे’ या योजनेतही बांधकाम व्यवसायिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी केले.

क्रेडाई पुणे मेट्रोच्या 2025-27 च्या नवनिर्वाचित समितीचा पदस्थापना समारंभ आणि सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर रामप्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदीपिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंहपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त दीपक सिंगलाजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटनेराज्य शासनाच्या नगररचना आणि मूल्यांकन विभागाच्या संचालक डॉ. प्रतिभा भदाने,क्रेडाई पुणे मेट्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष जैनमाजी अध्यक्ष रणजीत नाईकनवरेक्रेडाईचे माजी अध्यक्ष सतीश मगरललीत जैन आदी उपस्थित होते.

गेल्या अडीच तीन वर्षात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गमुंबई किनारी मार्गमुंबई व पुण्यातील मेट्रो प्रकल्पमुंबईती मेट्रोचे कारशेडअटल सेतू आदी अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम शासनाने केलेअसे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेशासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके समान वेगाने धावतात तेव्हा राज्याचा आणि शहराचा विकास होत असतो. अधिकाऱ्यांकडे दूरदृष्टी असली पाहिजे तसेच ते वास्तववादी आणि सकारात्मक असले पाहिजेत. शहराच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणल्या पाहिजेत. त्यादृष्टीने पुणे शहर व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम चांगली आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

क्रेडाईची पुण्यातून सुरूवात झाली आणि महाराष्ट्रातून देशात पोहोचलीया शब्दात क्रेडाईचा गौरव करून या संस्थेने कोविड काळात समाजाला मोठी मदत केली. जेव्हा समाजाला गरज असतेराज्यात आपत्ती येतेसंकटे येतात तेव्हा क्रेडाईने सढळ हाताने मदत केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असताना त्यातही मदत करावी.

संपर्क नियंत्रण जाळ्याची निर्मिती

समृद्धी महामार्ग हा राज्यातील अमूलाग्र बदल घडविणारा प्रकल्प ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचे प्रवासाचा वेळ 18 तासांवरून 8 तासांवर आला आहे. आता राज्य शासन संपर्क नियंत्रण जाळे (ॲक्सेस कंट्रोल ग्रीड) तयार करत असून त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही भागातून इतर कुठल्याही भागात 8 तासात पोहोचता येईल. रस्ते हे विकासासाठी खूप महत्त्वाचे आहेत. रस्त्यांवर शहरांची ओळख असते. रस्तेसुविधा चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेतअसेही ते म्हणाले.

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या पुलाची ड्रोनद्वारे पाहणी

 महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या पुलाची ड्रोनद्वारे पाहणी

नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पूल महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाची गंगा पोहोचवणेहा शासनाचा दृढ निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ड्रोनच्या मदतीने त्यांनी या पुलाची पाहणी केली.

राज्यमार्ग 380 वरील 100 मीटर रुंद कोरमा नाल्यावर सध्या 120 मीटर लांबीचा पूल उभारण्यात येत असूनयामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांतील थेट दळणवळण शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी 10 कोटी 70 लाख रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त असूनहा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक विभागाला दिले. या पुलाच्या निर्माणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावांनाही सुकर दळणवळणाची सुविधा प्राप्त होणार असूनप्रशासनाच्या सेवा व विकास कार्यक्रम प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होईलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

००००


नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे; गडचिरोली जिल्हा औद्योगिक केंद्र बनेल !

 नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारेगडचिरोली जिल्हा औद्योगिक केंद्र बनेल !

तेलंगणा सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संवाद साधलाते म्हणाले कीगडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे.

शासन आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असूनशासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांमध्ये शासनाबाबतचा विश्वास वाढला आहे. हीच खरी लोकाभिमुख विकास प्रक्रिया आहे. कवंडेनेलगुंडा आणि पेनगुंडा या ठिकाणी नुकतीच धरती आबा’ अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण 533 लाभार्थ्यांना विविध योजनांचे 987 लाभ वितरित करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारतप्रधानमंत्री आवास योजनाअन्न सुरक्षा योजनापीएम किसान सन्मान निधी‘मनरेगा’ जॉब कार्डस्क्रिनिंग व अ‍ॅनिमिया तपासणीआधार अद्ययावत करणेजात प्रमाणपत्र आदी योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. महसूलआरोग्यकृषीसामाजिक न्यायपंचायत राजमहिला व बालकल्याणवन विभागपोलिस आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते

विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर

 विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा

 

गडचिरोलीदि. ६ : माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमावर ठेवून त्या पद्धतीने गडचिरोलीत विकासकामे करावी, असे आवाहन मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत केले.

बैठकीस सहपालकमंत्री तथा वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालअपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरअतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरेसीसीएफ जितेंद्र रामगावकरखासदार नामदेव किरसानआमदार धर्मरावबाबा आत्रामआमदार डॉ. मिलिंद नरोटेआमदार रामदास मसराम तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष द्यावे. विशेषतः मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दक्षतेने लक्ष देण्याचे निर्देश दिले.

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये पुरेसे अन्नधान्यऔषधांचा साठा आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी करावयाच्या कायमस्वरूपी उपयोजनाअंतर्गत  मंजूर पाच टप्प्यांपैकी किमान दोन टप्पे यंदा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावाअसे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वनक्षेत्रातील रस्त्यांच्या बांधकामांबाबत वनविभागसार्वजनिक बांधकाम विभागराष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित इतर विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. टायगर कॉरिडॉर व्यतिरिक्त इतर मार्गांवर निर्बंध असू नये. वनविभागाने काम करताना लोकाभिमुखता ठेवावीवन अधिकाऱ्यांकडून गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाहीमनमानी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत.

वडसा ते गडचिरोली रेल्वे भूसंपादनाचा आढावा घेताना या कामात दिरंगाई होत असल्याचे सांगून ही भूसंपादन प्रक्रिया कालमर्यादेत निश्चित करून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

जिल्ह्याच्या एकूण प्रगती करिता ज्या काही तरतुदी करणे आवश्यक आहे व प्रस्तावित करण्यात आले आहेत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेनया संदर्भात सहपालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

गडचिरोलीचे विषय थेट माझ्यापर्यंत आले पाहिजे यासाठी मी जाणीवपूर्वक येथील पालकमंत्री पद घेतले आहे. लोकप्रतिनिधी व इतरांनी मांडलेल्या सर्व विषयाची नोंद मी घेतली आहे व त्यानुसार जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेण्यात  येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

याप्रसंगी श्रीक्षेत्र मार्कंडा या धार्मिक पर्यटनावरील माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन झाले. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध उद्योगउद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.

बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केलेतर आभार अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मानले.


कामाची विश्वासार्हता व गतीमानता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक

 कामाची विश्वासार्हता व गतीमानता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक

-राज्यमंत्री योगेश कदम

     राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले कीअन्न व औषध  प्रशासन विभागाने आपली कार्यपद्धती अधिक पारदर्शक, प्रभावी आणि विश्वासार्ह करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे.अन्न व औषध विभागामार्फत जे इन्स्पेक्शन करणार आहोत, त्याचे संकलन आणि विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने व्हायला हवे. त्यामुळे कार्यपद्धती जलद, अचूक आणि डेटा आधारित होईल,” असे मंत्री श्री. कदम यांनी सांगितले. अन्न संरक्षण अधिकारी प्रमाणेच  ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी  भरती लवकरच करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

         या कार्यक्रमात Food Safety: Science in Action या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तसेच यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व संस्थांचा सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमात अन्न व्यवसायिक प्रतिनिधी  डॉ. प्रबोध हळदेबीजे मेडीकल कॉलेजचे विभागप्रमुख तथा आहारतज्ज्ञ जगन्नाथ दिक्षीत,प्रख्यात पाककृती तज्ज्ञ विष्णु मनोहर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अन्न व्यावसायिकांना, अन्न अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मंत्री श्री. झिरवाळ व राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले

                                              

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान"

 प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान"

या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

         मुंबई,दि.७ :  प्रत्येक व्यक्तीला निरोगी  आयुष्य जगण्यासाठी चांगल्या आहाराची आवश्यकता असते.सुरक्षित अन्न व औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान" या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज आहे.विभागात  १९४ अन्न सुरक्षा अधिका-यांची पदभरती झाल्याने या विभागातील  कामकाज अधिक गतीने होईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

         'जागतिक अन्न सुरक्षा दिन- २०२५' या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार कालिदास कोळंबकर, सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, आहारतज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित,पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर उपस्थित होते.

          मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,जागतिक आरोग्य संघटनेने "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान" या संकल्पनेवर आधारित जागतिक अन्न सुरक्षा दिन - २०२५ ची संकल्पना घेतली आहे.या संकल्पनेचे महत्व असे आहे की शेतापासून ते थेट आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत अन्न सुरक्षित ठेवण्यामध्ये विज्ञानाचा आधार घेवून हे काम अधिक गतीमान करता येईल.एखादी व्यक्ती आजारी पडली की औषध वेळेवर खाते मात्र आजारीच पडू नये म्हणून योग्य आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. योग्य अन्न खाणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे अन्न सुरक्षितता जनजागृती खूप महत्वाची आहे. आपण खाल्लेल्या अन्नाबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

        मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,ज्या अधिका-यांचा उत्कृष्ठ कामासाठी सत्कार करण्यात आला त्यांनी देखील आपल्या सहका-यांना मार्गदर्शन करावे.तसेच विभागाचे धोरण ठरविण्यासाठी सर्वांनी आपली मते विभागाला कळवावीत.अन्न व औषध प्रशासन विभागाने निकृष्ट दर्जाच्या,बनावट,भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थ आणि औषध उत्पादनांची विक्री रोखण्याचे काम करावे असेही ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi