Saturday, 7 June 2025

मुंबई उपनगर,,-झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन,आपत्कालीन व महसूल यंत्रणा,सौरऊर्जा उपक्रम,महिला व बाल विकास :yojna,,,

 मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत

 ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा

 

मुंबईदि. ३० : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहितीतंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणीखर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता.

यावेळी २०२५-२६ साठी एकूण ₹११४४.०२ कोटींच्या प्रस्तावित योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना ₹१०६६ कोटीअनुसूचित जाती उपयोजना ₹७१ कोटीतर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना ₹७.०२ कोटींचा समावेश आहे.

नवीन प्रस्तावांमध्ये विशेषतः झोपडपट्टी सुधारणापोलीस यंत्रणा बळकटीकरणमहिला व बालकल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा उपक्रमांचा समावेश आहे.

प्रमुख कामे खालीलप्रमाणे 

झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन : ₹५९७.४२ कोटींची नागरी दलितेतर वस्ती सुधारणा, ₹१२५ कोटींच्या संरक्षक भिंती, ₹६४.७४ कोटी दलितवस्ती योजनातसेच ₹४.५ कोटींचे कौशल्य विकास कार्यक्रम.

पोलीस व तुरुंग विभाग : पायाभूत सुविधांसाठीवाहने व संगणकीय साधने पुरवण्यासाठी ₹१४.०६ कोटींचा निधी

आपत्कालीन व महसूल यंत्रणा : गतीशील प्रशासनासाठी ₹४.५ कोटींचा निधी.

महिला व बाल विकास : बालगृहांसाठी सी.सी.टी.व्ही. आणि संस्थांचे बळकटीकरणासाठी ₹१४.०६ कोटी निधी.

सौरऊर्जा उपक्रम : ₹२ कोटींच्या सौर संचांची उभारणी.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या असूनत्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावीअसे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

बैठकीस खासदारआमदारबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपोलीस आयुक्तविविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी

 नवीन महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी

महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले असून तिथे सुरू असलेल्या कामांचा आज आढावा घेतला. यात आधी २३५ तर आता २९४ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याठिकाणी तापोळा येथील उत्तेश्वराच्या मंदिराचे कामउत्तेश्वर रोप वेचे काम याचीही प्रगती जाणून घेतली. तसेच या कामांची गती वाढवण्यास त्यांनी सांगितले.

एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प शासनाने दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावेतसेच सिडकोएमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बेरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

-----


कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा

 कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा


कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय व्हावी. यासाठी एमएसआरडीसीच्या वतीने ८६ निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. यातील ३७ निवारा केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामांना वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच शक्यतो शाळांच्या जवळ ही निवारा केंद्र उभारावीत जेणेकरून पावसाळ्यानंतर शाळांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठीही निवारा केंद्रे वापरता येतील असे त्यांनी सांगितले.

कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या कामाला गती

 नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट

कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजारेवदंडाआगरदांडाकेळशीकाळबादेवीदाभोळजयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल.


पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार झाडांचे पुनर्रोपण करणार

 पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार  झाडांचे पुनर्रोपण करणार

पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असूनयात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील  नऊ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी

 वृत्त क्र. 2284

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी

कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवातसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते.

मुंबई - नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावाया मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहेतसेच पिंपळास चारोटीरेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावीकंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कामाची विश्वासार्हता व गतीमानता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक

 कामाची विश्वासार्हता व गतीमानता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक

-राज्यमंत्री योगेश कदम

     राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले कीअन्न व औषध  प्रशासन विभागाने आपली कार्यपद्धती अधिक पारदर्शक, प्रभावी आणि विश्वासार्ह करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे.अन्न व औषध विभागामार्फत जे इन्स्पेक्शन करणार आहोत, त्याचे संकलन आणि विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने व्हायला हवे. त्यामुळे कार्यपद्धती जलद, अचूक आणि डेटा आधारित होईल,” असे मंत्री श्री. कदम यांनी सांगितले. अन्न संरक्षण अधिकारी प्रमाणेच  ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी  भरती लवकरच करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

         या कार्यक्रमात Food Safety: Science in Action या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तसेच यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व संस्थांचा सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमात अन्न व्यवसायिक प्रतिनिधी  डॉ. प्रबोध हळदेबीजे मेडीकल कॉलेजचे विभागप्रमुख तथा आहारतज्ज्ञ जगन्नाथ दिक्षीत,प्रख्यात पाककृती तज्ज्ञ विष्णु मनोहर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अन्न व्यावसायिकांना, अन्न अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मंत्री श्री. झिरवाळ व राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले

                           

Featured post

Lakshvedhi