Saturday, 7 June 2025

पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार

 पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार


- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई


मुंबई दि. २८ :- पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


या संदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन संचालक श्री. पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील अधिकारी- कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी आणि कोयनानगर येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसाठी वाहने घेण्यात यावीत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


तत्पूर्वी मंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोयनानगर नेहरू गार्डन, स्काय वॉक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी विहित निकषानुसार तयार करून पाठवावेत आशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून

 पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील

स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून

681 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

 

मुंबईदि. 28 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने संबंधितांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे हा शासन निर्णय निश्चित वेळेत जारी होऊ शकलात्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळेतीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत तयार करण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास आणि त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून  6 मे 2025 रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय आज जारी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्त्ववास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्तीसंस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीतअसे निर्देश देण्यात आले आहेत. जी कामे केंद्र शासनाच्या PRASAD योजनास्वदेश दर्शन योजना किंवा अन्य  योजनांमधून शक्य आहेत. ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिले आहेत

मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा

 मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे

बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 28 : रायगडमौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम उत्तम दर्जाचे आणि कालबद्ध पद्धतीत पूर्ण करावे. मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील मच्छिमार जेट्टीच्या बांधकाम कामाच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह मौजे दिघी कोळीवाडामुळगावभरडकोलजीवनेश्वर येथील कोळीबांधव  उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीया बांधकामामध्ये त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आले असूनत्यावर तत्काळ कार्यवाही करावी. नव्याने बांधकाम करावे अथवा डागडुजी करावी. उर्वरित काम चांगल्या गुणवत्तेचे कालबद्ध पद्धतीने पुर्ण करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित डिझेल परतावा लवकरात लवकर मिळावा अशा सुचना दिल्या. तसेचजेट्टीअंतर्गत आईस फॅक्ट्रीकोल्ड स्टोरेजपंपटाकीउर्वरित जागेचा योग्य वापर करण्याची तरतुदीसह मच्छीमारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

०००

इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक

 इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. २८ : इजिप्त सोबत महाराष्ट्राचे अनेक दशकांपासूनचे सौहार्दाचे संबंध असून महाराष्ट्र हे संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेमहाराष्ट्र हे भारताचे शक्ती केंद्र असून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याअनुषंगाने येथे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. इजिप्तमधील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्यास त्यांचे येथे स्वागत होईल. राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची पर्यटन स्थळे असून पर्यटक सुरक्षित पर्यटनाला अधिक महत्त्व देत असल्याने महाराष्ट्राला अधिक पसंती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी इजिप्तविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केले. इजिप्त आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या आणि व्यापाराच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी इजिप्तचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ राज्यात येऊ इच्छित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

भाषिणी उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज

 भाषिणी उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज

-         सचिव किरण कुलकर्णी

 

मुंबईदि. 28 :- भाषिणी उपयोजक (भाषिणी अ‍ॅप्लिकेशन) अधिकाधिक प्रगतसक्षम आणि उपयोगी व्हावे यासाठी भाषिक डेटाचा व्यापक स्तरावर संकलन करणे अत्यावश्यक आहे. या डाटा संकलनासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठी भाषा विभाग आणि केंद्र सरकारच्या भाषिणी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात भाषिणी’ उपयोजकांच्या वापराच्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह सचिव डॉ. नामदेव भोसलेडिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नागप्रा. मितेश खापरा,  मराठी भाषा विभागातील तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सचिव श्री. कुलकर्णी म्हणालेमराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि मराठी भाषेचे व्यापक स्तरावर सुलभीकरण करणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाषिणी उपयोजकासाठी आवश्यक असलेला डाटा संकलित करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या कामकाजामध्ये वापरले जाणारे शब्द व संज्ञा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक व्यापक मोहिम राबविणे आवश्यक असूनराज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये नियुक्त केलेल्या मराठी भाषा अधिकाऱ्यांचे देखील या कामासाठी सहकार्य घेता येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत सरकारने भाषिणी उपयोजक (भाषिणी अॅप्लीकेशन) हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. भाषिणी अॅप्लीकेशन हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयआणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेवर (एनएलपीआधारित प्लॅटफॉर्म आहेजे ए.आय. आणि एन.एल. पी. चा वापर करून भारतीय भाषा डिजिटल आणि तांत्रिक सेवांमध्ये अधिक प्रवेशयोग्य बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच भारतीय अधिकृत भाषांमध्ये सेवा देते. डिजिटल सेवा भारतीय भाषांमध्ये सहज उपलब्ध करून देणे. भारतातील विविध भाषांमध्ये भाषांतर आणि संवाद साधने सुलभ करणे हा यामागचा हेतू आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून असलेले श्री. नाग आणि श्री. खापरा यांचे भाषिणी उत्पादने आणि त्यांचा वापर व डेटासेटची भूमिका आणि अधिक सुधारित भाषिक एआय मॉडेल विकसित करण्यासाठी प्रादेशिक योगदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी श्री. नाग यांनी मराठी भाषा विभागामार्फत हॅकॅथॉन स्पर्धा राबविण्यात येईल असे सांगितले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) या संस्थेकडून करण्यात आलेल्या कामाची दृकश्राव्य चित्रफीत दाखवण्यात आली.

०००

श्रीलंका सोबत द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर सौहार्द वृद्धींगत करण्यावर भर

 श्रीलंका सोबत द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर सौहार्द वृद्धींगत करण्यावर भर

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 28 : भारत आणि श्रीलंका दरम्यान असलेले परस्पर सौहार्द आणि व्यापारविषयक संबंध वृद्धींगत करण्यावर महाराष्ट्राचा भर असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि श्रीलंका दरम्यान द्विपक्षीय व्यापारातील अधिक संधी आणि शक्यता पडताळण्यासंदर्भात सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी श्रीलंकाच्या महावाणिज्यदूत शिरानी अरियारत्ने आणि शिष्टमंडळाचे स्वागत केले. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेभारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या प्रगतीत महाराष्ट्राचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. निर्यातीमध्ये देखील राज्य आघाडीवर असून श्रीलंका आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र आणि श्रीलंकामधील व्यापाराच्या संधींच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र आणि श्रीलंकाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. श्री. रावल यांनी महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून विविध फळांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. व्यापार वृद्धीच्या संधींसाठी श्रीलंकाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात भेट देण्याचे निमंत्रण देऊन या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेलअसा विश्वास श्री.रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

०००००

माजी सैनिकांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अमूल्य मार्गदर्शन

 माजी सैनिकांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अमूल्य मार्गदर्शन

- माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई

            सेवानिवृत्त सैनिकांकडे केवळ युद्धकलेचेच नाहीतर कठोर प्रशिक्षणकठीण परिस्थितीशी लढण्याची मानसिकताआणि सहकार्य यांसारख्या अनमोल कौशल्यांचा ठेवा असतो. हे सर्व गुण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा उपक्रम केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हेतर राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शिस्तस्वाभिमानआणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यामुळे निर्माण होईलअसा विश्वास माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

            या संपूर्ण उपक्रमाचे नियोजनमाजी सैनिकांची निवडप्रशिक्षण आणि देखरेख यासाठी महाराष्ट्र राज्य सैनिक महामंडळ (MESCO) प्रभावी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे होण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने काम करण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi