Saturday, 7 June 2025

महिला सशक्तिकरण में शिक्षा की भूमिका महत्वपूर्ण"आरबीएल द्वारा छात्राओं को साइकिल और शैक्षणिक सामग्री का वितरण

 महिला सशक्तिकरण में शिक्षा की भूमिका महत्वपूर्ण"

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

आरबीएल द्वारा छात्राओं को साइकिल और शैक्षणिक सामग्री का वितरण

 

नागपुर7 जून: महिला सशक्तिकरण में शिक्षा एक अत्यंत महत्वपूर्ण घटक है और इसी को ध्यान में रखते हुए राज्य सरकार द्वारा बालिकाओं को प्रोत्साहित करने के लिए कई योजनाएं चलाई जा रही हैं। इसी संदर्भ में आरबीएल के "उम्मीद" सीएसआर उपक्रम के तहत जरूरतमंद छात्राओं को साइकिल और शैक्षणिक सामग्री का वितरण एक सराहनीय पहल हैऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां कहा।

आरबीएल बैंक की "उम्मीद" सामाजिक (CSR) पहल के अंतर्गत आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री के हाथों छात्राओं को साइकिल और शैक्षणिक किट वितरित की गईं। साथ ही धन्वंतरि आरोग्य शिविर का उद्घाटन भी इस अवसर पर किया गया। इस अवसर पर विधायक संदीप जोशीप्रवीण डटकेआरबीएल के कोषाध्यक्ष अशोक चांडक और बोर्ड के अन्य पदाधिकारी उपस्थित थे। मनीष नगर क्षेत्र में आयोजित इस कार्यक्रम में आज 100 साइकिलों का वितरण किया गया।

मुख्यमंत्री ने कहा कि लड़कियों की शिक्षा में एक बड़ा अवरोध स्कूल तक की लंबी दूरी तय करना होता है। आरबीएल द्वारा वितरित की जा रही साइकिलों से छात्राओं के लिए स्कूल जाना आसान होगा और उनकी उपस्थिति भी नियमित रहेगी। विशेष रूप से ग्रामीण क्षेत्रों की छात्राओं की शैक्षणिक गुणवत्ता में सुधार के लिए यह पहल बहुत सहायक सिद्ध हो रही है। मुख्यमंत्री ने कहा कि समाज के जरूरतमंद और वंचित वर्ग की छात्राओं की शैक्षणिक समस्याओं को ध्यान में रखते हुए आरबीएल अपनी सामाजिक जिम्मेदारी निभा रहा हैजो कि अत्यंत सराहनीय है। उन्होंने बताया कि आरबीएल हर वर्ष विभिन्न सामाजिक उपक्रम संचालित करता है। धन्वंतरि स्वास्थ्य शिविर के माध्यम से आंखों की जांचचश्मों का वितरण और अन्य स्वास्थ्य जांच नि:शुल्क की जा रही है। इससे छात्राओं के अच्छे स्वास्थ्य को बनाए रखने में मदद मिलेगी।

मुख्यमंत्री ने बताया कि हाल ही में गढ़चिरोली जिले के अतिदुर्गम क्षेत्र के कवंडे गांव में भी छात्राओं को साइकिल वितरित की गई थीं। उस समय छात्राओं के चेहरों पर जो खुशी दिखाई दीउससे उन्हें बहुत संतोष मिला। उन्होंने कहा कि इस प्रकार की सामाजिक पहलों से आधुनिक सुविधाओं और साधनों से वंचित छात्राओं को उच्च शिक्षा प्राप्त करने का सपना साकार करने में मदद मिलेगी। उन्होंने आरबीएल से भविष्य में भी ऐसे उपक्रम आयोजित करने की अपेक्षा जताई।

आरबीएल के कोषाध्यक्ष अंशुल चांडक ने स्वागत भाषण में बताया कि इस वर्ष 1800 साइकिलों का वितरण किया जाएगा और पिछले वर्ष 4800 साइकिलें छात्राओं को दी गई थीं। उन्होंने CSR के अंतर्गत चल रहे अन्य उपक्रमों की जानकारी भी दी। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे।

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

  

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय  साहित्याचे वितरण

 

नागपूर दि. 7 :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आरबीएल बँकेतर्फे उम्मीद या समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.  तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.

आमदार संदीप जोशीप्रवीण दटकेआरबीएलचे कोषाध्यक्ष अशोक चांडक व संचालक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनीष नगर परिसरात आयोजित कार्यक्रमात आज उपस्थितांच्या हस्ते 100 सायकलींचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणालेमुलींच्या शिक्षणातीतील एक मोठा अडथळा म्हणजे त्यासाठी करावा लागणारा लांब पल्ल्याचा प्रवास हा आहे. आरबीएलतर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या सायकलींमुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सुलभ होण्यासह उपस्थितीत सातत्य राखण्यासाठी मदत होत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी याची अधिक मदत होत आहे.

समाजातील गरजू व वंचित विद्यार्थिनींच्या शैक्षणिक समस्यांची जाणीव ठेवून आरबीएल आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. हे अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणालेआरबीएलतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. धन्वंतरी आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून डोळे तपासणीचष्मे वाटप तसेच इतर तपासण्या नि:शुल्क करण्यात येत आहेत. मुलींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.

नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कवंडे या गावी विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अत्याधुनिक सुविधा व साधनांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण  होण्यास मदत होईल. आरबीएलने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. आरबीएलचे कोषाध्यक्ष अंशुल चांडक यांनी प्रास्ताविक करतानायावर्षी 1800 सायकलींचे वितरण करण्यात येणार असून मागील वर्षी 4800 सायकली विद्यार्थिनींना देण्यात आल्याचे सांगितले. समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी

 जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. २८ : जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईलअशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील आमदारलोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळांनी उद्योगमंत्री श्री.सामंत यांची भेट घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत होणार असल्याची तत्वतः मान्यता उद्योगमंत्री यांनी दिली. बैठकीस एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूविकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाहसहसचिव श्रीकांत पुलकुंडवार तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले कीजळगाव जिल्ह्यात उद्योग आले पाहिजेतयासाठी उद्योजकांशी बोलून त्यांना जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याबाबत विनंती करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यात मेगा प्रकल्प किंवा अल्ट्रा मेगा प्रकल्प आल्यास प्रस्तावित औद्योगिक धोरणानुसार सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे ५०० कोटी पेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सुद्धा एमएसएमई अंतर्गत लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले कीडिफेन्स उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची गरज लागते. डिफेन्स उद्योगास जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठा फायदा जळगाव जिल्ह्यास होऊ शकतोअसेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

000

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी

 ‘अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 28 : कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतरज्या कुटुंबांनी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतोत्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत प्रज्वलित झाली असूननव्याने जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबईतील सायन रुग्णालयातील झेड.टी.सी.सी. (ZTCC) या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात अवयवदान केलेल्या कुटुंबातील सदस्यांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  श्री. आबिटकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला झेड.टी.सी.सी.चे अध्यक्ष डॉ.एस.के.माथूरन्यायमूर्ती संदीप शिंदे, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, मुंबईतील खासगी व शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीसमाजात अवयवदानाबद्दल असलेले गैरसमजअकारण भीतीसामाजिक रूढीचालीरिती या बाजूला ठेवून वेळ प्रसंगी सामाजिक विरोध पत्करून आपण विज्ञानवादाकडे जाणारा अवयवदानाचा विवेकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण समाजाचे आयडॉल बनला आहात. अलीकडच्या काळात अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हजारो रुग्ण किडनीलिव्हरहृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असतात. पण प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण अल्प आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणेही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात कोल्हापूरसोलापूरअमरावती आणि नाशिक येथे नव्या झेड.टी.सी.सी. केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. झेडसीसीची टीमसंलग्न रुग्णालयेआरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे काम एक मिशन म्हणून हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयाने केवळ सहभाग नव्हेतर पुढाकार घ्यावायोग्य समुपदेशनाद्वारे कुटुंबीयांमधील भीतीअंधश्रद्धा दूर करावीग्रामीण भागात जागरूकतेसाठी विशेष मोहिमा राबवाव्यात. हे संपूर्ण कार्य ही केवळ वैद्यकीय बाब नाहीतर ही मानवतेचीआणि सामाजिक बदलाची चळवळ आहे, असेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.  महाराष्ट्र राज्य अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श ठरेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

झेड.टी.सी.सी. चे सेक्रेटरी भरत शहा यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांचे स्वागत केले व अवयव दान कार्ड काढण्याचे आवाहन केले. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या अपोलोब्रिच कँडीक्रिटीकेअर एशियाहिरानंदानीफोर्टीसएशियन रिलायंसग्लोबलजसलोकज्यूपिटरलिलावतीके.ई.एम. अंबानीजी.एस.सीकोकिलाबेन इत्यादी रुग्णालयातील प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपूर्वी उचलण्याचे आवाहन

 ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपूर्वी उचलण्याचे आवाहन

मुंबईदि. २८ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामाना परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात.  या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार  सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे.

 सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य  ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावेअसे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने  प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार

 पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार


- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई


मुंबई दि. २८ :- पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


या संदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन संचालक श्री. पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील अधिकारी- कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी आणि कोयनानगर येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसाठी वाहने घेण्यात यावीत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


तत्पूर्वी मंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोयनानगर नेहरू गार्डन, स्काय वॉक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी विहित निकषानुसार तयार करून पाठवावेत आशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून

 पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील

स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून

681 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

 

मुंबईदि. 28 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने संबंधितांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे हा शासन निर्णय निश्चित वेळेत जारी होऊ शकलात्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळेतीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत तयार करण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास आणि त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून  6 मे 2025 रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय आज जारी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्त्ववास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्तीसंस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीतअसे निर्देश देण्यात आले आहेत. जी कामे केंद्र शासनाच्या PRASAD योजनास्वदेश दर्शन योजना किंवा अन्य  योजनांमधून शक्य आहेत. ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिले आहेत

Featured post

Lakshvedhi