सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 6 June 2025
दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत कृषी
'दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत
मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'खरीप हंगामात पेरणीची तयारी व पीकांचे नियोजन' या विषयावर परभणी जिल्ह्यातील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसेच जमिनीचे आरोग्य आणि पिकांचे पोषण तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ६, शनिवार दि. ७, सोमवार दि. ९ आणि मंगळवार दि. १०, जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याअनुषंगाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणीची तयारी व पिकांचे नियोजन करतांना अनुकूल हवामान आणि पावसाचा अंदाज घेवून तयारी करणे आवश्यक असणार आहे. पिकांच्या संतुलित पोषणासाठी जमिनीचे आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. ही बाब विचारात घेवून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि किटकनाशके वेळेवर व योग्य प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन केले आहे. त्याअनुषगांने खरीप हंगामाची तयारी करतांना शेतकऱ्यांनी आपल्या पीकाचे नियोजन, उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर, पेरणीपूर्वी माती परिक्षण कसे करावे, या विषयावर 'दिलखुलास' कार्यक्रमातून संशोधन उपसंचालक डॉ. कौसडीकर यांनी माहिती दिली आहे.
०००
जिगाव प्रकल्प : पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या
जिगाव प्रकल्प : पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. ५ : सिंचन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांप्रती शासन संवेदनशील आहे. पुनर्वसित गावठाणमध्ये आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिगाव सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावठाणांमध्ये तातडीने आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.
खडकपूर्णा व जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात मंत्री श्री. जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. या बैठकीस आमदार मनोज कायंदे यांच्यासह पुनर्वसन व जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्त नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यास शासन कटिबद्ध आहे. या सुविधा देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. या प्रकल्पातील २२६ भूधारकांना १० कोटी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित भूधारकांना तातडीने सानुग्रह अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री श्री. जाधव पाटील यांनी दिल्या.
पुनर्वसित गावांमध्ये समाजमंदिर, ग्रामपंचायत, सभागृह, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणसह अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण अशा आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्वसन, जलसंपदा, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभाग या विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. याबाबत सुविधांनुसार आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. जावध पाटील यांनी दिल्या.
जिगाव सिंचन प्रकल्प शेतीच्या सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे या भागातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्राधान्य द्यावे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील खडकपूर्ण प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावात देण्यात आलेल्या नागरी सुविधांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी. या नागरी सुविधांची पाहणी करून सुविधांच्या दुरुस्तीबाबतचा गावनिहाय व कामनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी दिले.
पुनर्वसित नागरिकांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य
पुनर्वसित नागरिकांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. ५ : गोसेखुर्द हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्यास राज्य शासनाने, सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे, उपजिल्हाधिकारी लीना फलके तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पामुळे एकूण १०४ गावे बाधित झाली असून, त्यापैकी ३४ गावे पूर्णतः व ७० गावे अंशतः बाधित आहेत. यापूर्वी पूर्णतः बाधित गावांतील वाढीव कुटुंबांना २.९० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे.
सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांमध्ये देण्यात येत असलेल्या १८ नागरी सुविधा त्या त्या गावांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. ही कामे अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. नागरी सुविधा कामाचा प्रस्ताव तयार करून त्यास गोदावरी विकास महामंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात यावा. जलसंपदा विभागानेही पूर नियंत्रण रेषा संबंधित कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी दिल्या.
झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक
झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक
- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण
नवी दिल्ली, दि. 5 : झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नसून ते, आईच्या ममतेने प्रतीक असल्याची भावना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला उपस्थित होत्या.
वृक्षारोपणानंतर केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहकार मंत्रालयाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत मंत्रालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाप्रती आपली कटिबद्धता दर्शवली. आज लावलेले हे झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नाही, तर ते आईच्या ममतेचे प्रेरित आहे, जिने जीवन दिले, सांभाळले आणि प्रगतीची प्रेरणा दिली. प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टीने प्रेरित हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर आईबद्दलच्या श्रद्धेला निसर्गाशी जोडते.
याच अभियानांतर्गत खासदार रवींद्र वायकर यांनीही महाराष्ट्र सदनात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे पी गंगवार, किरण चौधरी, प्रियंका नागे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये
पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये
- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. 5 : कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी - नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री डॉ. योगेश कदम यांनी दिल्या.
कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती बाबत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पाणंद रस्त्याप्रमाणे साकव निर्मिती व दुरुस्तीसाठी कोकण विभागाचा आराखडा तयार करण्यात करून राज्यस्तरीय नवीन लेखाशीर्ष निर्माण करावे. कोकणात आवश्यकतेनुसार नवीन साकव निर्मिती, दुरुस्तीसाठी आराखडा तयार करावा. यासाठी गावनिहाय माहिती घेण्यात यावी.
कोकणात अस्तित्वातील साकवांची उंची वाढवून पुलात रूपांतर करण्यासाठी आराखड्यात समावेश करावा. साकव दुरुस्ती आणि निर्मितीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.
0000
नागपूर येथील सहकार भवन बांधणीचा प्रस्ताव तातडीने
नागपूर येथील सहकार भवन बांधणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा
- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. 5 : नागपूर येथे भव्य सहकार भवन उभारण्याचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सुंदर आणि प्रशस्त इमारत असेल अशा पद्धतीचा आराखडा तयार करावा, अशा सूचना सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.
मंत्रालयात नागपूर येथे सहकार भवन उभारण्याबाबत बैठक झाली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे, सहकार विभागाचे उपसचिव अंकुश शिंगाडे, नागपूर विभागीय उपनिबंधक दिनेश चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अविनाश गुव्हाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, नागपूर येथील गणेश पेठमधील भूविकास बँकेच्या जागेवर सहकार भवन उभारण्यात यावे. या इमारतीचा आराखडा तयार करताना इमारतीची देखभाल दुरुस्ती लक्षात घ्यावी. तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील सहकार भवनच्या आराखड्याचा अभ्यास करून सर्वंकष असा आराखडा तयार करावा. या विषयी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) चा पूर्ण वापर करावा. सध्या या ठिकाणी असलेल्या भूविकास बँकेच्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही राज्यमंत्री भोयर यांनी दिल्या.
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...