Friday, 6 June 2025

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही कराअण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प

 पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा

-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि.: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावीअसे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

      विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंगपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगलापुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.    

मेट्रो मार्गाचा विस्तार

          मेट्रो मार्गाचा विस्तार पिंपरी चिंचवड ते निगडी येथेपर्यंत केला जाणार असून या जवळपास साडेचार किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 910 कोटी रुपये आहे या मार्गावर तीन स्थानक प्रस्तावित आहेत. तसेच भक्ती शक्ती ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मोरवाडी मेट्रोस्थानकाच्या जवळ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची अडचण दूर करण्यात यावी व यासाठी पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागेचा विकास केल्या जावाअशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केल्या.

         यावेळी पिंपरी चिंचवड महानगर विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूकजल व्यवस्थापनकचरा व्यवस्थापनशिक्षणआरोग्य आणि सामाजिक सुविधा यांचा समावेश आहे याची माहिती देण्यात आली.

         यासह पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी पार्किंग झोन आणि इतर सुविधाशहराच्या विविध भागांना जोड मार्गजलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याची टाकी. घनकचरा व्यवस्थापन व मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठीअण्णासाहेब मगर स्टेडियमसंविधान भवनचे कामऔद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

          पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या कामाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

  

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

·         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि.:- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामांचा आढावा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला.

            विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमारकोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीबौद्ध धर्मगुरू, बुधिष्ठ सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधीप्रदीप कांबळेशशी प्रभूतसेच सामाजिक न्याय विभागबृहन्मुंबई महानगरपालिकाएमएमआरडीए व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची भव्य वास्तू उभी राहत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने हा मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरणविषयक मान्यतातसेच हा मार्ग रुंद बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित विभागांकडून नियोजन करण्यात यावे.

         या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे

 अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे

आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावेअसे संचालक ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले.  श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिकराज्य  व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात.

या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेवून ती समाजमाध्यमेवृत्तपत्रेदूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी.

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणेआणि आवश्यक सूचना पोहचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी  प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावाज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावीआपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावीविशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले.

यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळेमुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या.

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा

 आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा

 - हेमराज बागुल

आपत्कालीन परिस्थितीत समन्वयसंवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणालेआपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावेअसेही श्री. बागुल म्हणाले.

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

 आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

- अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

 

  • पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी यांची बैठक

 

मुंबईदि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावीअसे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.

यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुलसंचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणालेनैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारीतातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाच्या असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती  संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजेअसेही त्यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण

  

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे

वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण

 

            ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुंबईपुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईपुणे प्रवास अधिक वेगवानसुलभ आणि सुरक्षित होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेअन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळसार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरेनिरंजन डावखरेशांताराम भोईरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकरमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाडठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीची संक्षिप्त माहिती:-

ठाणे खाडीवर आधीपासून मानखुर्द-वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत. या नवीन पूलामुळे इतर दोन पुलांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुलाची निर्मिती होणेही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य

 वृत्त क्र.२३८२

श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार

 

  • कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस प्रारंभ

 

कोल्हापूरदि. ०५ :  महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी खासदार धैर्यशील मानेआमदार डॉ.विनय कोरेआमदार अशोकराव माने यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगेपोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्तामुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेनकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.कदमप्रांताधिकारी समीर शिंगटे व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेवाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासामध्येसंस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपल्या सर्व देव-देवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आहेत.

आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आहे. ती येत्या काळात पूर्ण करू. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ.

श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर अनेक भाविक येतात, त्यांची चांगली सोय व्हावी तसेच येथील वातावरणही उल्हसित रहावे या दृष्टीनेच विकास आराखड्याची चांगली अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. पन्हाळगडावरील झालेल्या चांगल्या कामाप्रमाणेच याही विकास आराखड्यातून चांगली कामे होतील.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी इथिक्सइकॉनॉमिक्सइकॉलॉजी आणि एन्व्हायर्मेंट या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०७० पर्यंत भारत कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरण विषयक महत्त्व पटवून दिले. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या.

आमदार डॉ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगत या ठिकाणी विभागाच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने, अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करू. हे करीत असताना तसेच मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांशिवाय कुठल्याही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार नाही.  स्थापन करण्यात येत असलेल्या प्राधिकरणात ग्रामस्थांचा सहभाग असेल व त्यांचे मत विचारात घेतले जाईल असेही कोरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दख्खन केदारण्य प्रकल्पास शुभेच्छा देऊन या पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास आराखडा शास्त्रीय दृष्टिकोनातूनपर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल असे सांगितले. आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले.

०००००

Featured post

Lakshvedhi