Thursday, 5 June 2025

आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा

 आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

ग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबईदि. ४ : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणारे आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी  १५ दिवसांत ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीमहिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत  गावतालुकाआणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. विविध विभागांमधील समन्वयाद्वारे महिलांच्या समस्या सोडविणेयोजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक पातळीवर महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करणेविधवा प्रथाहुंडा प्रथास्त्री भ्रुण हत्या रोखणेएकल महिलांच्या योजनांसंदर्भात जनजागृती करणे यासाठी ग्रामस्तरीय समिती काम करणार आहे.आदिशक्ती अभियान हा महिलांच्या सक्षमीकरणाचा एक व्यापक उपक्रम आहे.

सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर त्वरित उपाययोजना आखणेशासकीय योजनांची माहिती व लाभ महिलांपर्यंत पोहोचविणेमहिला उद्योजकतास्वयंपूर्णताशिक्षणआरोग्य व पोषणासंदर्भात विशेष उपक्रमग्रामस्तरावर महिलांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी समिती सक्रिय करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी आयुक्त नयना गुंडेसह आयुक्त राहुल मोरेसहसचिव वि.रा.ठाकूरजिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

कामावर अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीस तत्काळ मदत देण्यात यावी

 कामावर अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीस

तत्काळ मदत देण्यात यावी

-         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. 4 :कामावर असताना अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या पत्नीस नियमानुसार भरपाई व मदत जलदगतीने देण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून संबंधित कंपनी व्यवस्थापनाने कंत्राटदारास सूचित करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

              विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघकामगार विभागाचे उपसचिव स्वप्निल कापडणीसचिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावीश्रमिक कामगार संघटनेचे यशवंत भोसलेटाटा मोटर्सचे उप महाव्यवस्थापक प्रशांत जोशीअनितेश देशपांडे यासह कामगार विभागकंत्राटदार कंपनी व टाटा मोटर्सचे अधिकारी उपस्थित होते.

             विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणालेपिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत कंत्राटदारा मार्फत कामास नेमलेल्या परप्रांतीय कामगाराचा कामादरम्यान मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या कामकाजाची तपासणी करण्यात यावी. कामगाराच्या वारसास योग्य ती मदत देण्यात यावीअसे श्री.बनसोडे यांनी सांगितले.

             संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी यापूर्वीच पालकांना साडेपाच लाख रुपयांची व पत्नीस एक लाख रुपये दिल्याचे कंत्राटदार व कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले होते.

कामगार विभागाशी संबंधित विविध प्रकरणांबाबत बैठका

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विभागाशी संबंधित विविध प्रकरणांबाबत बैठका झाल्या. यामध्ये धानोरी येथील कंपन्यातील कामगारांशी संबंधित चर्चा करण्यात आली. कामगारांच्या प्रश्नी निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन सक्षम नसल्याने त्यांचे कंपनी मालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी दिले.

गोदावरी खोरे विकास महामंडळाकडील विविध योजनांच्या कामाचा आढावा

 गोदावरी खोरे विकास महामंडळाकडील विविध योजनांच्या कामाचा

 जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबई दि. ४ :- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गोदावरी खोरे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या विविध उपसा सिंचन योजनाकालवा अस्तरीकरण बाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थीत केलेल्या विविध विषयासंदर्भात बैठका घेऊन या योजनांची कामे गतीने करण्याबाबत सूचना दिल्या.

 

मंत्रालयातील परिषद सभागृहात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडखासदार डॉ . अजित गोपछडेआमदार सर्वश्री संभाजी पाटील निलंगेकरकाशिनाथ दातेप्रकाश सोळंकेविलास भुमरेचंद्रकांत नवघरेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत धनोडा उच्च पातळी बंधारामौजे किनी कदू (ता. अहमदपूर) (जि. लातूर) येथील मोघा ल.पा. तलावनिलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीगोदावरी खोरे मधून अधिका-यांनी पाहणी केलेले प्रकल्प व नवीन सुचवावयाची कामेमांडओहोळ कालवा अस्तरीकरण करणेसिंदफणा नदीवर १५ वर्षापूर्वी बांधलेल्या देपेगाव-सांडस चिंचोली (ता. माजलगावजि. बीड) कोल्हापुरी बंधा-याचे उच्च पातळी बंधा-यात रुपांतर करणेमाजलगावकुंडलिकासरस्वतीगुणवती या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून सिंचना अभावी वंचित असलेल्या गावांना उपसा जलसिंचनेद्वारे शेतीसाठी पाणी मिळणेउर्ध्व कुंडलिक प्रकल्प प्रकल्पातून अतिरिक्त पाण्याचा लाभ देणेमाजलगाव मतदारसंघातील कामांबाबत जलसंपदा विभागाकडे प्रलंबित प्रस्तावमौजे मोरवडता. वडवणीजि.बीड ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठामौजे मोरवड मध्ये वंचित राहिलेल्या क्षेत्रास लाभ क्षेत्रात आणणे,पैठण व पाचोड या दोन तालुक्यासाठी सिंचन व पिण्याच्या पाण्याची शाश्वत सुविधा पुरविण्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसासिंचन योजनेच्या कामासंदर्भात,पैठण तालुक्यातील उर्वरीत गावांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करुन देणेकेळी पाझर तलावाचे पुनर्जीवन करणेवसमत मतदारसंघातल सिध्देश्वर उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करणे आणि नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार

 सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

मुंबईदि. ४: वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या वर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावेअसे आवाहनही त्यांनी केले.

भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बांद्रा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्होमुंबई महापालिका सह आयुक्त दिनेश पल्लेवाडभामला फाउंडेशनचे आसिफ भामला अभिनेत्री रवीना टंडनगोदरेज कंपनीचे नादिर गोदरेजगीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेकमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रियेचे जाळे मुंबईत तयार करण्यात येत असून भविष्यात मुंबईतील समुद्रात जाणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केलेले असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३० पर्यंत नेट झिरो चे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण ऊर्जे गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडून मिळविण्याचा मानसही आहे. यामध्ये महाराष्ट्र पुढे असून राज्याने २०२६ पर्यंत कृषी क्षेत्राची १६ हजार मेगावॉट ऊर्जा गरज सौर ऊर्जेपासून भागविण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्यातील महानगरांमधील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा ग्रीन ऊर्जेवर आणण्यात येत आहे. मुंबईत याची सुरुवातही करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरातील संपूर्ण  परिवहन सेवेचे तिकीट सिंगल तत्वावर आणण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सिंगल यूज प्लास्टिक वापर बंदी जनजागृतीबाबत अभिनेता अजय देवगण यांच्यावर चित्रित प्यासा या प्रचार मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

कृषी क्षेत्रासाठी जलसुरक्षा व सौरऊर्जा योजनेचा ध्यास,पर्यटन विकासासाठी पाच वर्षांची ठोस योजना

 कृषी क्षेत्रासाठी जलसुरक्षा व सौरऊर्जा योजनेचा ध्यास

राज्यात शेतकऱ्यांसाठी जलसुरक्षातंत्रज्ञानवीज यांच्यावर भर दिला जात आहे. २०२६ पर्यंत सौरऊर्जेवर आधारित मोफत दिवसभर वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्पादन व उत्पन्न वाढेलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

 

 

पर्यटन विकासासाठी पाच वर्षांची ठोस योजना

महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठी क्षमता असून पुढील पाच वर्षांसाठी ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक सहभागसंरक्षण क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यांच्यामार्फत पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

औद्योगिक विस्तार,१०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणूक,मुंबईत झपाट्याने शहरी परिवर्तन,,परकीय गुंतवणुकीत अव्वल

 औद्योगिक विस्तार

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले कीराज्यातील औद्योगिक ताकद आता केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न राहता छत्रपती संभाजीनगरगडचिरोलीनाशिकरायगड यांसारख्या भागांत झपाट्याने वाढते आहे. इव्ही हबस्टील सिटीव औद्योगिक टाऊनशिपद्वारे संपूर्ण राज्य औद्योगिक महासत्ता बनत आहे.

१०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणूक

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी १०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणुक करण्यात येणार असल्याचे सांगून त्यात वाढवण बंदरनागपूर-गोवा महामार्गनवीन विमानतळमुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प राज्याच्या व्यापार व वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण देणार आहेत असेही सांगितले.

मुंबईत झपाट्याने शहरी परिवर्तन

धारावी पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईत शहरी पुनर्रचना वेगात सुरू असून८ लाख नागरिकांचे पुनर्वसन यामार्फत केले जाणार आहे. त्याचबरोबर "सिंगल ट्रान्सपोर्ट कार्ड" व एकत्रित मोबाईल अ‍ॅपद्वारे वाहतूक व्यवस्था सुलभ केली जात आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमुळे किनारपट्टी स्वच्छ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य:

परकीय गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकात्मिक डिजिटल "सिंगल विंडो" प्रणालीएमआयडीसी औद्योगिक पार्क आणि 'कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंटयांच्या माध्यमातून गुंतवणूक सुलभ झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीत अव्वल असल्याने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सत्कार

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशाच्या 40 टक्के आघाडीवर आहे. यानिमित्ताने या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात

शासकीय शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती ,पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा योजना राबविण्यात येणार असून

 शालेय गुणवत्तेचा आराखडा अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे राबवावा

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. ४ : शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिका-यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावीअसे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षकमुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेआमदार सर्वश्री अमरीश पटेलनिरंजन डावखरेज. मो. अभ्यंकरजयंत आसगावकरज्ञानेश्वर म्हात्रेसुधाकर अडबोलेमाजी आमदार कपिल पाटीलश्रीकांत देशपांडे तसेच  शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (दूरदृश्य प्रणाली द्वारे)एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारीशिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणालेराज्यातील प्रत्येक मुलाला चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिका व  शिक्षण विभागाची एकत्रित बैठक घेण्यात येईल. पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा योजना राबविण्यात येणार असून सीएमश्री अंतर्गत पाच हजार शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीमंत्रीखासदारआमदारलोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी विभागातील अधिकारीही उपस्थित असणार आहेत. या शैक्षणिक वर्षात शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री श्री .भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक  विद्यार्थ्याने आईच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन करावेअसेही शालेय शिक्षण मंत्री  श्री.भुसे यांनी केले.

शासकीय शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती रुजविण्यावर भर दिला जात असून शाळांमध्ये डिजिटल साधनांची उपलब्धता वाढवण्यात येत आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभाग सकारात्मकरित्या काम करीत असून शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी संच मान्यतेसंबंधीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त शिक्षकांची सेवाजेष्ठतेनुसार यादी तयार करणेअतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आदी बाबींवर मान्यवरांनी मते मांडली. 

या बैठकीत वस्ती शाळांवरील स्वयंसेवक शिक्षकांचे प्रश्नटप्पा वाढअतिरिक्त शिक्षक समायोजनशिक्षकांचे प्रशिक्षणवेतनतर अनुदानजुनी पेन्शन योजना या विषयाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

00000

Featured post

Lakshvedhi