Tuesday, 3 June 2025

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली,pl share

 समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली

मुंबईदि. : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. यानुसार 23 ते 25 जून 2025 या कालवधीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांकडून विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. तृतीयस्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकालातील एक वेळची बाब म्हणून राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.

सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. आंतरजिल्हा बदली संचालक-1 आरोग्य सेवामुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीकरिता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकारी यांचेकडून 12 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार असून प्राप्त अर्जांची छाननी 13 ते 19 जून 2025 पर्यंत होणार आहे. बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी 20 जून 2025 रोजी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 23 ते 25 जून 2025 या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना 07 जूलै 2025 पर्यंत रुजु होण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.

जिल्हा अंतर्गत बदली करण्याकरिता शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषद यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदली प्रक्रियेसंदर्भाने समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

List of important numbers for every person, all numbers are toll free...* Pl share

 List of important numbers for every person, all numbers are toll free...*

_________________________

CM Complaint Portal👉181

Electricity Service👉1912

Animal Service👉1962

Police Service👉112,100

Fire Service👉101

Ambulance Service👉102

Traffic Police👉103

Disaster Management👉108

Child Line👉1098

Railway Inquiry👉139

Anti-Corruption👉1031

Rail Accident👉1072

Road Accident👉1073

CM Helpline👉1076

Crime Satire👉1090

Women Helpline👉1091

Earthquake👉1092

Child Abuse Help👉1098

Farmer Call Center👉1551

Citizen Call Center👉155300

Blood Bank👉9480044444

Cyber ​​Crime👉1930


*Please send it to all groups, thank you!!*

कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी - , सूचना पाळा ,pl share

 कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नयेकाळजी घ्यावी

- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

 

            मुंबईदि. 3 : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

            कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत.

            जानेवारी 2025 पासून 12 हजार 11 रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी 873 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत. याबाबत आरोग्य आरोग्य विभागाने जाहीर केलेली माहिती :

दि.02 जून 2025 रोजी पॉझीटीव्ह रुग्ण – 59 (मुंबई-20ठाणे-4पुणे-1पुणे मनपा-17पिंपरी चिंचवड मनपा - 2सातारा - 2कोल्हापूर मनपा - 2सांगली मनपा - 1छत्रपती संभाजीनगर - 1छत्रपती संभाजीनगर मनपा - 7अकोला मनपा - 2)

2 जून 2025 रोजी सक्रिय असलेले रुग्ण – 494

माहे जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या - 483 (जानेवारी - 1फेब्रुवारी 1मार्च- 0एप्रिल- 4मे - 477)

            निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 9 व इतर 1 असे एकूण 10 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस आजार होता. पाचव्या रुग्णास आयएलडी होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस होता व 2014 पासून अर्धांगवायू झालेला होता. सातव्या रुग्णास सीवीअर एआरडीएस विथ डायलेटेड एओटिक रीगर्जिटेशन हा आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह आणि नवव्या रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब होता व इतरमध्ये 47 वर्षीय महिला असूनमहिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.

            कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हेतर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5 % रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्हीपुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

            जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारीमनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबरआरटीपीसीआर चाचणीऑक्सीजन बेडआयसीयू बेडव्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी.

            खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दीतापखोकलाघसादुखीधाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून र्मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणेइतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा

 अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा - उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य शेती क्षेत्राने केले. त्यामुळे या क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अलिकडच्या काळात निसर्गाचा असमतोलमनुष्यबळाची कमतरतावाढता खर्चपाण्याची उपलब्धता आदी कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि वेळेत जास्त उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल. शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचे कार्य पुणे ॲग्री हॅकॅथॉनने केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यापुढील काळात विविध ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. हॅकॅथॉनमध्ये नवे तंत्रज्ञाननव्या कल्पना मांडण्यात आल्या. हे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचे कार्य शासनकृषी विद्यापीठेस्वयंसेवी संस्थाशेती सर्वांनी मिळून करायचे आहे. हॅकॅथॉनमध्ये विजेत्यांनी सादर केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरात सातत्य ठेवावेशेतकऱ्यांशी नाते जोडून नवनवे प्रयोग करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डुडी यांनी आयोजनामागची भूमिका मांडली. यावेळी सुपर ज्युरीज्युरी टीम आणि नॉलेज पार्टनर संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअपनवोद्योजक आणि उपक्रमशील शेतकरी यांना कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता,  मृदासिंचन आणि मृदा आरोग्य व्यवस्थापनकृषी यांत्रिकीकरणफर्टीगेशन आणि रोग कीड व्यवस्थापनपीक काढणी उत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापनकृषी अर्थशास्त्र बाजार जोडणीइतर कोणतीही नवकल्पना या विभागातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावेमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुखमाजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगटमराठा चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबानेबॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक संदीप खोसलासह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदेबॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघनेचर ग्रुप इस्रायलचे चेतन डेडिया आदी उपस्थित होते.

0000

क्लिन प्लांट' कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक केंद्र महाराष्ट्रात -

 क्लिन प्लांटकार्यक्रमांतर्गत सर्वाधिक केंद्र महाराष्ट्रात - केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनाचे मुख्य केंद्र आहे. येथील शेतकऱ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून या क्षेत्रात प्रगती केली आहे. फलोत्पादनासाठी रोपवाटीकेतून मिळणारे रोप रोगमुक्त असावे आणि शेतकऱ्यांना लाभ देणारे असावे यासाठी क्लिन प्लांट’ कार्यक्रम देशात राबविण्यात येईल, केंद्रीय कृषिमंत्री श्री.चौहान यांनी सांगितले.   

शेतकऱ्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन देशात यासाठी ९ केंद्रे उभारण्यात येतील आणि त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील. द्राक्षाचे केंद्र पुणे येथेसंत्र्यासाठी नागपूर येथे आणि डाळींबासाठी सोलापूर येथे सुरू करण्यात येईल. त्यासाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या कार्यक्रमांतर्गत आधुनिक रोपवाटीका उभारण्यात येतील आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना चालविण्यासाठी या रोपवाटिका देण्यात येतील. मोठ्या रोपवाटिकेसाठी ३ कोटी रुपये आणि मध्यम आकाराच्या रोपवाटिकेसाठी दीड कोटी रुपये देण्यात येतील. यातून दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना मिळतील. या केंद्राच्या आधारे महाराष्ट्राचे फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हॅकॅथॉनमधील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

 हॅकॅथॉनमधील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

कृषी विभागाने राज्यातील विविध भागात असे हॅकॅथॉन आयोजित करावे अशी सूचना करून श्री.फडणवीस म्हणालेदेशातील सर्वाधिक ३० ते ३२ टक्के स्टार्टअप्स कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यातील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. विविध कृषी आधारित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री हॅकॅथॉनसारख्या उपक्रमाची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील ही क्रांती अशाचप्रकारे पुढे नेली तर शेती क्षेत्रातील प्रश्न दूर करून शेती उत्पादकता वाढवून शेतकऱ्याच्या फायद्याची शेती करता येईल. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित शेती क्षेत्रातील बदल परिसरातील शेतकऱ्यांना दाखवावेअसे आवाहन त्यांनी केले.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे गरजेचे,क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार

 कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे गरजेचे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'क्लिन प्लांटकार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार

- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

 पुणे ॲग्री हॅकॅथॉनचे पारितोषिक प्रदान

 

पुणेदि. ३ : बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पहिल्या पुणे ॲग्री हॅकॅथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय येथील सिंचननगर मैदानावर आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेरोजगार हमी योजनाफलोत्पादन मंत्री भरत गोगावलेकृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीकृषी आयुक्त सूरज मांढरेप्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदीजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेशेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. हॅकॅथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान  शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जलसिंचनपीक काढणीपिकांवर फवारणीचे तंत्रज्ञानएआय कंन्ट्रोल रोव्हर्सकीड व्यवस्थापनात मशिन लर्निंगचा उपयोगशेल्फ लाईफ वाढविणारे ड्रायर्सशेतमालाचे प्राण्यांपासून संरक्षणकाढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान आदी उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान येथे मांडण्यात आले आहे. हे उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रुपांतर करून ते बाजारापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे तयार करावीत आणि या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रुपात विकसित करून शेतकऱ्याला लाभ द्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

देशाच्या फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या क्लिन प्लांट इनिशिएटीव्हमधील अधिकधिक केंद्र महाराष्ट्राला द्यावे. वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने असे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर भाज्या आणि फळांच्या नुकसानीपासून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी क्रॉप कव्हर असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून क्रॉप कव्हरच्या क्षेत्रात योजना आणता आली तर राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील.

Featured post

Lakshvedhi