Monday, 19 May 2025

Joint Parliamentary Committee Holds Consultations on Simultaneous Elections in Maharashtra

  

 

 

Joint Parliamentary Committee Holds Consultations

on Simultaneous Elections in Maharashtra

 

Mumbai, May 17, 2025 — The Joint Committee on the Constitution (One Hundred and Twenty-Ninth Amendment) Bill, 2024, and the Union Territories Laws (Amendment) Bill, 2024, conducted extensive consultations with key stakeholders in Maharashtra regarding the feasibility and implications of simultaneous elections.

 

The Committee held in-depth discussions with officials from the Maharashtra State Government, senior state bureaucrats, and representatives of national and regional political parties. The deliberations focused on the potential administrative and economic impact of holding simultaneous elections. Senior state officials assured the Committee that a thorough study would be undertaken to assess the broader outcomes, particularly in sectors such as education.

 

During the visit, the Committee also met with representatives of political parties in Maharashtra, including Shri Prithviraj Chavan, former Chief Minister of the state. Party representatives shared their views on constitutional, logistical, and related challenges associated with simultaneous elections.

 

In a separate session, the Committee interacted with officials from the Reserve Bank of India (RBI) to understand the implications of unsynchronized elections on monetary policy. RBI officials informed the Committee that a comprehensive study would be conducted to evaluate the effects of simultaneous elections on policy formulation and economic uncertainty caused by frequent electoral cycles.

 

The Committee also engaged with representatives from major financial institutions, including the State Bank of India, Central Bank of India, Bank of India, Union Bank of India, Life Insurance Corporation (LIC), General Insurance Corporation (GIC), and NABARD. The discussions centered on the potential impact of simultaneous elections on the country’s banking sector and credit culture. These institutions assured the Committee that, under the aegis of the Indian Banks' Association, a holistic study would be initiated and its findings submitted to the Committee.

 

The Joint Committee aims to incorporate these insights into its report, guiding the way forward on the complex issue of electoral reforms and the feasibility of simultaneous elections in India.

 

समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा

 समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची

महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा

 

मुंबईदि.१७ : भारतीय संविधान (१२९वा सुधारणा) विधेयक२०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक२०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधीरिझर्व बँक ऑफ इंडियाविविध बँका व विमा कंपन्यांशी विस्तृत सल्लामसलत केली.

मुंबईच्या ताज हॉटेल येथे आज समांतर निवडणूक संदर्भात लोकसभा सदस्य पी.पी.चौधरीलोकसभा सदस्य धर्मेंद्र यादवराज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

समितीने राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समांतर निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व प्रशासकीय परिणामांवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी समितीला आश्वासन दिले कीएक सखोल अभ्यास केला जाईल आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रावर एकत्रिक निवडणुकांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती समितीला दिली जाईल.

यानंतरसमितीने महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधीज्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतायांच्याशी एकत्रिक निवडणुकांच्या घटनात्मकतार्किक आणि इतर बाबींवर चर्चा केली.

समितीने नंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींशी निवडणुकांच्या असमकालीनतेमुळे होणाऱ्या आर्थिक धोरणांवरील परिणामांविषयी संवाद साधला. आरबीआयच्या प्रतिनिधींनी सांगितले कीते या विषयावर सखोल आणि सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि वारंवार निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय व धोरणात्मक अनिश्चिततेचा प्रभाव समजून घेतील.

शेवटीसमितीने स्टेट बँक ऑफ इंडियाबँक ऑफ इंडियासेंट्रल बँकयुनियन बँकएलआयसीजीआयसी आणि नाबार्डसह बँकिंग व विमा क्षेत्रातील प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले कीएकत्रिक निवडणुकांचा बँकिंग व क्रेडिट संस्कृतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ते इंडियन बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्वसमावेशक अभ्यास करतील आणि त्याचे निष्कर्ष समितीला सादर करतील.

000

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. यात संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करणे व त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणेपारंपारिक तेल घाणी उद्योगाच्या पुर्नविकासासाठी मध्यप्रदेशझारखंडराजस्थान राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणेतेलघाणीतील सुटे तेल विक्रीवर शासनाचे निर्बंध उठविणे आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

या शिष्टमंडळात माजी खासदार रामदास तडसडॉ. भुषण कर्डिलेगजानन शेलारसंजय विभुतेबळवंतराव मोरघडेपुष्पाताई बोरसेअतुल वांदिलेजगदिश वैद्यकुणाल पडोळेप्रविण बावनकुळेनरेंद्र सुर्यवंशीभगवान बोरसे हे पदाधिकारी सहभागी होते.

सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध तब्बल 1 हजार 51 नागरिकांकडून निवेदने

 सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध

                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·     मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल हजार 51 नागरिकांकडून निवेदने

·     हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप

·       जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

नागपूरदि. 17 :  नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी ईच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिकानझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.                हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेगवेगळया झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 21 झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशीआमदार प्रवीण दटकेविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीमनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरीपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगलनागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनीप्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीमहामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटेआदी यावेळी उपस्थित होते.

सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानव्दारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी  तुकडोजी नगरकामगार कॉलनीभांडेवाडी या झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना  पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत  दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

उर्वरित चिंचभुवनशामनगरगिट्टीखदानपन्नालाल देशराज नगरआदिवासी नगरपुनापुरवाठोडाभरतवाडाहुडकेश्वरकुराडपुराशोभाखेतबिनाकीकोष्टीपुराठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.

एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी

 एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी


नागपूरदि. 17 -  शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडेआमदार प्रवीण दटकेमहापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतअधिक्षक अभियंता डॉ.श्वेता बैनर्जी उपायुक्त राजेश भगतकार्यकारी अभियंता राजेश दुफारेस्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ.गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त सोनम देशमुखसुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूरप्रकल्प संचालक संजय गदरेवित्तीय संचालक विनोद टंडननागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धनसल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते. मनपा आयुक्त यांनी मुख्यमंत्री यांना प्रकल्पाची माहिती दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. कंपनी तर्फे 30 एकर जागेवर बांधकाम करण्यात येत आहे.

            नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे 1000 मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईनफायनान्सबांधणीस्वमालकीवापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता
M/s. SusBDe 
 नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे.

या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँससेंद्रिय खतआरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असूनत्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत.  सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermentation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधीमध्ये या 30 एकर जागे व्यतिरिक्त एकर जागा Fresh Waste processing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.

0000



वृत्त क्र. 2076


निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक

 निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक

                                                                        -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर दि. 17 : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

            नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशीमनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त बी.वैष्णवीग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

असा असेल बायोडायव्हर्सिटी पार्क

            निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणुकीविषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचीशिक्षणाची संधी मिळेल. कृषीविज्ञानवनजैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

            आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वननक्षत्र वनराशी वनऔषधी वनस्पती संशोधन व संवर्धनफुलपाखरु व काजवे असलेले वनविविध मातींचे वैविध्य जपणारे दालनपर्जन्यमापनदिशा शास्त्रयोगा झोनपीस झोनफॅमिली झोनमानसशास्त्रआरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

 

ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 

नागपुर18 मई: ऑपरेशन सिंदूर को सफलतापूर्वक अंजाम देते हुए भारतीय सेना ने पाकिस्तान का एक भी हमला सफल नहीं होने दिया। इस युद्ध में देश में ही निर्मित हथियारों का उपयोग कर भारत ने जीत हासिल कीजिससे पूरी दुनिया को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत’ की झलक देखने को मिली। यह हम सभी के लिए अत्यंत गर्व की बात हैऐसा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां दिया।

 

वे ऑपरेशन सिंदूर की सफलता के उपलक्ष्य में खापरखेड़ा (नागपुर) में आयोजित तिरंगा यात्रा के दौरान बोल रहे थे। इस अवसर पर राज्य के राजस्व मंत्री एवं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेविधायक आशीष देशमुख और चरणसिंह ठाकुर उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि तिरंगा यात्रा का उद्देश्य प्रत्येक नागरिक के हृदय में राष्ट्रप्रेम की भावना जागृत करना और हमारे वीर जवानों के प्रति कृतज्ञता प्रकट करना है। उन्होंने कहा कि पहलगाम में हुए आतंकी हमले के सूत्रधार पाकिस्तान को प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया गया है। अब भारत पर कोई भी हमला सहन नहीं किया जाएगा और उसका तत्काल कड़ा उत्तर दिया जाएगा। इस अभियान को सफल बनाने वाले वीर जवानों के प्रति हम तिरंगा यात्रा के माध्यम से कृतज्ञता प्रकट करेंऐसा आह्वान भी मुख्यमंत्री ने किया।

 

युद्ध में शहीद हुए जवानों को श्रद्धांजलि देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि पूरा देश उनके परिजनों के साथ मजबूती से खड़ा है। उन्होंने कहा कि पाकिस्तान में स्थित आतंकियों के ठिकानों पर भारत ने आक्रामक कार्रवाई कीजिससे अंततः पाकिस्तान को युद्धबंदी की मांग करनी पड़ी। यह पूरे देश की ऐतिहासिक जीत है।

 

श्री बावनकुळे ने कहा कि इस यात्रा के माध्यम से सर्वधर्म समभाव और देश की एकता का प्रतीक प्रस्तुत हो रहा है। यह यात्रा हमारे सैनिकों के शौर्य और पराक्रम के प्रति कृतज्ञता और गर्व को दर्शाती है।

 

अण्णा मोड से लेकर रेलवे क्रॉसिंग तक निकाली गई इस तिरंगा यात्रा में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया।

0000

Featured post

Lakshvedhi