Sunday, 18 May 2025

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी, https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर

 महाविद्यालयीन युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर

सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

मुंबई, दि. 13 : आपत्ती व्यवस्थापनवैद्यकीय सेवापोलीस दलअग्निशमन दल  यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास रक्तदान करूनदेशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी  'MY भारतपोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीनेकेंद्रीय मंत्री  डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन  बैठक झाली. यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,   https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू आहे.  नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती दिवस आणि किती तास सेवा देऊ इच्छितात हे देखील नमूद करू शकतात. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असूनसंबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही देण्यात येणार आहे. आपत्तीकालीन  किंवा युद्धजन्य परिस्थितीत या सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मदत घेता येणार आहे. देशासाठी उभे रहा सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा

 महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा

मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे

प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करण्याचे निर्देश

मुंबईदि. १३ : महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

    महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी पी प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये यांच्यासह मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

    बंदर वापरण्याचे थकलेले शुल्क वसुलीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले कीथकबाकीदारांना फक्त नोटीस पाठवून वसुली होत नसेल तर पुढील योग्य ती कार्यवाही करावी. विभागाचा महसूल वाढवण्यासाठी जाहिरात होर्डिंग्ज उभारणीजागांचे भाडे यामध्ये सुधारणा करावी. जास्तीत जास्त निधी खर्च करावा जेणेकरून पुढील वर्षी जास्तीच्या निधीची मागणी करता येईल, असे श्री. राणे यांनी सांगितले.

श्री. राणे म्हणाले कीथकित शुल्क वसुली सोबतच पोर्ट ऑपरेटरना येणाऱ्या अडचणीवरही मंडळाने तोडगा काढावा त्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. यासंदर्भात बैठक आयोजित करावी. दर आकारामध्ये एकसूत्रता ठेवावी.

             यावेळी बंदरांमधील गाळ काढणेबंदराची क्षमता वाढवणेपूर्ण क्षमतेने बंदर चालवणे या विषयही चर्चा करण्यात आली.

बालविवाहास उपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाई

 बालविवाहास उपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाई

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीबालविवाह मुक्त राज्य करण्याच्या दिशेने कार्यवाही करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मोहिम राबविण्यात यावी. तालुकास्तरावर माध्यमिक शाळांत बालिका पंचायत सुरू करण्यात यावे. समवयस्क मुली आपल्या समस्या या माध्यमातून मांडू शकतीलजेणेकरून बालविवाह रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याचबरोबर बालकांसाठीमुलींसाठी असलेल्या योजनेची माहिती या बालिका पंचायतच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचवता येईल. तसेच बालविवाहास जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांसहीत सोहळ्यास उपस्थित असलेल्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 राज्यातील ४६८ बालसंगोपन केंद्रातील एक लाख १० हजार बालकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रलंबित लाभ तत्काळ देण्यात यावा. या योजनेशी संबंधित स्वयंसेवी संस्थांनी गृहभेटी देण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले. एकल आणि विधवा महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पाठपुरावा करावा. कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठीच्या योजना सर्व विधवा महिलांसाठी लागू कराव्यात.

मानखुर्द येथील द चिल्ड्रन एड सोसायटीच्या डागडुजीचे काम आणि संरक्षण भिंतींचे काम गतीने करण्यात यावे. दिव्यांग बालगृहाचे नव्याने करण्यात येणारे बांधकाम परिपुर्ण सोयीसुविधांसह उभारण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्प डेस्क उभारण्यात यावा. तसेच या लाभार्थी महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी दिल्या.

बालविवाह रोखण्यासाठी बालिका पंचायत सुरू करा

 बालविवाह रोखण्यासाठी बालिका पंचायत सुरू करा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 13 : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी राहता यावे यासाठी क्षेत्रातील बालगृहांबाबत माहिती व जनजागृतीसंदर्भात मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जनजागृतीसाठी बालिका पंचायत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बालविवाह रोखण्याच्या उपाययोजनासंदर्भातबाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणेसंदर्भातदि चिल्ड्रेन एड सोसायटी संदर्भातविधवा महिलांच्या कृती दलासंदर्भातमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मदत कक्ष कामाचा आढावा मंत्रालयात बैठकीत घेण्यात आला. आयुक्त नयना मुंडेउपायुक्त राहूल मोरेउपसचिव श्री. भोंडवेउपसचिव श्री. कुलकर्णी आदिसह अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार

 महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार

- केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर

मेट्रोसह राज्यात दळणवळण सुविधांचे जाळे व्यापक करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुबंई, दि. 13 : महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले.

            सह्याद्री अतिथिगृह येथे केंद्रिय नगरविकास मंत्री श्री. खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीत राज्यातील नागरी क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगर विकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            केंद्रिय नगरविकास मंत्री श्री.खट्टर यांनी महाराष्ट्रातील मेट्रो नेटवर्कचा सविस्तर आढावा घेऊन मुंबईसारख्या शहरांमध्ये मेट्रोसारखे प्रकल्प निश्चितच गरजेचे आणि उपयुक्त आहेत असे अधोरेखीत केले.  महाराष्ट्रातील  मेट्रो प्रकल्पात पन्नास टक्के केंद्र सरकार आणि पन्नास टक्के राज्य सरकार या पद्धतीने भागीदारी करण्याच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवली. तसेच राज्याच्या पुढील मेट्रो प्रकल्प तसेच नगरविकास विभाग अतंर्गत करावयाच्या विविध प्रकल्पातील अनुंषगिक बाबींमध्ये आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्याबाबतचे प्रस्ताव विभागांनी केंद्राकडे सादर करावेत असे सूचीत केले. तसेच  महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नगरविकास आणि इतर संबंधित विभागांच्या माध्यमातून चांगल्या पद्‌धतीने काम सुरु असून  विविध  प्रकल्पांच्या व्यापक आणि अधिक  प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले कीमुंबई मेट्रोसह  महाराष्ट्रात दळणवळण सुविधांची व्यापक उपलब्धता करण्यात येत असून मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. रेल्व, बस व मेट्रो यासारख्या वाहतुकीच्या विविध माध्यमांतून प्रवाश्यांना एकात्मिक  तिकीट प्रवास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून पुण्यातील नवीन दोन मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत केंद्रिय विभागाकडून मंजूरी मिळावी. मेट्रो प्रकल्प राज्याने आपल्या निधीतून उभारले असून त्यात केंद्राकडून पन्नास पन्नास टक्के भागीदारी केल्यास राज्याला वाढीव निधी प्राप्त होईलज्यातून अधिक विस्तृत प्रमाणात मेट्रोचे काम पुढे नेता येईल. त्याचप्रमाणे  मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थी निकषांत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. केंद्राने अमृत योजनेतंर्गत राज्याला जो निधी उपलब्ध करुन दिला आहे,  त्याचा योग्य विनियोग करण्यास राज्याचे प्राधान्य आहे.  स्वच्छ भारत अभियानात राज्यात प्रभावी काम सुरु असून २०२३ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक प्राप्त करत उत्तम कामगिरी बजावलेली आहे.अशाच पद्धतीने प्रभावीरित्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य आणि निधी उपलब्ध करुन देण्यात यावा,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी  सांगितले. 

बैठकीत मुंबई मेट्रो लाईन तीनमहामेट्रो अंतर्गत नागपूर,पुणे व इतर मेट्रो प्रकल्पांच्या कामांचा तसेच गृहनिर्माणअमृत योजना, म्हाडायासह अन्य नगरविकासच्या विविध योजनांच्या कामांसंदर्भात सविस्तर सादरकीरण करण्यात आले. बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

कर्मफळ / प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं*

 सुंदर लेख नक्की वाचा.....✍️ 


*कर्मफळ / प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं*


कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाऊंट्स क्लीअर करण्यासाठी झालेली असते, "ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुनःपुनः भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो." *कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते, म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात.* 

"सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य 'जवळच' असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते, *गुरु कधीही 'करावे' लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात! आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकचं!"*

एकदा सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला, की आपण आपल्या प्रत्येक कर्मास 'सद्गुरार्पण' करावयास शिकतो, *मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेतेय ही 'विनम्रता' अंगी रुजते आणि मग अर्थातच 'कर्तेपणाचा' अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म 'अकर्म' घडून कर्मबंधनातून हळुहळू मुक्त होण्यास आरंभ होतो.* म्हणूनच सद्गुरुकृपेचे महत्त्वं अनन्यसाधारण अाहे. 


तरी प्रारब्धभोग टळत नाहीत, गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्धकर्म भोगणे अनिवार्य असते. गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठिण काळात देखील शिष्याच्या चेहर्‍यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच, फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते. 


*आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सूटका कधीही नसते, म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे, परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, 'आत्म्यास पटलेले', सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध, केवळ जगाला दाखवायला, ह्रदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करु नये ते यासाठी.*

 ज्योतिष्य आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणार्‍या घटनांचा केवळ आलेख देतं, पण *गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करुन 'कर्माप्रती सजग' करत जाते. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा, ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका यात भरकटत बसत नाही!* तर......


*सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो....!!!*

महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार

 महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई, दि. 13 : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हातामध्ये घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेतयावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहेत्या दृष्टीने महारेलकडे जबाबदारी दिली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशनमहाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होतेयावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार चित्राताई वाघमहाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगच्या अध्यक्षा सुशीबेन शाहआमदार मनोज जामसुतकरआमदार प्रवीण दरेकरमहारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित आहेत.  तर टिटवाळा येथे आमदार विश्वनाथ भोईरमाजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेरे रोड केबल स्टेड ब्रिजचे काम अतिशय अडचणीच्या स्थितीतवाहतुकीला कमीत कमी बाधा पोहोचवतवाहतुक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलने पूर्ण केले आहे. हे काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरूनगतिशीलतेने दर्जेदार काम पूर्ण केले आहे. पूल देखील एक आकर्षणाचे केंद्र असतेते आपल्या शहराचे एक प्रकारे मूल्य वाढवणारी अशा प्रकारची एक वास्तू असतेहा विचार करून त्याच्यामध्ये विद्युत रोषणाईसह अन्य वेगवेगळ्या प्रकारे कामे करुन उत्कृष्ट वास्तु तयार केली आहे.  नागपूरमध्येही महारेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 पूल तयार झालेले आहेतत्याचेही लोकार्पण लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

रे रोड केबल स्टेड ब्रिज

संत सावता माळी मार्गावरील रे रोड आणि डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवरील मध्य रेल्वेच्या मार्गावर रे रोड स्थानकाजवळ ६ लेनचा केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे. हा महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे.

टिटवाळा रोड ओवर ब्रिज

कल्याण- इगतपुरी विभागातील टिटवाळा आणि खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण रिंग रोडवर टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ४ लेनचा रोड ओवर ब्रिज आहे.

Featured post

Lakshvedhi