Friday, 16 May 2025

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

 

मुंबई, दि. १६ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

 

 बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य  पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

 

ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतोअसे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

 

मुंबईदि. १६ :- 'भले शाब्बास!जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण४७ रौप्य५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 

 

'ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया स्पर्धा 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूत्यांचे प्रशिक्षकमार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार 2024 साठी अर्ज करण्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आवाहन https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) द्वारे

 राष्ट्रीय पुरस्कार 2024 साठी अर्ज करण्याचे

सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आवाहन

 

नवी दिल्लीदि. 16 : केंद्रीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्मलघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी विविध श्रेणींमधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजकअनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील ‘एमएसएमई’ उद्योजकांना विशेष तरतूदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गतपुरस्कारप्राप्त ‘एमएसएमईं’ना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) पुरस्कार रक्कम स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर  चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.

 

राष्ट्रीय पुरस्कार 2024 च्या विविध श्रेणीसाठी ‘एमएसएमई’कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 20 मे 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspxद्वारे हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगगृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in/द्वारे देखील त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई - विकास आणि सुविधा कार्यालय (MSME - DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.

0000

एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 

            मुंबईदि. १६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे एप्रिल २०२५ मध्ये दि. १२/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्रीदि. १६/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गौरवदि. १८/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेषदि.२३/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २९/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे  उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष तिकीट क्रमांक GS 04 / 9381 या गणेश एन्टरप्रायजेसदादर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय एप्रिल- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १३४७९ तिकीटांना रू. ५४,५३,०५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५६६९९ तिकीटांना रू. १,९९,४९,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा),   महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले  आहे.

भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा

 भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 16 : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे.

या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटइतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिकधार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणेव्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसूनआपल्या वैभवशाली परंपरेचासांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेलत्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यानसर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावायासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंतप्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेतपर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावरऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रमगाईड्सतसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहासमहाराष्ट्राची शौर्यशाली परंपराआणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असूनप्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.

या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावाआपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावाआणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावेअसे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वालवरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय साधत परीश्रम करीत असूनछत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्लेमहाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहेअसे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.

🔶 सहल तपशील -

          सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट

          शुभारंभ दिनांक: 09 जून 2025

          कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

          प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

          प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादरठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग -

मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

 

🏰 प्रमुख स्थळांची माहिती -

          रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

          लाल महालपुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

          कसबा गणपती व शिवसृष्टीपुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

          शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

          भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

          प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

          कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

          पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

 

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): -

            उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: -

          भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)

          AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

          सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड

          ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन

          प्रवास विमासर्व प्रवेश शुल्क (किल्लेमंदिरेरोपवेशिवसृष्टी इत्यादी)

          सुरक्षा व्यवस्था.

 

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: -

          साहसी खेळबोटिंग इत्यादी.

          खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.

          इतर कोणताही वैयक्तिक खर्च.

          कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

 

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): -

          पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.

          दुसरा दिवस: पुणे (लाल महालशिवसृष्टीकसबा गणपती).

          तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.

          चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.

          पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.

          सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

 

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: -

IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com

00000

राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी

 राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी

                                         - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळ

 कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेत घेण्याच्या सूचना

 

मुंबईदि. 14 : राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे. तोपर्यंत या जमिनींची दस्त नोंदणी करणे थांबविण्यात यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्याबरोबरच कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमीनीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी महसूलमंत्री श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआमदार अमल महाडिक तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणालेदेवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरविण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगी खेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये. जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल.

कोल्हापूर शहर उपनगरे नक्शा योजनेत

कोल्हापूर शहराचा झपाट्याने विकास होत वाढीव गावठाणाचा सर्व्हे करुन प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली होती. त्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हयातील शंभर गावांचा सर्व्हे नक्शा या प्रणालीमध्ये करुन पायलट प्रकल्प तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या

कामठी येथे शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन; नागपूरमधील विविध आरोग्य सेवेचा महसूलमंत्री

 कामठी येथे शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन;

नागपूरमधील विविध आरोग्य सेवेचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला

 

मुंबईदि.१४ : नागपूर शहर विस्तारत असून त्याठिकाणी आरोग्याच्या सेवा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. कामठी येथे ५० खाटांचे रुग्णालय आहे. ते १०० खाटांचे करण्यात यावे.  यासाठी ६ एकर  जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या दालनात नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध विषयराष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारीकर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मंत्री श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनीआरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेनागपूर जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी पदांची आवश्यकता होती. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर आहारसुरक्षावस्त्रधुलाई आणि स्वच्छता सेवा कंत्राटी पद्धतीने राबविण्याबाबतच्या प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यतानवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतचाही आढावा घेण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानमोहपामोवाड या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. उमरेड येथील ट्रामा केअर युनिटचा पदनिर्मिती प्रस्तावजिल्हा रुग्णालयास मंजूर ३५ कोटीचा निधी वितरीत करणे आणि डागा रुग्णालयास २० कोटीची आवश्यकता होती. त्यापैकी १३ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधीही वितरीत करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

कुही येथे ५० खाटांचे रुग्णालय

ग्रामीण रुग्णालय कुही येथे सध्या ३० खाटांचे रुग्णालय असून त्याचे श्रेणीवर्धन करुन ते ५० खाटांचे करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi