Saturday, 17 May 2025

Maharashtra Raj Bhavan celebrates Sikkim State Foundation Day Governor appeals to youth to make their neighbourhood 'plastic free'

 Maharashtra Raj Bhavan celebrates Sikkim State Foundation Day

Governor appeals to youth to make their neighbourhood 'plastic free'

 

The 50th Anniversary of the State Foundation Day of Sikkim was celebrated at Maharashtra Raj Bhavan Mumbai in presence of Maharashtra Governor and Chancellor of State Universities C.P. Radhakrishnan on Fri (16 May). The Sikkim State Foundation Day was organised as part of Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India.

The Sikkim State Foundation was organised by Maharashtra Raj Bhavan as part of the Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India. 

Observing that plastic waste has littered the country from Kashmir to Kanyakumari, the Governor called upon the youth to follow the example of 'plastic free' Sikkim State and keep their neighbourhood plastic free.

The Governor applauded Sikkim for becoming the State with the least use of plastic and for promoting organic farming. 

The Governor applauded the students Kuldeep Jathar and Shraddha Charatkar for their beautiful rangoli of a Sikkim woman and patted Omkar Gomase for his painting of the monuments and life of the Sikkimese people.

The Cultural team of the University presented the Ghantu folk dance, Lepcha folk song and Lepcha Folk Dance of Sikkim on the occasion.  An audio visual film showcasing the beauty, history and  heritage of Sikkim made by the students of the Media department of the University was also shown on the occasion.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware delivered the welcome address, while Under Secretary Sushil More proposed a vote of thanks.

Vice Chancellor of Shivaji University Prof D. T. Shirke, Pro Vice Chancellor P S Patil, Registrar Dr V N Shinde, members of the Management Council of the University, students and members of the cultural team of the University were present.

एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा

 एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 16 : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला तर देश अधिक सुजलाम सुफलाम होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे साजरा झाला. 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.

साधारण तीन दशकांपूर्वी देशात प्लास्टिक - पॉलिथिन बॅग वापरण्याचे प्रचलन नव्हते. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडतही नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक बॅगमध्ये आणली जाते. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा तसूभर देखील कमी नाही. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे. उत्तम मार्केटिंग मुळे  काही देश पर्यटनात पुढे गेले आहे.  लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीरहिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्यागडकिल्लेवारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे 'सिंदूरमोहिम प्रभावी ठरली. लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोकनृत्य  घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 

विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट  'सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडियायावेळी दाखविण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील  मोरे यांनी  आभार मानले.

कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्केप्र-कुलगुरु पी. एस. पाटीलकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदेव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

**

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे · नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन,pl share important

 आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितसज्ज रहावे

·        नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

मुंबईदि. 16 : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितसज्ज आणि जागरूक रहावेअसे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्हीरेडिओखात्रीशीर सोशल मीडियास्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्चबॅटऱ्यामेणबत्त्याप्राथमिक उपचार किट व आवश्यक औषधेपाणी (किमान ३ दिवस पुरेसे) व टिकाऊ अन्नमोबाईल चार्जर आणि पॉवर बँकवैध ओळखपत्रे व आवश्यक रोख रक्कममहत्त्वाच्या संपर्क क्रमांकांची यादी आदी आवश्यक वस्तू तयार ठेवाव्या.

मूलभूत सुरक्षा नियम

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जवळचे आश्रयस्थानबंकर किंवा इव्हॅकेशन प्लेसेसघरातील सुरक्षित जागा (खिडक्यांशिवाय असलेली खोली) तसेच "लाइट्स आउट" किंवा "ब्लॅकआउट" सूचनांचे पालन करावे. हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र अलर्ट आल्यास ताबडतोब घरात रहावेसुरक्षितठिकाणी आश्रय घ्यावा. खाली बसून डोकं झाकावेखिडक्यांपासून दूर रहावेदिवे बंद व खिडक्यांवर जाड पडदे ठेवावेसायरन काळात लिफ्टचा वापर टाळून जिन्यांचा वापर करावा.

तसेच दिव्यांग व लहान मुले व वृद्ध व्यक्तीआजारी व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. नागरी संरक्षण स्वयंसेवकस्थानिक पोलीस किंवा सुरक्षा कर्मचा-यांनी दिलेल्या सूचना पाळाव्या. अनावश्यक प्रवास टाळावा. वाहतूक नियमांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लागू असल्यास पर्यायी मार्गाबाबत माहिती घ्यावी. 

 संवेदनशील माहिती (सैन्य हालचालीमहत्त्वाचे ठिकाणे) कुणाशी शेअर करू नका. संशयास्पद लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका किंवा पुढे पाठवू नका. आपत्कालीन परिस्थितीत नेटवर्क फ्रि ठेवण्यासाठी संवाद मर्यादित ठेवावा.  घाबरल्याने गोंधळ निर्माण होतो- शांत राहा व इतरांनाही माहिती द्या व मदत करावी. कर्फ्यूहालचाल निर्बंध व आपत्कालीन आदेश पाळून स्थानिक प्रशासनाला मदत करावी. आपली जागरूकताशिस्त व एकात्मता राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सज्ज असावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक

आपत्ती व्यवस्थापन विभाग मदत कक्ष : १०७०/१९१६/९३२१५८७१४३मुंबई पोलिस - १०० / ११२मुंबई अग्निशमन केंद्र - १०१२३०८५९९२रुग्णवाहीका - १०८महिला मदत कक्ष - १०३अल्पवयीन मुलांकरिता मदत कक्ष - १०९८वन विभाग - १९२६गॅस गळती मदत कक्ष (LPG) - १९०६बेस्ट पॉवर (शहर) ८८२८८३०२८८९९३०९०११९३अदाणी एनर्जी (पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांचा काही भाग) ५०५४९१११५०५४७२२५महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी बोर्ड (पूर्व उपनगरे) १८००-२३३-२३४५९९३०२६९३९८टाटा पॉवर (चेंबूर) - ६७१७५३६९रेल्वे संरक्षण दल (RPF): १८२ (ट्रेन-संबंधित आपत्कालीन परिस्थितींसाठी).

धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 14 निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आवाहन

 धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी

सर्वोच्च न्यायालयाच्या 14 निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आवाहन

नवी दिल्लीदि. 16 धोकादायक स्वरुपाच्या कचऱ्याच्या सफाईसाठी अजूनही हाताने सफाईची पद्धत वापरली जात असल्याच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 14 निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावीअसे आवाहन केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये आपल्या एका महत्त्वाच्या निकालाअंतर्गत (डॉ. बलराम सिंग विरुद्ध भारत सरकार, 2023 INSC 950) दिलेल्या 14 निर्देशांची तातडीने अंमलबजावणी होईल याची सुनिश्चिती करावी असे निर्देश आयोगाने या पत्राद्वारे दिले आहेत.

विष्ठा तसेच धोकादायक गटारांची हाताने सफाईचीमानवी हक्कांचे उल्लंघन करणारी आणि जातीय भेदभावावर आधारित अमानुष प्रथा पूर्णपणे बंद करणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उद्देश आहे. हाताने सफाईची पद्धत म्हणजे मानवी हक्कांचे विशेषत: सन्मानासह जगण्याच्या हक्काचे आणि कायद्यासमोर प्रत्येकजण समान असल्याच्या तत्वाचे गंभीर उल्लंघन असल्याची बाबही आयोगाने आपल्या पत्रात नमूद केली आहे.

घटनात्मक आणि कायदेशीर संरक्षण असतानातसेच सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी, 2025 रोजी दिल्लीमुंबईचेन्नईकोलकाताबंगळूरु आणि हैदराबाद या सहा प्रमुख शहरांमध्ये अशा पद्धतीने सफाई करण्यास पूर्णपणे बंदी घातलेली असतानाहीदेशाच्या काही भागांमध्ये धोकादायक कचऱ्यासाठी हाताने सफाईची वृत्त  येत  असल्याचे निरीक्षणही आयोगाने आपल्या पत्रात नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नमूद उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी अशी शिफारस आपल्या पत्राद्वारे केली आहे.

विष्ठा - सांडपाणी सफाईसाठी हाताने सफाई करण्याच्या पद्धतीला प्रतिबंध करण्याबद्दलतसेच आणि या संबंधातील न्यायालयीन निर्देशांबद्दल स्थानिक अधिकारीकंत्राटदार आणि सामान्य नागरिक यांच्यासह संबंधितांमध्ये व्यापक प्रचार प्रसार करणे. सरकारी अधिकारीस्वच्छता विषयक कर्मचारी आणि समुदायांमध्ये  मानवी विष्ठा - सांडपाण्यासारखा धोकादायक कचरा हाताने साफ करण्याशी संबंधित कायदेशीरसामाजिक आणि मानवाधिकार विषयक पैलूंबाबत जाणिव जागृती निर्माण होईल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे. निर्देशांचे निश्चित कालावधित अनुपालन होईलतसेच हाताने सफाई करण्याच्या पद्धतीच्या प्रतिबंध केला जाईल याची सुनिश्चिती व्हावी यासाठी एक शिस्तबद्ध देखरेख व्यवस्था उभारणे. प्रगतीचा मागोवा घेण्यासाठीअंमलबजावणीतील त्रुटींचा शोध घेण्यासाठीतसेच प्रत्येक पातळीवरील जबाबदारीची निश्चिती करण्यासाठी  नियमित पाठपुरावा आणि पुनरावलोकनाची व्यवस्था उभारणे. संबंधित प्राधिकरणांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठ आठवड्यांच्या आत सादर करावाअसे निर्देशही आयोगाने आपल्या पत्राद्वारे दिले आहेत.

खेलो इंडिया युवा स्पर्धे’त 58 सुवर्णपदकांसह 158 पदकं जिंकल्याबद्दल

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत 58 सुवर्णपदकांसह 158 पदकं जिंकल्याबद्दल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन

 

मुंबईदि. 16 :- महाराष्ट्रानं 58 सुवर्ण47 रौप्य53 कांस्य असं एकूण 158 पदकांची लयलूट करत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविलं. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू व सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहीलअसा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खेलो इंडिया युवा स्पर्धेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रानं केलेली नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद कौतुकास्पद आहे. स्पर्धेतल्या 27 पैकी 22 खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकं जिंकली. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदकं मिळाली. जलतरण स्पर्धेत सात सुवर्ण पदकांसह महाराष्ट्रानं 29 पदकं जिंकली. राज्याला जिम्नॅस्टिक्स आणि नेमबाजीत प्रत्येकी सहावेटलिफ्टिंगमध्ये पाच तसंच कुस्तीसायकलिंगनेमबाजीचीही सुवर्णपदकं मिळाली. या युवा खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक खेळांकडे वळतील. परिश्रमानं उत्तम खेळाडू बनतील. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला समृद्ध आणि राज्याला निरोगीसुदृढ ठेवण्यासाठी ही कामगिरी मदत करेलअसा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

-----०००००००-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दीड महिन्यातच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दीड महिन्यातच

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दोन सीट्रिपलआयटीना मंजूरी

 

मुंबईदि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक सेंटर फॉर इन्व्हेंशनइनोव्हेशनइक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दोन प्रशिक्षण केंद्रे मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात मराठवाड्यातील बीडनांदेडछत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांसाठी तीन सीट्रीपलआयटी’ मंजूर झाल्याने बोलेन ते करेन...’ ही अजित पवार यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने महिन्यापूर्वी बीडसाठी सीट्रीपलआयटी’ मंजूर झाले आहे. त्यानंतर आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरसाठी दोन सीट्रीपलआयटी’ मंजूर झाल्यानेमराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षणउद्योगक्षेत्राला कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यात नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दीष्टांची यानिमित्ताने पूर्ती होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याचा विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांचे सातत्याने मराठवाडा दौरे सुरु आहेत.  दि. 23 एप्रिल 2025 रोजीच्या मराठवाडा दौऱ्यात नांदेड येथे बोलताना त्यांनी बीडनांदेड व छत्रपती संभाजीनगर येथे सीट्रीपलआयटी’ उभारण्याची घोषणा केली होती. दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर दि. 25 मार्च 2025 रोजी तात्काळ टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून या तीन जिल्ह्यांसाठी सीट्रीपलआयटी’ उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीने दीड महिन्यात तिन्ही जिल्ह्यांसाठी सीट्रीपलआयटी’ मंजूर केल्याची पत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सीट्रीपलआयटीमुळे मराठवाड्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, ‘एआय’ वापरासह तांत्रिक कौशल्यविकासाची संधी मिळेल.युवकांना उद्योगक्षम बनविणेरोजगारस्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात सीट्रीपलआयटी’ महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रातनांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी प्रत्येकी 191 कोटी रुपये खर्चून नवीन सीट्रिपलआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. यापैकी 162 कोटी 62 लाख रुपये टाटा टेक्नॉलॉजी तरउर्वरीत रक्कम राज्य शासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन देणार आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी 7 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईलत्यातून मराठवाड्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईलअसा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने सीट्रिपलआयटी’ स्थापन केल्यानंतर दरवर्षी प्रत्येकी 7 हजार प्रमाणे मराठवाड्यातील 21 हजार युवकांना उद्योगांच्या (4.0) गरजेनुसार आवश्यक जागतिक दर्जाचे औद्योगिकतांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल तसेच युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार मिळवणेस्वयंरोजगार करणे शक्य होणार आहे.

सीट्रिपलआयटीच्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षण खर्च टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून करणार आहेत. यामुळे नांदेडछत्रपती संभाजीनगरबीड जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हजारो युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिकतांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यांची कौशल्यवृद्धी होईल. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईलअसा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाजनिर्णयक्षम कार्यपद्धतीबद्दल मराठवाड्यातील नागरिकांकडून आनंदसमाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हा आयुष्यातील विशेष क्षण

 हा आयुष्यातील विशेष क्षण – रोहित शर्मा

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, खेळत असतानाच वानखेडे मैदानावरील एका स्टॅन्डला नाव लागणे हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. देशासाठी खेळताना मिळालेला हा सन्मान आहे. आजचा दिवस विशेष आहे. वानखेडे मैदानात नाव असणे तेही अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबत हा मोठा सन्मान आहे.

‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष व खासदार शरद पवार म्हणाले की, वानखेडे उभारणीमध्ये तत्कालिन क्रीडा मंत्री म्हणून योगदान दिले. वानखेडे मैदानास मोठा इतिहास आहे.  अनेक खेळाडू या मैदनावर घडले आहेत.  क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान मुंबई असोसिएशनने नेहमीच केला आहे. रोहित शर्माचे नाव आज देशाच्या घराघरात पोहचले आहे. त्याच्या कर्तृत्वाची कायम आठवण रहावी यासाठी त्याचे नाव देण्याच्या निर्णया बद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन.

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, तसेच दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध क्लब्सचे सचिव व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते

Featured post

Lakshvedhi