Thursday, 8 May 2025

कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट

 कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेनड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट

                            - केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन

 

            मुंबईदि. 7 - कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेनड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट असणार आहे. डिजिटीकरणाच्या या लाटेत शासकीय कार्यप्रणालीत आमूलाग्र सुधारणा होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित, आणि सुलभ सेवा मिळवून देणे हे शासनाचे उद्देश असल्याचे प्रतिपादन  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी आयोजित टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रमांतर्गत श्री. कृष्णन यांचे फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे याविषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी श्री. कृष्णन बोलत होते. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कपॅसिटी बिल्डिंग आयोगाच्या सदस्य अलका मित्तलउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह विविध मंत्रीसचिव यावेळी उपस्थित होते.

            श्री. कृष्णन यांनी इंडिया डिजिटल मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये भाषिणी उपक्रमएआयड्रोनजीआयएसचा प्रभावी वापर आदींची माहिती दिली.

श्री. कृष्णन म्हणाले कीडिजिटीकरणाच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने कार्यप्रणाली सुधारण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. विशेषत: शासकीय प्रणालीतील प्रक्रियांमध्ये सुधारणा आणि नागरिकांच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन, ड्रोन, आणि जीआयएस सारख्या नव्या तंत्रज्ञानांच्या वापरावर भर देण्यात येत आहे. डिजिटल परिवर्तनाची लाट शासकीय कामांमध्ये अधिक कार्यक्षम, समावेशक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतेअसे श्री. कृष्णन यांनी यावेळी सांगितले.  

श्री. कृष्णन म्हणाले कीडिजिटाझेशनच्या या प्रक्रियेत अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्यात मॅन्युअल बॅकएंड प्रणाली आणि सायबर हल्ल्यांचे वाढते धोके यांचा समावेश आहे. सध्याच्या शासकीय प्रणालीमध्ये अनेक विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून त्यांचा समन्वय साधण्यात अडचणी येत आहेत. यावर सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सुरक्षा व डेटा सुरक्षेवरही भर देणे आवश्यक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शासन आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करू इच्छित आहे.कुटुंब नोंदणी प्रणाली (Golden Record), राज्य डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म, बॅकएंड ऑटोमेशन, तसेच नागरिकांना माहिती द्यायची आवश्यकता कमी करणे या महत्वाच्या सुधारणांवर काम सुरू आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय भाषिणी या प्रकल्पाद्वारे मोबाईल, व्हॉइस आणि स्थानिक भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि सहजतेने सेवा देण्याचे काम सुरू आहे.

Wednesday, 7 May 2025

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट बैठकांचे आयोजन आवश्यक - झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी

 आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट बैठकांचे आयोजन आवश्यक 

- झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी

 

मुंबईदि.७ : कोणतेही काम थांबत नाहीहे कोरोना काळात सर्वांना समजले आहे. या काळात सर्व क्षेत्रातील बैठका झूम ॲप्लीकेशनच्या माध्यमातून झाल्या. सर्व ठिकाणी विविध बैठकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट बैठकांचे आयोजन करणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी यांनी केले.

 

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्मार्ट बैठक आयोजित करणे’ या विषयावर श्री. रंगारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र शासनाच्या कपॅसिटी बिल्डिंग आयोगाच्या सदस्य अलका मित्तल उपस्थित होत्या.

 

वितरण व्यवस्थापक श्री. रंगारी म्हणालेकोणतीही बैठक ही बैठकपूर्वबैठकीदरम्यान आणि बैठकीनंतर या तीन टप्प्यांमध्ये विभागलेली असते. यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बैठकीला सामोरे गेले पाहिजे. याकरिता झूम अ‍ॅप्लिकेशनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. झूम ॲप्लीकेशनचा वापर करून बैठकीसाठी लिंक तयार करणेव्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल वापरणेपीपीटी शेअर करणे आदी बाबत त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

 

आज सर्व काही क्लाउड-बेस्ड झाले आहे. आजच्या काळात कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन काम करणे अनिवार्य नाही. सर्व क्षेत्रांमध्ये विविध बैठका क्लाउडवर घेतल्या जातात. यासाठी मोबाइललॅपटॉप किंवा ब्राउझरवरूनही विविध अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो आणि आजच्या घडीला ब्राउझर-बेस्ड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्लिकेशन्सही उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

इयत्ता 11 वीची जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करावा

 इयत्ता 11 वीची जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करावा

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 7 : इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत दरवर्षी साधारणतः 250 ते 300 प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांचा प्रवास शिक्षणाधिकारीविभागीय शिक्षण उपसंचालकशिक्षण संचालक व शासनस्तर असा होतो. प्रस्तावामध्ये त्रूटी आढळल्यास पुन्हा याच प्रकारे प्रस्ताव सादर करावा लागतो. यामध्ये वेळपैसा यांचा अपव्यय होतो. या बाबींचा विचार करता सर्व संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करुन इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखांचे प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरप्रधान सचिव रणजित सिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहशिक्षण संचालक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे व विद्यालयांचे 500 हून अधिक प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी केले.

एन.आय.सी.पुणे यांच्याद्वारे संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीमुळे संस्थेला कोणत्याही कार्यालयात न जाता इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेला संबंधित कागदपत्रे थेट प्रणालीवर अपलोड करता येतील व संबंधित अधिकारी ती ऑनलाईन तपासू शकतील. अर्जामधील माहिती व अपलोड कागदपत्रे स्वयंचलित प्रणालीद्वारे पूर्वनिश्चित निकषांनुसार तपासली जातीलज्यामुळे मानवी चुका कमी होऊन वेळ वाचेल. संगणकीय प्रणालीतून मिळणाऱ्या आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल जे अधिक पारदर्शक व वस्तुनिष्ठ ठरेल. अर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

अर्ज वेळेत व परिपूर्ण सादर केल्यास शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज मंजूर करता येईल. इयत्ता 11 वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी लागणारी मंजूर तुकडी व आधार वैध मुलांची संख्या स्टुडेंट पोर्टलवरून संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध होईलत्यामुळे सदर माहिती भरण्याची गरज राहणार नाही. या अर्जाचे ट्रॅकिंग ऑनलाईन प्रणालीद्वारे संस्थेस अवगत होणार असून अर्ज कोणत्या स्तरावर मंजूर झालापुढे कोणत्या वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी गेला अथवा नामंजूर झाला असल्यास त्याची कारणे ऑनलाईन पद्धतीने अवगत होणार आहेत. संस्थेसाठी एक सुलभआकर्षक आणि उपयुक्त डॅशबोर्ड उपलब्ध होईल ज्यावरून सर्व अर्ज ट्रॅकिंगदस्तऐवज व इतर माहिती एकत्र पाहता येईल.

००००

नाशिक विभागाचा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा नाशिक विभागाने मत्स्योत्पादनाचे उदिष्ट पूर्ण करावे

 नाशिक विभागाचा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

नाशिक विभागाने मत्स्योत्पादनाचे उदिष्ट पूर्ण करावे

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई दि. ७ :- नाशिक विभागात मत्स्यव्यवसायास अधिक गती देऊन  विभागास दिलेले मत्स्योत्पादनाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आज दिल्या.

 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांनी मंत्रालयात नाशिक मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेसह आयुक्त (भूजल) अभय देशपांडेनाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त ना. वि. भादुले यांच्यासह नाशिक, अहिल्यानगरधुळेनंदुरबारजळगाव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. राणे म्हणालेनाशिक विभागात मासेमारीसाठी ३३ हजार ७४७ तलाव असून  १ लाख २ हजार ७८७ हेक्टर जलक्षेत्र असल्याने मत्स्योत्पादनाची मोठी क्षमता आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जल क्षेत्रात मत्स्योत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे. पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून मासेमारी तलावातील गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीचा ठेका दिलेल्या तलावात अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावीअसे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणालेविभागाच्या अधिकाऱ्यांनी मासेमारी तलावास नियमित भेटी देऊन याबाबतचा आढावा घ्यावा. मासेमारी तलाव नियमित भेटीबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

Gondwana University inks MoU with Lloyds Metals, Australian University in presence of Governor, CM

 Gondwana University inks MoU with Lloyds Metals,

Australian University in presence of Governor, CM

 

Tripartite Memorandums of Understanding (MoUs) were signed between the Gondwana University Gadchiroli and the Lloyds Metals and Energy  and Gondwana University and the Curtin University in Western Australia in the presence of Maharashtra Governor and Chancellor of the university C P Radhakrishnan and Chief Minister Devendra Fadnavis at Raj Bhavan Mumbai on Wed (7 May).

 

Speaking on the occasion, the Governor expressed the hope that the trilateral agreement will act as a catalyst for the transformation of the entire region of Gadchiroli. Chief Minister Devendra Fadnavis expressed the hope that during the next 5 years,  Gadchiroli will emerge as the Steel Hub of India.

 

The first MoU was signed between the Gondwana University and Lloyds Metals to establish an autonomous 'University Institute of Technology' in Gadchiroli for offering Engineering programmes to the students. The second MoU was signed between the Gondwana University and Curtin University in Western Australia for the awarding of twin degrees. 

Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, former Minister Sudhir Mungantiwar, MLC Parinay Fuke, Consul General of Australia in Mumbai Paul Murphy, Curtin University Pro-Chancellor Mark Ogden, Vice Chancellor of Gondwana University Dr Prashant Bokare, MD of Lloyds Metals B Prabhakaran, ACS Higher and Technical Education Venugopal Reddy, Secretary to the Chief Minister Shrikar Pardeshi, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, and invitees were present on the occasion.

गडचिरोली देशातील 'स्टील हब' होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 गडचिरोली देशातील 'स्टील हबहोईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खनिज व धातू क्षेत्रातील उद्योग स्थापन झाल्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली जिल्हा देशातील स्टील निर्मितीचे मोठे केंद्र होईल व जिल्ह्याचे मागासलेपण इतिहासजमा होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.  खनिज व धातुशास्त्र या विषयांकरिता जगात दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य करार केल्यामुळे आजचा दिवस गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार करण्याची एकाच आठवड्यात ही दुसरी वेळ आहे असे सांगून मुंबईत झालेल्या 'वेव्ह्जशिखर परिषदेच्या वेळी पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठासोबत नवी मुंबई येथे कॅम्पस  स्थापन करण्याबाबत करार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली येथील विद्यापीठाचा लॉइड्स स्टील तसेच कर्टीन विद्यापीठासोबत तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्याबाबत करार झाल्यामुळे राज्यातील उद्योगाला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यास मदत होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाची कवाडे उघडली असून देशाबाहेरील विद्यापीठांना राज्यात कॅम्पस स्थापित करण्याचे दृष्टीने नवी मुंबई येथे 'एज्युसीटीनिर्माण करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  जगातील १२ नामवंत विद्यापीठांनी आपापले कॅम्पस एज्युसीटी नवी मुंबई ठिकाणी उघडण्यास मान्यता दिली असून यॉर्कवेस्टर्न ऑस्ट्रेलिया व इलिनॉईस विद्यापीठांनी अगोदरच तेथे कॅम्पस सुरु केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी मुंबई एज्युसीटी येथे सर्व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस  स्थापन झाल्यावर त्याठिकाणी ८०,००० ते एक लाख विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेता येईल असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.   

लॉइड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचे कौतुक करून त्यांनी धैर्य दाखविल्यामुळे गडचिरोली येथे एकात्मिक स्टील उद्योग सुरु करणे शक्य झाले असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

स्थापनेपासून अवघ्या १२ - १३ वर्षात गोंडवाना विद्यापीठाने चांगली प्रगती केली असे सांगून विद्यापीठाने तंत्रज्ञान संस्था सुरु केल्यामुळे  तसेच कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य केल्यामुळे संस्थेतून देशात खनिज उद्योग तसेच धातुशास्त्र या विषयातील उत्तम तज्ज्ञ तयार होतीलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फीलॉईड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्रखाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थास्थापन करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांचेमध्ये करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये उभयपक्षी पदवी (ट्विनिंग डिग्री) प्रदान करण्याबाबत करार करण्यात आला. 

            कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारआमदार डॉ.परिणय फुकेकर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डनउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी,  तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल - राज्यपाल सी पी राधाकृष्णन आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली देशातील 'स्टील हब' होईल

 राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठलॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार

गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली देशातील 'स्टील हबहोईल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि.7 : युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान केल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने तेथील लॉइड स्टील कंपनी व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कर्टीन विद्यापीठासोबत केलेल्या करारामुळे विद्यापीठामधील शिक्षणाचा दर्जा उंचावून आगामी काळात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक समृद्ध जिल्हा म्हणून उदयास येईल व जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटेलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच  पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात राजभवन, मुंबई येथे सांमजस्य करार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली तसेच इतर नक्षल प्रभावित भागातील नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आला. त्याच्या फलस्वरूप गडचिरोली येथे विकासाची पहाट होत आहे असे सांगून कोणताही विकास सर्वसमावेशक असल्याशिवाय अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी यापुढे देखील कठोर पावले उचलतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वी आपण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह गडचिरोलीचा दौरा केला होता असे सांगून गोंडवाना विद्यापीठाने स्थानिक गरज विचारात घेऊन अभ्यासक्रम आखावे तसेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील हे पाहावे असे राज्यपालांनी सांगितले.

गडचिरोली येथे विपुल खनिज संपदा असून तेथे उत्तम प्रतीचे लोहखनिज आहे.  त्याठिकाणी आज धातू व खनिजाच्या शोधन व विनियोगासाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे असे सांगून कर्टीन विद्यापीठाशी सहकार्यामुळे खनिज क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले. 

गोंडवाना विद्यापीठाने लॉईड्स स्टील व एनर्जीच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले

Featured post

Lakshvedhi