Wednesday, 7 May 2025

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग रहावे

 सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग रहावे

-प्रसाद देवरे

 

            मुंबईदि. ७ : डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावेअसे आवाहन नॅस्कॉमचे अधिकारी प्रसाद देवरे यांनी सांगितले.

            ‘टेक-वारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात सायबर सुरक्षा’ विषयावर प्रसाद देवरे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

             श्री.देवरे म्हणालेडीप फेक व्हिडीओडेटा चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा. सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा तसेच दुहेरी प्रमाणीकरण प्रणाली वापरा. अनोळखी व्यक्तींचे ई-मेलमेसेजमधील लिंक्स उघडू नका. स्मार्टफोनलॅपटॉप आणि ‘आयओटी’ डिव्हायसेसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा. सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या. बँकिंग किंवा खरेदीसाठी फक्त बँक किंवा अधिकृत प्रदात्यांचे ॲप्स वापरा.

  सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे कोणताही संशयास्पद मजकूर किंवा संदेश फॉरवर्ड करताना प्रत्येकाने अत्यंत सतर्क राहावे. सायबर सुरक्षेसाठी काळजी घेणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

00000

Gondwana University inks MoU with Lloyds Metals, Australian University in presence of Governor, CM

 Gondwana University inks MoU with Lloyds Metals,

Australian University in presence of Governor, CM

Mumbai, May 7 :- Tripartite Memorandums of Understanding (MoUs) were signed between the Gondwana University Gadchiroli, Lloyds Metals and Energy and the Curtin University from Western Australia in the presence of Maharashtra Governor and Chancellor of the university C P Radhakrishnan and Chief Minister Devendra Fadnavis at Raj Bhavan Mumbai on Wed (7 May).

Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, former Minister Sudhir Mungantiwar, MLC Parinay Fuke, Consul General of Australia in Mumbai Paul Murphy, Curtin University Pro-Chancellor Mark Ogden, Vice Chancellor of Gondwana University Dr Prashant Bokare, MD of Lloyds Metals B Prabhakaran, ACS Higher and Technical Education Venugopal Reddy, Secretary to the Chief Minister Shrikar Pardeshi, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, statutory officers and members of the Management Council of the University were present.

The first MoU was signed between the Gondwana University and Lloyds Metals to establish an autonomous 'University Institute of Technology' in Gadchiroli for offering Engineering programmes to the students. The second MoU was signed between the Gondwana University and Curtin University in Western Australia for the offering of twinning degrees.

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉईड्स मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार

 राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे

लॉईड्स मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. ७ :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यासोबत सामंजस्य करारांचे राजभवन येथे आदानप्रदान करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमाजी मंत्री सुधीर मुनगंटीवारआमदार डॉ.परिणय फुकेऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फीकर्टीन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु मार्क ऑग्डनगोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारेलॉईड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरनउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे संविधानिक अधिकारी व  व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांच्यामध्ये गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्रखाणकाम, कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थास्थापन करण्याबाबत करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये जुळे कार्यक्रम (ट्विनिंग डिग्री) आयोजित करण्याबाबत करार करण्यात आला.

मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार,महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर,pl share,महाराष्ट्रात १६ ठिकाणी संकटकाळी बचाव प्रशिक्षण संकटकाळी बचाव प्रशिक्षण

 मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण

 

प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्‍चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणेनागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणेशत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणेतसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असूनसर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.

महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल

 मुंबईउरण-जेएनपीटीतारापूरपुणेठाणेनाशिकथळ-वायशेतरोहा-धाटाव-नागोठाणेमनमाडसिन्नरपिंपरी-चिंचवडछत्रपती संभाजीनगरभुसावळरायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 

 

अहिल्यानगरदि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेरोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.

 सूतगिरणीमुळे परिसरात नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.  चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे परिसरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तसेच रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्यामुळे या परिसरातील दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्र रस्ते विकास संस्थे अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुतगिरणी याच रस्त्यावर होत असल्याने  ५. ५० मीटर डांबरी धावपट्टी प्रस्तावित करुन राज्य शासनाने नव्याने या रस्ता कामाला मान्यता दिली आहे. पाच वर्षात देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची देखील तरतुद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मुलींच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन

 

अहिल्यानगर दि. ६ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण  करून करण्यात आले.  या नूतन वसतिगृहात ६०० मुलींच्या राहण्याची क्षमता आहे.

 

             कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार शिवाजी कर्डिलेआमदार मोनिका राजळे,  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटीलशालिनीताई विखे-पाटीलसाखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता इमारतीचे भूमिपूजन

 अधीक्षक अभियंताकार्यकारी अभियंता इमारतीचे भूमिपूजन

            अहिल्यानगर येथील बांधकाम भवन येथे अधीक्षक अभियंता कार्यालयकार्यकारी अभियंता व उप अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

            १३ कोटी ३१ लक्ष ४२ हजार ८३८ रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेली ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कार्यकारी अभियंता कार्यालयउपविभागीय कार्यालय असून तिसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता कार्यालयबैठक कक्षसभागृहअभिलेख कक्ष उभारण्यात येणार आहे.

 

Featured post

Lakshvedhi