Wednesday, 7 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

 

            अहिल्यानगरदि.६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन  इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

 

            कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)  छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्करकार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी ते म्हणालेअहिल्यानगर शहरात ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह

            अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी ६ कोटी ७५ लाख रुपये खर्च आला. यामध्ये तळमजल्यावर २ व्हीव्हीआयपी कक्ष,१ व्हीआयपी कक्षभोजन कक्षबैठक कक्षस्वयंपाकगृहभांडारस्वागत कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर २ व्हीव्हीआयपी व ३ व्हीआयपी कक्ष असून ७५ व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहही उभारण्यात आले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

 

            अहिल्यानगरदि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचेतसेच  राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

 

            यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेमाजी मंत्री रवींद्र चव्हाणविभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्करकार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.

 

            यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नव्याने उभारण्यात येणारी पोलीस वसाहत व राज्य राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती विषयी माहिती जाणून घेतली.

 

पोलिसांसाठी आवश्यक सुविधायुक्त वसाहत उभी राहणार

 

            पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर आठ निवासस्थाने याप्रमाणे ८० निवासस्थाने असून अशा एकूण चार इमारती उभारण्यात येत आहेत. पोलीस अंमलदार निवासस्थानामध्ये दोन बेडरुमहॉलकिचन असा ५० चौ.मी क्षेत्रफळ आहे. पार्किंगमध्ये सर्वत्र सोलरद्वारे विद्युत पुरवठा असून अंतर्गत रस्तेस्ट्रीट लाईटसांडपाणी शुद्धीकरण व्यवस्थाअग्निशमन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.

 

अशी आहे नवीन प्रशासकीय इमारत

नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीमध्ये शस्त्रागारराखीव पोलीस निरीक्षक कार्यालयटेंट हाऊसक्रीडा साहित्य कक्षबँड रुमबेल ऑफ आर्मस् आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

 

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली प्रभावी - बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ लौकिक रगजी

 शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि

सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली प्रभावी 

- बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ लौकिक रगजी

 

              मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे  बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ  लौकिक रगजी यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"  मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ या विषयावर श्री. रगजी यांनी मार्गदर्शन केले.

ब्लॉकचेन’ ही संज्ञा मुख्यतः क्रिप्टोकरन्सी (जसे बिटकॉइन) संदर्भात वापरली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली माहिती सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने साठवण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगून श्री. रगजी यांनी ब्लॉकचेनच्या मूलभूत तीन-चार संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन उपयुक्त ठरू शकतेअसे त्यांनी सांगितले.

 ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना तशी कमी परिचित असलीतरी ती ब्लॉकचेनमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जसे महसूल विभागामध्ये मालमत्ता नोंदवही असतेतसेच ब्लॉकचेनमध्ये व्यवहारांची माहिती साठवली जाते. ही माहिती जर चुकीने भरली गेलीतर ती ओळखणे शक्य होतेकारण प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्याची यंत्रणा त्यामध्ये असते.

पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून ब्लॉकचेन ही विकेंद्रित प्रणाली आहेत्यामुळे केवळ एका व्यक्तीकडे नियंत्रण न राहता अनेक नोंदी सार्वजनिक स्वरूपात ठेवता येतात. यामुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनते. प्रत्येक बदलासाठी प्रूफ ऑफ वर्क’ हे क्लिष्ट गणिती प्रमाणीकरण आवश्यक असल्यामुळेअनधिकृत बदल करणे जवळजवळ अशक्य होते,  असे त्यांनी सांगितले.

श्री. रगजी यांनी सांगितले कीब्लॉकचेनमध्ये कोण छेडछाड करतो हे शोधणे कठीण असलेतरी याबाबतचे संकेत लगेच समजतात. त्यामुळे ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा व्यवसायिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी कसा वापर करता येतोयावर त्यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.

यावेळी श्री. रगजी यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. स्वागत सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास

संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

नवी दिल्लीदि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करण्यात येत आहे. या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईलअशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त)मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंटचे संचालक संजय दाबके उपस्थित होते. श्री. दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्ययावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे 2020 पासून यावर काम सुरू आहे. देशभरातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून घ्यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.

हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय आहे.

या संग्रहालयातील वस्तू ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. संग्राहालय पाहताना त्या काळातील अनुभव घेता येईल. संग्रहालयातील काही भागांमध्ये थ्रीडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

यासह डार्क राईडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना पाहता येईल.  हे देशातील एक अभूतपूर्व असे संग्रहालय असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

 शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर

करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

- कृषी आयुक्त सुरज मांढरे

 

              मुंबई, दि. ६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापनवेळेचे नियोजनकामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान झाले. यावेळी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला यांसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, गुगल कीपएव्हरनोटमायक्रोसॉफ्ट वन नोटगुगल ड्राइव्हड्रॉपबॉक्सक्लिकअपमायक्रोसॉफ्ट टू डूगुगल कॅलेंडरगुगल शीट्सटेलिग्राम याचा वापर करून आपले काम अधिक गतिमान करता येईल. टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे जी कोणताही भेदभाव न करता सर्वांना एका समान पातळीवर आणते. शरीररंगजातधर्म यांचा फरक न बघता ती सर्वांना उपयुक्त ठरते.

मायक्रोसॉफ्ट वन नोट या टूल्सचा जर वापर केला तर शासनाचे अनेक प्रश्न सुटतील. पेन्सिल असलेले टॅबलेट कामकाजात खूप उपयुक्त आहेत. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क वर भर दिला पाहिजे. शासनाचे काम करत असताना स्वतः देखील तंत्रज्ञान अवगत करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांनी सांगितले कीतंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व वेळेत पूर्ण होऊ शकते. टास्क मॅनेजमेंटसाठी ऐनी डू (Any Do) सारख्या अ‍ॅप्लिकेशन्सचा उपयोग करून कामाची नोंद ठेवता येते व एक्सल (Excel) चा उपयोग क्षेत्रीय स्तरावर डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

महाराष्ट्र सिव्हिल सर्विस’ संकेतस्थळाची माहिती देताना श्री. नाईक यांनी सांगितले कीया प्लॅटफॉर्मवर नागरिक कोणत्याही विभागासंदर्भात प्रश्न विचारू शकतात व अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर मिळवू शकतात.

त्याचबरोबर, ‘महासंपर्क’ अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीलोकप्रतिनिधी यांची माहिती सुलभपणे मिळू शकतेयाबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रशासकीय यंत्रणेत एखाद्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या तंत्राची गरज आहे आणि यासाठी तंत्रज्ञान ही प्रभावी साधने उपलब्ध करून देतेअसेही श्री. नाईक यांनी सांगितले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती

 

अहिल्यानगरदि. ६ : जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सदस्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलहोळकर घराण्याचे १६ वे वंशज युवराज यशवंतराव होळकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे आदींसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

 

स्मारक परिसरात सुरू असलेले गढीचे नूतनीकरणनक्षत्र उद्यानसंरक्षक भिंतशिल्प,  संग्रहालयशिवसृष्टी या प्रगतीपथावरील कामांची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे निवासस्वयंपाकघरदेवघरओसरीतुळशी वृंदावनबैठकीचे ठिकाणधान्य साठविण्याचे ठिकाणदरबार या स्थळांची पाहणीही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली. सभापती प्रा. शिंदे यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

 

ढोलताशांच्या गजरात स्वागत

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सहकाऱ्यांचे अहिल्यादेवी स्मारक परिसरात आगमन होताच धनगरी ढोल पथकाने ढोल गजर केला. सुवासिनिंनी सर्व मंत्र्यांचे औक्षण केले.

0000

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 

मुंबईदि. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतीलयासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.

 

आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक  आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Featured post

Lakshvedhi