Wednesday, 7 May 2025

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 

मुंबईदि. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतीलयासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.

 

आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक  आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार,https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर

 इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार

- मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती

 

मुंबईदि. ६ : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई विभागातील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी कळविले आहे.

 

मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक (दक्षिण/ उत्तर/ पश्चिम) मुंबई व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे/ रायगड/ पालघर यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत अवगत करावेअसे सूचित करण्यात आले आहे.

 

सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्य मंडळाच्या मुंबई विभागातील मान्यताप्राप्त सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी (सन २०२४-२५ मध्ये रजिस्ट्रेशन केले असले तरीही) आपल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची रजिस्ट्रेशन बाबतची सर्व माहिती https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर भरावी. जी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये सदर कालावधीत उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरणार नाहीतअशा उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सन २०२५-२६ या वर्षामध्ये इयत्ता ११ वी मध्ये ऑनलाईन विद्यार्थी अलॉट होणार नाहीत व याची सर्व जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची राहीलअसेही कळविण्यात आले आहे.

 

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकमुंबई यांच्या कार्यालयात स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या प्रवेश नियंत्रण कक्षामार्फत या कार्यालयात प्रत्यक्ष आलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जात असल्याचे या कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्रातील इयत्ता १० वी च्या ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्यामार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व लिपीक यांचे वार्ड/ तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन मदतीसाठी हेल्प सेंटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना व मार्गदर्शन इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन सादर करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सदर सूचनांचे बारकाईने वाचन करूनच आपला प्रवेश अर्ज सादर करावाअसे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 

अहिल्यानगरदि. ६ :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्रीपरिषदेच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

 

टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

 

मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 

अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्रीहत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

००००


 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतीगृह योजनेस नाव

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतीगृह योजनेस नाव

धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई,  पुणेछत्रपती संभाजी नगरनाशिकनागपूरअमरावती येथे वसतीगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रत्येकी 200 विद्यार्थी क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तरमुलींसाठी 100 क्षमता आहे. नाशिक येथे काम सुरुपुणेनागपूर येथे लवकरच सुरु होणार आहे.

--००

इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश योजनेस राजे यशवंतराव होळकर यांचे नाव

 इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश योजनेस राजे यशवंतराव होळकर यांचे नाव

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला आज राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राजे यशवंतराव होळकर यांनी १७९७ ते १८११ या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्तनीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेचे नाव राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असे करण्यात आले. या योजनेतून २०२१ -२२ ते २०२४-२५ अखेर १६२ शाळांची निवड करण्यात आली असून या शाळांत धनगर समाजातील ३१३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यासाठी २८८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या तलाव, घाटांच्या जतनासाठी विशेष योजना, ७५ कोटी रुपयांचा निधी

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या तलावघाटांच्या जतनासाठी

विशेष योजना७५ कोटी रुपयांचा निधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारलेल्या तलावबारवकुंडघाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीच्या जतनासाठी विशेष योजना राबविण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मृद व जलसंधारण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ३४ योजनांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त सर्व्हेक्षणात आढळून येणाऱ्या पाणी वाटप प्रणालीचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये  जलाशयातील गाळ काढणेजलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. - राज्यात असे तीन ऐतिहासिक तलाव (चांदवडत्र्यंबकेश्वरमल्हार गौतमेश्वरजेजुरी) आहेत. या योजनेत राज्यातील अशा १९ विहिरीसहा घाटसहा कुंड अशा एकूण ३४  जलाशयांची दुरुस्तीगाळ काढणेपुनरुज्जीवनसुशोभिकरण इत्यादी कामे करण्यात येतील

Featured post

Lakshvedhi